स्थित्यंतरे..

Submitted by अनिल आठलेकर on 2 February, 2014 - 03:58

...

अवघड नसते सोपे नसते
चूक बरोबर नसते काही,
मनात येते तसे उमटते
गंध कशाचा नसतानाही...

मनडोहाच्या खोल तळाशी
नवा कुठुनसा अंकुर येई
कधी नभाचे होई गाणे
कधी धरेचे कौतुक वाही ....

कधी उन्हाचे स्वप्न उपाशी
तसेच उरता दग्ध मनाशी
सायंकाळी क्षैतिजमाया
अवघी सृष्टी थांबुन पाही....

पुन्हा उदासी प्रहर निशेचा
उत्कट तिमिरापोटी येई,
तरी सदोदित मनी विलसता
उष:काल मज खुणवित राही...!

~ अनिल आठलेकर, कुडाळ.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छानच रे मला आवडली पण एका कडव्यात असे केले तर (फक्त शब्दक्रम बदलून...)

सायंकाळी अवघी सृष्टी
क्षैतिजमाया थांबुन पाही....

??
सहज सुचलं म्हणून सांगीतलं गै न. प्लीज Happy

शुभेच्छा आणि धन्स

अवांतर : कविवर्य ! आज कुडाळास आहात काय खाली लिहिले आहेत म्हणून म्हटले ...येताना तुला आण म्हणजे झालं मला बाकी काही नको Wink