मराठी भाषा दिवस २०१४ - संयोजक हवेत

Submitted by admin on 16 January, 2014 - 23:44

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . गेली ४ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करतो. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना, उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहण्याशिवाय अजून काय काय करावे लागेल हे ही लिहीले तर बरे होईल.

मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.

१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्‍यांची नावे बघून अ‍ॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.

यात संयोजनात भाग घेतलेले मायबोलीकर भर घालतील. Happy

काही मुद्दे अजून विस्तृतपणे हवे असल्यास सांगा. अ‍ॅडमिन/ सल्लागार यांच्याकडूनही सूचना मिळतील.

मी गेल्यावर्षी या संयोजनात भाग घेतला होता. याही वर्षी सहभागी व्हायला आवडेल. पण ५ फेब्रु. पर्यंत घरातील एका लग्नामुळे पुर्णवेळ देता येणार नाही. त्यानंतर पुर्णवेळ देता येईल.

<<<<<<उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना, उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहण्याशिवाय अजून काय काय करावे लागेल हे ही लिहीले
तर बरे होईल.>>>>>>>> + १००
मला नक्की काम करायला आवडेल....

मंजूडी यांनी सविस्तर लिहिले आहेच. त्याव्यतिरिक्त अजून काही माहिती हवी असल्यास विचारा.

याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील. त्यावरून कश्याप्रकारचे कार्यक्रम आतापर्यंत केले ते लक्षात येईल.

मी

मला आवडेल मभादि साठी काम करायला
पूर्ण वेळ नसला तरी जेवढे जमवता येईल तितके काम करायला आवडेल

हो भिडे. का? >>> कुतुहल म्हणून विचारलं.
यावर्षी छान अभिनव उपक्रम घेऊन याल ही अपेक्षा.
अपुर्‍या वेळामुळे मी नियमित काम करू शकणार नाही. तरीही मला जमण्यासारखे काही काम्/मदत असल्यास
हक्काने सांगा.

अभिनंदन आणि सदिच्छा.