चिमुटभर

Submitted by अज्ञात on 6 February, 2014 - 10:03

हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची
आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची
एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी
झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची

रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी
फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी
संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची
सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी

………………अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी समजली अजून प्रयत्न करतो
बाकी रोमांकित समजले नाहीए रोमांचित म्हणायचे होते का आपणास