पंचतारांकित अध्यात्म

Submitted by सचिन पगारे on 4 February, 2014 - 11:02

भारतात संत गाडगेमहाराज, तुकडोजी महाराज ह्या सारखे महान संत होवून गेले. जनसेवा हीच ईश्वरसेवा असे मानणारे हे महान संत होते.संत गाडगे महाराजांनी आपल्या प्रवचनातून जन जागृती केली. परंतु आता काळानुसार संतांचे प्रकार बदलले आहेत आताचे तथाकथित संत हे पंचतारांकित झाले आहेत.

मोठमोठ्या शामियान्यात त्यांचा सत्संग चालतो. सध्याच्या काळात बुवा बनणे हा किफायतशीर व्यवसाय झाला आहे. मोठमोठ्या सेलिब्रिटी ह्या बाबांचे भक्त असतात. बाबांच्या सेवेला सेवकांचा ताफा, प्रवासासाठी आलिशान गाड्यांचा ताफा,कोट्यावधींचे आश्रम असे बाबांचे स्वरूप असते.सेलिब्रिटी लोकांचा समाजावर प्रभाव असतो त्यांचे अनुकरण म्हणूनही बरेच जण अशा बाबांची भक्ती करतात. बाबांच्या चमत्काराच्या सुरस कहाण्या एकूण आपण २१ व्या शतकात राहतोय कि १० व्या शतकात असा प्रश्न पडतो.

विज्ञान, शास्त्र जसजशी प्रगती करत आहे तस तसे अंधश्रद्धेचे स्वरूपही बदलत चालले आहे. अंधश्रद्धाही आता अत्याधुनिक बनत चालल्या आहेत.देशातील भोळ्या भाबडी जनता सोडाच समाजात उच्च पदावर असणारे व्यक्ती ज्यांच्याकडून समाजाला एका आदर्शाची गरज असते तेही अशा बाबा बुवांच्या कच्छपी लागलेले बघून त्यांची कीव येवू लागते.

'झुकती है दुनिया झुकानेवाला चाहिये' .हे वाक्य सत्यात उतरवणारे सध्याच्या काळात जण कोणी असेल तर हे सध्याचे पंचतारांकित साधू नि संत ह्यात शंकाच नाही. पूर्वीचे भावपूर्ण अध्यात्म हे लयास जावून हे नवेच पंचतारांकित अध्यात्म उदयास आले आहे आणि त्यालाही भरपूर मागणी आहे . एखादा शिकलेला असेल तर आपण त्याला सुशिक्षित म्हणून ओळखतो. पण पुस्तकी ज्ञान असले तरी ती व्यक्ती सुशिक्षित असेलच असे नाही हे ह्या बाबांच्या भक्तांकडे पाहून पटते.

ह्या भोवतालच्या अंधश्रद्धा पाहून पद्मश्री नरेंद्र दाभोलकर सर ह्यांच्या कार्याची किती आवशक्यता आहे ह्याची जाणीव होते.पुरोगामी महाराष्ट्रातून अंधश्रद्धेचा कलंक पुसून टाकण्यासाठी चालविलेली दाभोळ्करांची चळवळ प्रतिगाम्यांच्या उरात धडकी भरवून गेली..

आजच्या काळात जर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी खरोखरच एखाद्या गुरूची आवशक्यता असेल तर तो गुरु गाडगे महाराजांसारखा असावा..

आसाराम १० हजार कोटींचे धनी

http://maharashtratimes.indiatimes.com/nation/asaram-bapu/articleshow/29...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन.., तुम्ही कोणालाही विरोध करू शकता म्हणून विरोधी पक्षनेते. तुमचा दर्जा पण क्याबिनेट मंत्र्याचा असतो. Lol
आ.न.,
-गा.पै.

विषय काय, प्रतिसाद काय? Wink
यांना जुन्या कल्टवाल्या लेखाच्या, अनिरुद्ध बापूंच्या लेखांच्या लिंका द्या.
Wink

बेफिकीर, माझे नाव विसरलात का वरल्या यादीत? होत अस कधी कधी, हरकत नाही.
आगामी "मायबोली लोकपाल" म्हणुन मी माझे नाव पुढे कर्तोय! Wink

//पगारे साहेब तुमच्या नव्या धाग्याची आम्ही सलमानच्या नव्या चित्रपटासारखी वाट पहात असतो. शे-दोनशे पोष्टींची तर बेगमी होऊनच जाते. त्यामुळे तुमचा नवा धागा दिसला की आम्ही लगबगीने धावत जाऊन पोस्टींचे अर्घ्य वाहतो.बाकी माबोकरांच्या भांड्कुदळ स्वभावाचा तुम्ही जो अभ्यास केलाय त्याला तोड नाही. कोणता पिक्चर हिट जाणार याबाबत तुमचा अंदाज दाद देण्यायोग्यच....//// Happy

पगारे ह्यांचा धागा मी पण वाचत असते अधूनमधून . पण बर्याच विषयातले कळत नसल्याने प्रतिसाद फारसे देत नाही इतकेच .

