Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 6 February, 2014 - 02:31
कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो
तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो
सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो
किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ ''नसण्याची''
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो
--डॉ.कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो<<< व्वा व्वा
किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ ''नसण्याची''
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो<<< छानच
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो
व्व्वा. मस्त शेर झालाय.
शेवटचा शेर अधिक कदाचित मक्त्याच्या आग्रहामुळे किचकट झालाय, असे वाटते.
<<कातरवेळी दु:ख
<<कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो
सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?<<
अफाट, कातिल शेर डॉक! __/\__
आभारी आहे नयना मॅडम आणि
आभारी आहे नयना मॅडम आणि भूषणजी....
समीर...सहमत आहेचह.
खूप खूप आभार.
कातरवेळी दु:ख
कातरवेळी दु:ख दाटते...''तिकडे'' नकळत जातो
नुसती दारु घसा जाळते....अश्रू मिसळत जातो
तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो
>> मस्त
चांगली गझल डॉक्टर!!
चांगली गझल डॉक्टर!!
मतला आणि 'कोसळत' हे सर्वात
मतला आणि 'कोसळत' हे सर्वात छान वाटले.
उकाका +१ नेहमीच छान छान गझला
उकाका +१
नेहमीच छान छान गझला वाचायला मिळतात त्याबद्दल तुमचे विशेष आभार डॉ.साहेब
खूप आवडली संपूर्ण गझल...
खूप आवडली संपूर्ण गझल...
धन्यवाद सर...
वाह क्या बात है डॉक्टर साहेब
वाह क्या बात है डॉक्टर साहेब
वाह! वाह! अतिशय सुरेख आशय.
वाह! वाह! अतिशय सुरेख आशय.
छान... आवडली
छान...
आवडली
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो..... अफाट !!!!!!
सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?........क्या बात है !!
किती जरी तू लांबवशिल '' कैलास
किती जरी तू लांबवशिल '' कैलास '' वेळ ''नसण्याची''
काळ गळ्याभोवतील दो-या खचित आवळत जातो
छानच!
सुगंध येतो जखमांना
सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळाले
मी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?<<< कातिलच आहे हे अगदी
सुगंध येतो जखमांना
सुगंध येतो जखमांना हल्लीहल्लीच कळालेमी गेल्यावर दुनिया म्हणते...कोण दरवळत जातो?<<
छानच
तुझ्या नकाराची दाहकता तीव्र
तुझ्या नकाराची दाहकता तीव्र एवढी आहे
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो
फुटेल हा कातळसुद्धा या वेड्या आशेवरती
ओघळणारा होतो पण मुद्दाम कोसळत जातो
>> लै म्हणजे लैच भारी !!
अखेरचा शेर तखल्लुसाग्रही झाल्याचे जाणवते आहेच, समीरदादा म्हणतात तसं.
मतलाही मला जरा अनावश्यक 'स्पष्ट/ थेट' वाटला.
पण उपरोक्त दोन शेर निव्वळ अफाट्ट !!
सहमत आहे रणजीत...
सहमत आहे रणजीत...
मेण जळावे तसाच हल्ली मीही
मेण जळावे तसाच हल्ली मीही वितळत जातो
सही !
व्वा! सुंदर!
व्वा! सुंदर!