हिवाळा आला !

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मेंढ्यांवरी लोकर दाट भारी
थंडीस त्यांच्या बहू निवारी !

हूहू हू हू SSSSS कडकडकडकड SSSSSSS

- हिवाळा आला या चि. वि. जोशींच्या लेखाची सुरुवात.

या वर्षी हिवाळा जरा जास्तीच जाणवतो आहे. स्थानिक वेळेप्रमाणे आज सकाळी मायबोलीच्या मुख्यालयाबाहेरचं तापमान, डीग्री सेल्सियस मधे.
maayboli_is_cool.jpg

सालाबादप्रमाणे यंदाही आमचे येथे श्रीकृपेकरून सुतारपक्षी यांचे आगमन होऊन गेले. कुठलीही भूतदया न दाखवता, त्यांना हाकलून लावून भोके बुजवण्यात आली. माझ्या स्वत:च्या भवितव्यासाठी मी सुतारपक्षाच्या भावी कुटुंबाची वाट लावली याबद्दल पक्षीमित्रांची क्षमा मागतो आणि ते माझ्यावर दया दाखवतील अशी अपेक्षा करतो.
"Maayboli Is Cool" हे शब्दश: खरे ठरते आहे.

प्रकार: 

अजय.. इथे NJ मधे -१६ होतं काल..
मी तर इथे येवुन फक्त एक आठवडा झालाय त्यामुळे तर जास्तच गारठलेय ..

माफीनामा भारीय Lol

अजय Lol

सकाळी साडे सात वाजता बॅटरी ५०% पेक्षा कमी चार्ज कशी? रात्रभर मायबोलीवर टाइमपास करत होता की काय? Happy

सुतार पक्षी आमच्या घरी पण येऊ लागलाय गेल्या वर्षीपासून. भोके नाही पाडली पण चिमणीवर बसून जोरात टर्र्र्र्र्र्र्र्र्र्र आवाज करतो थोड्या थोड्या वेळाने! आख्खं घर हादरतं त्या आवाजाने! माद्यांना त्या ड्रिलिंग सारख्या आवाजाने अट्रॅक्ट करतात म्हणे ते!

माद्यांना त्या ड्रिलिंग सारख्या आवाजाने अट्रॅक्ट करतात म्हणे ते!>>>>> हे बाकी छान सोप्पं केलं बघा निसर्गाने सुतारबुवांकरता. बेस्ट!

हाकलायला शेवटी कुठला उपाय लागू पडला>>>>> जास्तीच ड्र्ड्रिलिंग केलं असेल त्याने आक्का, सुतारबाईंनीच बोअर झालं म्हणून हाकलून दिलं असेल.

>> हे बाकी छान सोप्पं केलं बघा निसर्गाने सुतारबुवांकरता.
का हो बुवा, माणूसबुवांना त्यासाठी फार कष्ट पडतात का? Proud

>>सकाळी साडे सात वाजता बॅटरी ५०% पेक्षा कमी चार्ज कशी? रात्रभर मायबोलीवर टाइमपास करत होता की काय? >> Lol त्यांच्या नशिबात कुठला आलाय टाईमपास? सारखी झाडलोट करायचं काम त्यांच्याकडे.

अजय यांना नक्की मुख्यालयाबाहेरच्या थंडीची तक्रार करायची आहे की सुतार पक्ष्याची?

>>प्यायलाही. Lol

होहो. सुतारपक्षाला हाकलल्यामुळे ग्रे गूस तेवढी आणू नये. Proud

अजय म्हणतील विषय काय, बोलताय काय!..>>
आहो खुद्द मायबोली संस्थापक असं कसं म्हणतील? इतक्या वर्षात सवय झालीच असेल ना त्यांना Lol

सालाबादप्रमाणे यंदाही >> तरी अजून तुम्ही ( मराठी वर्तमानपत्रातील वृत्त्कवींप्रमाणे ) कविता पाडली नाहीत हे काही बरोबर नाही .

किटकिट करतो बाई सुतार
याच्या साठी सुचवा गं उतार

असं काही तरी लिहायचं की Happy

आला थंडीचा महिना, शेकोटी पेट्वा. वगैरे जास्त कॅची टायटल झाल असत. Proud
आमच्याकडे येत्या दहा दिवसात तापमानाची रेंज -७ (सेल्सिअस) पासून २० पर्यंत आहे. feels like काय्पण असू शकते. Proud एक दिवस तर स्नो पण पडनार आहे. Happy
Rottenecards_56712081_pkthzp7wds.png

आज आईस-बर्ग मधून मार्ग काठत ऑफिसला गाठलं.....

20140109_092229.jpg

पोलार-व्हर्टेक्सच्या वेळी पार वाट लागली होती.. वॉटर ट्रॅफिक जॅम झाला होता....त्या मानाने आज -१८ ला ईतका गोठलं नव्हत....माझा मॅनेजर सांगत होता...तो एकेकाळी ब्रूकलिन वरुन चालत आलाय गोठलेल्या बर्फावरुन...