मनस्मी १८ +१

पगारेजी, प्रियांका गांधींवर लेख लिहा ना राव. किती वाट बघायला लावताय..

बेफिकीर, तुम्ही आम्हाला मंत्री मंडळात स्थान देणार नाही याची कुणकुण लागली होती,
तस्मात आम्ही या सदनातुन आधीच सभात्याग केलेला आहे Wink

तुम्ही धरने द्या..........आप सारखे ... असे ही पार्टी जॉईंट करणार होतात ना... मग धरणावर बसण्याची प्रॅक्टिस नको का Wink Biggrin

धरना देणे....... आंदोलन करणे.......रस्तावर झोपने......अराजकता माजवणे इत्यादी.. शिकुन घ्या

"विपश्यना" हे देखिल तुमच्या मते पन्चतारान्कित अध्यात्म/अन्धश्रद्धेमधे मोडते की कसे ते निश्चितपणे सान्गा बघु. उगिच मोघम उत्तर नको.>>>>लिम्बुजि विपश्यनेबद्दल मला जास्ती काही माहिती नाही परंतु एखादा विपश्यनेचा गुरु हा लैंगिक अत्याचार , हजारो कोटीची संपत्ती, आश्रम शाळेतील २ विद्ध्यार्थ्यांचा गूढ मृत्यू असल्या प्रकरणात अडकलेला मला तरी माहित नाही किंवा वाचनात नाही. पण आसाराम मात्र ह्या सर्व वरील प्रकरणात अडकलेले आहेत..

पगारेजी, प्रियांका गांधींवर लेख लिहा ना राव. किती वाट बघायला लावताय..>>>>>चौकट राजाजी तुमची आतुरता मी समजू शकतो. परंतु सध्या त्या सक्रिय राजकारणात नाहीत जेव्हा त्या सक्रिय राजकारणात येतील तेव्हा लेख नक्कीच लिहेन..

मनस्मि १८ राहुलजी गांधी ह्यांच्या मुलाखतीचा बाफ चांगला होता आता गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या पत्नी जशोदाबेन ह्यांच्यावर तुमच्या अदभूत लेखणीतून उतरलेला बाफ मला वाचायचा आहे.

चायवाला ह्यांचा फोटो आवडला. इतक्या मेहनतीच्या कामातुनही तुम्हाला नेट वर यायला वेळ मिळतो कमाल आहे. तुमची चहाची टपरी कुठे आहे?

मला देखील "करण थापर" यांनी घेतलेल्या मुलाखतीच्या "सब्जेक्त" वर बाफ काढण्याचा विचार आहे>>>>> छान बाफ होईल तो. बाफचे नाव सुचवतो "भाग फेकू भाग" (भाग मिल्खा भाग च्या धर्तीवर)

मी विचार करतोय, आता स्वामी विजयानंद बनावं...
जरा जपून! गाईड सिनेमात देव आनंदचे काय झाले माहित आहे का? स्वामी झाला नि पाउस पडावा म्हणून उपास करायला लावले त्याला नि मेला!! तेंव्हा गुपचूप खाणे, काळ्या पैशाची व्यवस्था काय करायची हे सगळे आधीच प्लान करून ठेवा.

बेफिकीरजी, उप्राष्ट्रप्तीचा पगार किति असतो हो? नि इतर सवलतींच्या ऐवजी मला आपले पैसेच द्या. डॉलरमधे द्या मात्र.

पगारेजी, आजच्या काळात जर समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी खरोखरच एखाद्या गुरूची आवशक्यता असेल तर तो गुरु तुमचा लाडका राहुल़जीच होऊ शकेल की!! मग तो पंचच काय सप्ततारांकित झाला तरी तुम्ही त्याचे जोडे डोक्यावर घेऊन नाचालच की!!

पंतप्रधान झाल्यावर त्याला हे काम करता येईलच. परदेशातल्या कुणाला तीन लाख कोटीचे कंत्राट द्या की झाले.

लै मज्जा राव मायबोली म्हणजे!!

