म्युच्वल फंड

Submitted by webmaster on 14 May, 2008 - 09:09

म्युच्वल फंड या विषयावरची सर्वसाधारण चर्चा. एखाद्या विशिष्ट फंडाबद्दल चर्चा करायची असेल तर नवीन गप्पांचं पान सुरू करा.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठली साईट? रीडीफची की मायबोलीची? मी दोन्ही लिंक्सवर क्लिक करून बघितले. दोन्ही साईट व्यवस्थित ओपन होत आहेत. मायबोलीची साईट (http://www.maayboli.com/node/21954
) ओपन होत नसेल तर कदाचित तुम्हाला त्या ग्रुपचे सदस्यत्व घ्यावे लागेल किंवा मदतसमितीला किंवा अ‍ॅडमिनना विचारा.

धागा उघडताना कोणता एरर मेसेज दिसत आहे?

तुम्हाला मायबोलीचा धागा उघडताना जो एरर मेसेज येत आहे तो कॉपी करा व "मदतपुस्तिका" किंवा "मदत पाहिजे" या अ‍ॅडमिनच्या धाग्यावर जाऊन तिथे मदत मागा.

in which fund i invest diversified mutual fund or PPF & also suggest me where i invest, pls give me detail

पूर्णिमा, तुम्ही कुठे गुंतवणुक करावी हे पुढील बाबींवर ठरेल :
गुंतवणुकीचा कालावधी(रक्कम किती काळासाठी ठेवु इच्छिता), जोखीम पत्करण्याची तयारी व मनोवृत्ती, कशा प्रकारचा परतावा हवा आहे, एकरकमी गुंतवणूक करायची आहे की नियमित.

कमीतकमी ३-५ वर्षांसाठी गुंतवणूक करायची असेल आणि जोखीम पत्करण्याची तयारी व कुवत असेल तर इक्विटी डायव्हर्सिफाइड फंड्स मध्ये गुंतवणुक करता येईल.

पीपीएफ व अन्य सरकारी योजनांमध्ये जोखीम कमी, फिक्स्ड रेट ऑफ रिटर्न हे फायदे तर मुदतीपूर्वी पैसे न काढता येणे (नो लिक्विडिटी) हा तोटा आहे.

पौर्णिमा,

ही जुन्या धाग्यावरची माहिती -
_______________________________________________

फक्त पति व पत्नीच्याच नावे पीपीएफ खाते असू शकते. मुलांच्या नावे ते उघडता येत नाही. हा नियम २००३-०४ च्या आसपास अस्तित्वात आला. २००३ पूर्वी ज्यांनी मुलांच्या नावे पीपीएफ खाते उघडले होते, ते खाते दरवर्षी फक्त ५०० रूपये भरून खात्याची १५ वर्षे पूर्ण होईपर्यंत चालू ठेवता येते.

>>> १> मुलाचे PPF कधी काढ्ता येते?

मूल १८ वर्षांचे होईपर्यंत अज्ञान समजले जाते. त्यामुळे मुलांच्या नावाने पीपीएफ खाते उघडायचे असल्यास आई किंवा वडीलांचे नाव पालक म्हणून टाकावे लागते. जर पालकांच्या नावे स्वत:चे आधीचे खाते असल्यास मुलांच्या नावाने एक अधिक खाते होते व त्याला आता नियमानुसार परवानगी नाही.

पीपीएफ खात्यातल्या रकमेच्या व्याजावरील करसवलत ही जर तुम्ही आपल्या उत्पन्नातून (पगारातून किंवा व्यवसायातील उत्पन्नातून) पीपीएफ खात्यात रक्कम भरली असेल तरच मिळते. टॅक्स रिटर्न्स भरताना आपल्या पगाराच्या किंवा व्यवसायातील उत्पन्नाच्या खात्यातूनच पीपीएफ मध्ये रक्कम भरलेली आहे याचा पुरावा असावा लागतो (पगाराच्या खात्यातील पासबुकात याच खात्यातून पीपीएफ खात्यात रक्कम भरलेली आहे याची तिथे नोंद असली पाहिजे). त्यामुळे मूल जेव्हा स्वत:चे उत्पन्न मिळवून त्या उत्पन्नातून त्याच्या स्वतःच्या पीपीएफ खात्यात रक्कम रक्कम भरू शकेल तेव्हाच मुलाने स्वतःचे पीपीएफ खाते उघडावे.

माझी ही माहिती अगदी प्राथमिक माहिती आहे. यातील नेमके नियम कळण्यासाठी एखाद्या चार्टर्ड अकाऊंटंटला विचारावे.

>>> १५ वर्शे झाल्यावर जर a/c चालु ठेवायचे असेल तर करता येते का ?

१५ वर्षे पूर्ण झाल्यावर तुम्ही खाते बंद करू शकता किंवा अजून ५ वर्षांकरीता चालू ठेवू शकता (म्हणजे एकून २० वर्षे). २० वर्षे पूर्ण झाल्यावर सुध्दा तुम्ही खाते बंद करू शकता किंवा अजून ५ वर्षांकरीता चालू ठेवू शकता (म्हणजे एकून २५ वर्षे). खाते जिवंत ठेवण्यासाठी खात्यात दरवर्षी कमीतकमी ५०० रूपये भरावे लागतात. एखाद्या वर्षी खात्यात अजिबात पैसे भरता आले नाही तरी पुढील वर्षी मागील वर्षीचे ५०० रूपये अधिक काही नाममात्र दंड (रू. ५०) भरून खाते जिवंत ठेवता येते.

