Submitted by जयदीप. on 25 January, 2014 - 07:17
घेतला होतास तेव्हा ध्यास माझा
वाटतो आता तुला वनवास माझा
संपलो मी जन्मल्यावरतीच येथे
होत आहे या जगाला भास माझा
संपलेल्या वादळांचा वेध घेतो
शोधतो आहे कुणी इतिहास माझा
घेतली असती उधारी आज मी, पण
संपला माझ्यातला विश्वास माझा
तो परीक्षा घेत आहे, कळत आहे...
राहिला होता किती अभ्यास माझा !
-जयदीप
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वाह मस्तच सगळे शेर आवडले
वाह मस्तच सगळे शेर आवडले
'भास' आणि 'विश्वास' हे सर्वात
'भास' आणि 'विश्वास' हे सर्वात छान वाटले.
तुम्हा दोघांचे मनापासून
तुम्हा दोघांचे मनापासून आभार...
सुंदर आहे...
सुंदर आहे...
घेतली असती उधारी आज मी,
घेतली असती उधारी आज मी, पण
संपला माझ्यातला विश्वास माझा
व्वा.
माझा एक शेर आठवला.
हा स्वतःवरचा तुझा विश्वास ढळणारा
सांगतो का मान्य तुजला बंधने माझी
धन्यवाद.
हा स्वतःवरचा तुझा विश्वास
हा स्वतःवरचा तुझा विश्वास ढळणारा
सांगतो का मान्य तुजला बंधने माझी >>
व्वा !
धन्यवाद समीरजी, विनिताजी.
जयदीप, पूर्ण गझल चांगली
जयदीप, पूर्ण गझल चांगली झालेली आहे. अभिनंदन!
सगळेच शेर पोहोचले, अप्रतिम
सगळेच शेर पोहोचले,
अप्रतिम गझल.
-
बेफिजी..सुप्रियाजी.... खूप
बेफिजी..सुप्रियाजी....
खूप खूप आभार