इन्ड्क्शन कुकर

Submitted by रज्जू on 17 October, 2012 - 07:15

प्लीज मला सांगा की, कुठल्या Company चा Induction Cook-Top चांगला आहे?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रज्जू, माझ्याकडे प्रेस्टिजचा इंडक्शन कूक टॉप आहे. आतापर्यंत दोन तीन दिवसच वापरला आहे. पण जितका वापरला आहे तितका तरी ठिक वाटला.

तुम्हाला मुख्यत्वेकरून कुठल्या कामासाठी इंडक्शन घ्यायचा आहे?

नंदिनी याबाबत तुम्ही सविस्तर माहिती इथे दिलीत तर इतरांसाठी पण ती उपयुक्त ठरेल.:स्मितः

म्हणजे तुम्ही तो काय काय कामासाठी वापरता वगैरे.

माझ्याकडे बजाज आहे. उत्तम चाललाय. गेल्या महिन्यात सिलेंडरने दगा दिला. बुक केल्यावर दीड महिना उजाडला यायला. मधले तीन आठवडे रोजचा चारीठाव स्वैपाक - पोळ्यांसकट - इंडक्शन वर केला. बरीचशी स्टीलची फ्लॅट बॉटम भांडी, फ्लोरा सारखी कोटिंगची भांडी, पूर्वी कधी आहेरात वगैरे आलेली ब्लॅक कोटिंग असलेली भांडी हे सगळं सगळं त्यावर चालतं. (फक्त निर्लेपच नाही चालली - अगदी खास इंडक्शन कुकिंगसाठी असलेली कढाई आणली होती तीपण. ब्रॅन्डचा काही संबंध आहे का? Proud )

माझ्याकड्चा प्रेस्टिज इन्ड्क्शन कुकरला साईड ने तडा गेलाय. कश्याने झाले असेल ? इन्ड्क्शन कुकर कसा साफ़ करावा?
प्लीज कोणि सागेल का ?

इन्ड्क्शन कुकरमुळे लाईट्बिल जास्त येते का?>>

आम्ही एक महिनाभर केवळ पाणी तापविण्यासाठी वापरला. पहिल्या महिन्यात ७०० आणि दुसऱ्या महिन्यात ११०० रुपये बील आहे. दुकानदार सांगतात, महिन्याला दीडशे रुपयेच जास्त लाईटबील येते. पण ते काही खरं नाही. लाईटबील भरपूर येते, असा माझा तरी अनुभव आहे.

आम्ही २ लोकांचा पूर्ण स्वयापाक करायला वापरायचो. च्या/ नाष्टा/ दोन जेवणे.. बिल फक्त १०० रु जास्त यायचे.

आम्ही पानी, दुध, चहा, कुकर मधे भात-भाजी ई. साठी इन्ड्क्शनच वापरत आहे. लाइट बील १००-१२५ रुपये येत.

प्लिज आता कोनी माझ्याही प्रश्नावर बोलाना.

आम्ही पानी, दुध, चहा, कुकर मधे भात-भाजी ई. साठी इन्ड्क्शनच वापरत आहे. लाइट बील १००-१२५ रुपये येत.

प्लिज आता कोनी माझ्याही प्रश्नावर बोलाना.

इंडक्शन कुकर हे स्त्रीच्या अब्रुसारखं असतं. एकदा तडकलं की गेलं ... आता टाका आणि नवा घ्या.

Happy

-- तडकलेला आय्डी टाकून नवा आय्डी घेतलेली लक्ष्मीबै

इन्ड्क्शन कूक टोप वर इंडक्शन कुकर कसा वापरतात? कोणते सेटिंग आणी टाइम किती सेट करायचा?

Manual time set kara तनुदि
मला maggi company चा induction top gift मिळालाय २ वर्ष वापरतेय सरसकट सगळच (जेवण नाश्ता ) त्यावर बनवते light bill ७००-८०० रूपये महिना

प्रेस्टीज चा कसा आहे इंडक्षन कुक टॉप? कुणी वापरलाय का? त्यात इंडिअन मेनू दिलंय. डोसे वगैरे पण होतात म्हणे.

माझ्याकडे आहे, मी वापरले आहे
पण, गॅसवर केलेल्या स्वयंपाकाइतकी छान चव येत नाही.
आता फाक्त पानि, चहा,दुध, गरम करते

प्रेस्टिजचा गेली चार वर्षे वापरतोय. सुन्दर आहे. घरात ग्यास नाही.

लाइट बिल महिना पाचशे येते.. सर्व लाइट बिल मिळुन

काउ, धन्यवाद गं.
मी घेते आता तोच. मला ४५९५/- रु. मध्ये कूक टॉप बरोबर तीन भांडी मिळ्ताहेत.
बरं आहे डील असं वाटलं. त्यावर इतर भांडी चालतात का?

Induction Cook-Top वर आपली नेहमीची भांडी कुकर्,तवा,कढै वगेरे वापरता येतात का?.मला ग्यासला पर्याय हवाय.

कोणी induction कूक टॉप वर फुलके केलेत का? पापडाची ग्रिल / जाळी वैगेरे वापरून किंवा इतर कोणती पद्धत? कसे होतात? कसे करायचे?