पॅन केक

Submitted by दक्षिणा on 28 January, 2014 - 05:14
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

एक अंडं, पिकलेलं केळं, २ मध्यम चमचे कणिक, चिमूटभर मीठ १-२ चमचे साखर, तेल किंवा तूप, मध आणि पाणी अगदी पाववाटी.

क्रमवार पाककृती: 

प्रथम एका भांड्यात अंडं फोडून चांगलं फेटून घ्या, त्यात केळ अगदी बारिक कुस्करून घाला. मग त्यात मावेल इतकी कणिक घाला आणि पुन्हा फेटा, मग चिमूटभर मीठ आणि दोन चमचे साखर घाला. मी अत्यंत आळशी असल्याने अंडं मिक्सरच्या भांड्यात फोडून डायरेक्ट व्हिप मोडवर फिरवून त्यातच केळाचे तुकडे, कणिक वगैरे मिक्स करून फिरवते... किंचित घट्ट वाटलं तर पाणि (अगदी थोडं) घालून पुन्हा फिरवते. तव्यावर सरसरित ओतता येईल असं मिश्रण हवं.
गॅसवर नॉनस्टिक किंवा कोणताही तवा तापत ठेवून त्यावर थोडं तेल घालून तवा चांगला तापला की हे मिश्रण वरून गोल गोल करत ओतायचं. आणि झाकण ठेवायचं. साधारण फुलतो.... लक्षात येतो झाला की. तळ साधारण ब्राऊन झाला की पलटायचा...
नंतर प्लेट मध्ये काढून वर फक्त मध ओतून खायचा...

वाढणी/प्रमाण: 
एका माणसासाठी
अधिक टिपा: 

अंडं हाताने जितकं फेटू तितका हा पॅनकेक हलका होता आणि फुलतो... माझा फुलत नाही कारण मी मिक्सरवर मिश्रण करते. एखाद्यावेळेस ब्रेकफास्टला किंवा लाईट डिनर म्हणून चांगला पडतो खायला. होतोही पटकन.

20140107_104842.jpg

माहितीचा स्रोत: 
मैत्रिण. मला तर पॅनकेक हा प्रकार म्हणजे काय माहितही नव्हता.
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

थोडी तांदुळाची पिठी घालून पण चांगला लागतो. तव्यावर घातला की वरून थोडी ड्रायफ़्रूट पावडर घालायची. उलटला की कुरकुरीत होते.

दक्स.....मस्त! ं ब्रेफासाठीचा माझा अत्यंत आवड्ता प्रकार. यात हेच सगळं अर्धा,, कप् दुधात ़ मिक्स करून जर बॅटर ब्नवलं तर पॅनकेक अजून छान होतत.
आणि झाल्यावर वरून थोडं बटर, मध , मिक्स फळांचे तुकडे .....अहाहा!

मानुषी वॉव! कल्पनेनं तोंडाला पाणि सुटलं. Happy

मला पॅन केक हा प्रकार अजिबातच माहिती नव्ह्ता. मैत्रिणीने एके दिवशी करून खाऊ घातला. (अगदीच घरगुती गोष्टी ज्या उपलब्ध होत्या त्यातून) मला खूप आवडला. आणि त्यात बरिच व्हेरिएशन्स पॉसिबल आहेत . Happy

ChocoPancake.jpg
मस्त फोटो (हे मी स्वतःच्या फोटोसाठी लिहिलं नसून दक्षिणाच्या फोटोसाठी लिहिलं आहे याची कृपया नोंद घ्यावी). ज्युनियर मंडळींचा आवडता ब्रेफा आहे हा.
मी बटरमिल्क पॅनकेक घरी बनवते लेकींसाठी. २ अंडी छान फेटून मग त्यात मावेल तितकी साधारण अंदाजानेच कणिक, थोडी सिनेमन पावडर, थोडं व्हॅनिला एक्सट्रॅक्ट, किंचित मीठ आणि बेकिंग पावडर घालून ताकात भिजवते.
तव्यावर टाकले की कधी कधी चॉकलेट चिप्स टाकते त्यावर जरासे. प्लेट्मध्ये खायला घेतल्यावर मग त्यावर मेपल सिरप!

वॉव....खरच मस्त आहे...आज मुलिसाठि नक्कि बनवणार......त्याच बरोबर्,इथे दिलेल्या टिप्स हि आजमाउन बघेन....
शुम्पी, तुमचा केक हि छान फुललाय आगदि....

अंडे नको असल्यास केळ्याचे प्रमाण वाढवावे. फ्लाक्समिल (अळीव पावडर) भिजवून (१ मोठा चमचा + ३-४ मोठे चमचे पाणी) तेही वापरले तर चालते.

मि करुन पाहिले....आगदि फ्लफी झाले नहि (माझच काहितरि चुकल असेल) पण मऊ अणि हलके झाले होते...मुलिने आवडिने खाल्ले.

बॅटर थोडावेल भिझल्यावर (साधारण २ तास) जे बनवले, ते बर्यापैकि फ्लफी झाले.

आणि मि कणिक न वापरता 'नाचणि' च पीठ वापरल....ते हि मस्त झाल होत.....

दक्षिणा मस्त रेस्पी Happy इतके दिवसात अंड असल्याने केला नव्हता कधीच पॅनकेक Sad आतामात्र सा बां ना ब्रे फा ला करुन देण्यात येईल... धन्स गो नविन पर्यायासाठी! Happy

मृणाल मी नाही बॅटर भिजवत वगैरे बसत, लग्गेच करते. बट थॅंक्स एकदा भिजवून प्रयोग करून पहायला हरकत नाही. १० मिनिटं इकडे तिकडे Happy

दक्षिणा अन्ड्याचा वास येतो का याला? आपण केक करतो तेव्हा आपल्याला चव किन्वा वास जाणवतो अन्ड्याचा, तसा. मी विकतचे पॅनकेकचे मिश्रण वापरलेय. अन्डे आपण घालायचे त्यात नन्तर. मी कधी घातले नाही. विकतच्या मिश्रणात मैदा असतो. त्यावेळी माझी मुलगी आम्लेट खात नव्हती म्हणून मी त्यात चक्क हिन्ग, जीरे घालुन त्याचे धिरडेच बनवुन तिला घालायची.:फिदी:

ती आवडीने खायची. गोड तिला अजीबात आवडत नसल्याने मध, सिरप बाजूलाच राहिले. आता तुझ्या पद्धतीने करुन बघते. फोटो भारी आलाय पण. मस्त चकाकी जाणवतेय मधाची.

Pages