आणि मी कुठे? टाळ्या वाजवायला काय? अरेरे
----- तुमचे नाव डावलले आहे कारण तुमचा आय डी अत्यन्त बेभरवशाचा आहे. आज हा उद्या तो... परवा अजुन काही... असो. गृह खाते, गुप्तहेर खाते तुमच्या आयडीच्या मागावर नेहेमीच असते आणि उद्या त्यान्नी उचलले (आयडी बाद केला तर) तर मन्त्रीमन्डळाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न निर्माण होतो... तुम्ही टाळ्या वाजवा नाहीतर सचिन पगारे सोबत कोण किती धागे काठतो याबात स्पर्धा करा.

मी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता समाज कार्य करत रहाणार...

उदय यांचा अण्णा हजारे यांचे पद द्यावे
------ मी एकवेळाही उपाशी राहणे शक्य नाही... तुम्ही उदार मनाने देत असलेले पद भुषवण्यासाठी लागणारी किमान पात्रताही माझ्यात नाही. Sad

बेफिकीर यांनी जाहीर केलेलं मा.बो. मंत्रीमंडळ वाचलं. त्या मंत्रिमंडळात अल्पसंख्याक विकास हे महत्वाचं खातंच नाही हे वाचून मनस्वी संताप आला. मा.बो. वरील माझ्यासारख्या उपेक्षितांना न्याय मिळालाच पाहीजे. मा.बो. वरील ३०%धागे उपेक्षितांकरीता राखिव असावेत अशी आमची आग्रही मागणी आहे.

झक्की, पुन्हा एकदा गाईड बघावा लागेल. कदाचित आताच्या काळात उपास वगैरे काही लोकांनी पेटंट केले आहेत, त्यामुळे जमुन जाईल स्वामी वगैरे बननं Happy .... हा आता अंगठ्या, ताईत काढायची प्रॅक्टिस करतोय.... बघु कसं होते ते Happy

उदय आजकाल एक्स्प्रेस उपोषणही सुरु झालेत की. वीजदरकपातीसाठी केले होते ना आताच, ब्रेकफास्टनंतर सुरु, लंचला खतम... Happy

>>>> "विपश्यना" हे देखिल तुमच्या मते पन्चतारान्कित अध्यात्म/अन्धश्रद्धेमधे मोडते की कसे ते निश्चितपणे सान्गा बघु. उगिच मोघम उत्तर नको.>>>>लिम्बुजि विपश्यनेबद्दल मला जास्ती काही माहिती नाही परंतु एखादा विपश्यनेचा गुरु हा लैंगिक अत्याचार , हजारो कोटीची संपत्ती, आश्रम शाळेतील २ विद्ध्यार्थ्यांचा गूढ मृत्यू असल्या प्रकरणात अडकलेला मला तरी माहित नाही किंवा वाचनात नाही. पण आसाराम मात्र ह्या सर्व वरील प्रकरणात अडकलेले आहेत..<<<<
अगदी रागांचे चेले शोभता हो! Happy प्रश्न काय विचारलाय, अन उत्तर काय देताय, विपश्यना ही पन्चतारान्कित अन्धश्रद्धा अस्ते वा नस्ते इतकेच बोला की, उगा वाचकान्च्या भावनेला हात घालायला जिथे तिथे लैन्गिक अत्याचार्/हजारो कोटि/मृत्यु कशाला ओढुन ताणुन आणताय?
त्यातुन आधीच्या शीर्षक अन मजकुरात वापरलेल्या शब्दान्बद्दल तुम्ही सोईस्कररित्या अवाक्षरही काढत नाही.
अगदीच रागांचे चेले ....,अरेच्च्या, मी चूक तर करीत नाहीना? चूकलोच, क्षमा असावी पगारेजी, तुम्ही तर रागांचे गुरू शोभता आहात, अन मी उगाचच तुम्हाला चेला म्हणुन संबोधतोय.

तस म्हणल तर प्रत्येक श्रद्धा ही अंधश्रद्धाच असते.अंधश्रद्धा या शब्दाला काळी किनार आहे. चिकित्सेशिवाय ठेवलेला विश्वास म्हणजे श्रद्धा. कधी कधी तो समजूत, धारणा,भावना अशा अर्थानेही वापरला जातो. संजय भास्कर जोशी म्हणतात कि अंनिस ची चळवळ यशस्वी होण्यासाठी कार्यकर्त्यांची अंधश्रद्धा निर्मुलनावर श्रद्धा हवी. तरचे ते झोकून देउन पोटतिडकीने काम करु शकतात. मानसिक आरोग्य चांगले राखण्यात अंधश्रद्धांचा कधी कधी उपयोग होतो. असो... अधिक माहिती साठी परत परत लिंका द्याव्या लागतील. त्याचा हल्ली कंटाळा येतो.

Pages