पीपीएफ खात्यातल्या रकमेवर द.सा.द.शे. ८ टक्के सरळ व्याज मिळते. हे संपूर्ण व्याज करमुक्त असते. तसेच खात्यात दरवर्षी जास्तीत जास्त ७०,००० रूपये व कमीत कमी ५०० रूपये भरावे लागतात. या खात्यात भरलेल्या रकमेवर आयकरातून सूट मिळते.

दरवर्षी रू. ७०,००० असे १५ वर्षे भरले तर १५ वर्षांच्या शेवटी खात्यातली शिल्लक १३-१४ लाखांहून अधिक होते. हे खाते जर अजून ५ वर्षे सुरू ठेवले (दरवर्षी ७०,००० भरून) तर २० वर्षांच्या शेवटी ही शिल्लक २४-२५ लाखांहून अधिक होते. या हिशोबाने जर एखाद्याने वयाच्या २५ व्या वर्षी हे खाते उघडले व ३० वर्षे चालू ठेवले तर त्याला वयाच्या ५५ व्या वर्षी ५० लाखांहून अधिक करमुक्त रक्कम मिळेल. या व्यतिरिक्त दरवर्षी कमाल २१ हजार रूपयांची (७० हजारांवर ३० टक्क्यांपर्यंत करसवलत) करसवलत सुध्दा मिळेल.

सर्व राष्ट्रीयीकृत बँकात हे खाते उघडता येते.

i want to do investment for 5 yrs.
when i saw web side which is given information about PPF account
when we do yearly investment Rs.70000/- then returns are Rs.2200000/-
then what u think i invest in PPF account which is the best option for me.

मी २००७ मधे SIP मधे ३ म्युच्वल फंडांमधे गुंतवणूक केली होती. ही गुंतवणूक Tax Saving साठी तसेच चांगला परतावा मिळेल या आशेने केली होती. (ELSS) पण सध्या मार्केट खाली घसरले असल्याने केवळ २००० रुपयाचा फायदा होत आहे. मी फारच निराश झाले आहे. आहे तो फायदा घेउन टाकावा की मार्केट वर येउ शकते. क्रुपया मार्गदर्शन करावे. फंडांची नावे खाली देत आहे.
HDFC Tax Saver (D)
DWS Tax Saver (D)
Kotak Tax Saver (D)

धनश्री: निराश होउ नका उलट हीच संधी आहे आपल्या चुकां मधुन शिकण्याची.

आपण स्वत: खालिल गोष्टी समझून घ्या म्हणजे आपण आपले गुंतवणूक समंधी निर्णय घेउ शकाल...
१. मार्केट वर जाणार का खाली जाणार हे कसे समझते
२. कुठले फंड कुठल्या प्रकारच्या मार्केट मधे चांगला परतावा देउ शकतात

सुरुवात म्हणून खालि टिकची मारावी...
सेनसेक्सची दिशा ओळखा आणि गुंणतवणूकीचे निर्णय ठरवा

सिप बंद केल्यास कुठलेही चार्जेस वा पेनल्टी नाही.
क्वचित कुठल्या स्कीममध्ये एक्झिट लोडची वेगळी पद्धत असल्यास तुमच्या स्टेटमेंटमध्ये तसे नोंदलेले दिसेल.

धन्यवाद भरत.
सिप बंद केल्यावर लगेच फंडमधुन पैसे काढुन घेणे सक्तीचे नसते ना? म्हणजे आहे ती गुंतवणुक तशीच ठेवायची, पण अजुन पैसे भरायचे नाही.

i am investment consultant in Nashik , those who to consult abt their investment or invest in new fund or other investment avenues ,home loan ,insurance , share consultancy etc then pl contact me on my mobile no. 9422260318

सीप सुरू करण्यासाठी योग्य वेळ कोणती? मी असे वाचले की ते मार्केट कन्डिशनवर अवलंबून नसते.
रिलायन्स लिक्विड फंड ट्रेजरी प्लॅन ही स्किम कशी आहे ? प्लिज सुचवा. पहिल्यांदाच सीप करत आहे. कोणताही अनुभव आणि गाईडन्स नाही;माझं मीच रिसर्च करून करतेय.

चैत्रगंधा: अगदी सोप्पे आहे. जर काहिच कळत नसेल तर सरळ Index Fund मधे SIP सुरु करावे. अर्थात तुमचे investment horizon काय आहे त्यावर अवलंबून आहे. शक्यतो १ वर्षापेक्षा जास्त असावे.

रिलायन्स लिक्विड फंड ट्रेजरी प्लॅन - नावावरुन समझते कि हा फंड short term करता वापरावा म्हणजे पैसे केव्हाही काढता येतात कारण load fees नाहियेत. पण त्या प्रमाणेच परतावा सुद्धा FDs सारखाच किंवा जरा कमी असेल. Liquid funds are typically used to "park" your money when you are not certain about the market.

ईथलि माहिति कदाचित उपयुक्त ठरेल...

सध्या अमेरिकन बाजारात गुंतवणूक करणार्‍या फंडसची युनिट्स घेणे फायद्याचे ठरते आहे.

.

I submitted redemption request today. Is it possible to check today's NAV anywhere now? Or when do they declare it?

Pages