जलरंग कार्यशाळा

Submitted by अल्पना on 22 January, 2014 - 10:14

पाटलांच्या http://www.maayboli.com/node/47295 या धाग्यावरील चर्चेमध्ये मायबोलीवर ऑनलाइन जलरंग कार्यशाळा घ्यावी असा विचार पुढे आला.

मायबोलीवर अनेक कलाकार /चित्रकार मंडळी आहेत. काही आमच्यासारखे बर्‍याच वर्षांनी परत रंगवायला सुरु करणारे आहेत तर काहीजण अगदी सुरवातीपासून शिकण्यासाठी उत्सूक आहेत. आमच्यासारख्यांना बर्‍याचदा रंगवण्यासाठी कुणाच्यातरी मार्गदर्शनाची गरज असते. बर्‍याचवेळा एखादा क्लास /वर्कशॉप /शिबीर इ. ठिकाणी जाणं जमेलच असंही नसतं. अश्या लोकांना या कार्यशाळेच्या माध्यमातून शिकायची संधी मिळेल.

किमान ८-१० जणांचा ग्रूप तयार झाला तर इथे पाटलांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा घेता येवू शकेल, कार्यशाळेचं नक्की स्वरुप कसं असेल हे अजून ठरलं नाही पण कार्यशाळेची अंदाजे रुपरेषा अशी असू शकेल -

"कार्यशाळेचे स्वरुप- मी काही पेंटींग टेक्निक थीअरी वर लिहीन, त्यावर पार्टीसिपन्ट्स प्रश्न विचारु शकतील आणि मी माझ्या परिने उत्तर द्यायचा प्रयत्न करीन , त्यावरुन काही एक्झर्साईज दिले जातील त्यापर्माने पेंट करुन पार्टीसिपन्ट्स इथे पोस्ट करतील ज्याच्यावर क्रिटीक लिहता येइल. तसेच काहि स्टेप बाय स्टेप डेमो, व्हीडीओ करता येतील. अ‍ॅड्मीन ना सांगुन हा क्लोज ग्रूप ठेवता येईल"

ही वरची पोस्ट पाटलांच्या रंगीबेरंगी पानावरून कॉपी केली आहे.

या कार्यशाळेमध्ये सहभागी होण्यासाठी इच्छुक असणार्‍यांनी इथे किंवा पाटलांच्या रंगीबेरंगी पानावर आपलं नाव नोंदवावं.


कार्यशाळेमध्ये सहभागी होवू इच्छिणार्‍यांनी http://www.maayboli.com/node/47426 या ग्रूपमध्ये सामिल व्हावे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Hya upakrama baddal dhanyavaad....me pan maze naav nondavile aahe.

Pages