Submitted by शर्मिला फडके on 15 January, 2014 - 00:05
जयपूर लिटरेचर फेस्टीवलच्या निमित्ताने मी जयपूर शहरात १७ जानेवारीपासून २१ जानेवारीपर्यंत आहे. दिवसभर लिटफेस्टच्या ठिकाणी (डिग्गी पॅलेस) बिझी असले तरी संध्याकाळी जयपूर शहर शक्य असेल तितके बघायची इच्छा आहे. हे कसे आणि कितपत शक्य होईल माहीत नाही. कोणी मार्गदर्शन करु शकेल का?
अनवट जागा, खाण्याची, खरेदीची ठिकाणे वगैरे सांगा.
सांगानेरला जाऊन तिथला हॅन्डब्लॉक प्रिन्टिंगचा उद्योगही पहायचा आहे, ते जमू शकेल का?
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
सांगानेरला जाऊन तिथला
सांगानेरला जाऊन तिथला हॅन्डब्लॉक प्रिन्टिंगचा उद्योगही पहायचा आहे, ते जमू शकेल का?>> हो ते जयपूर सिटीपासून खूप काही लांब नाहीये. तिथे जाणे शक्य आहे.
मी मागे लिहीले होते मी राजस्थानची माहिती लिहेन. ते राहिलेच. आता परत जाउन शोधते.
स्वाती प्लिज सांग तुला
स्वाती प्लिज सांग तुला जयपूरबद्दल जी काही वेगळी माहिती असेल ती.
नेहमिच्या टुरिस्टी ठिकाणांचा बहुधा फार उपयोग नाही, ती कितपत बघता येतील माहीत नाही, कारण संध्याकाळपर्यंत बहुतेक दरवाजे बंद होतात.
राजमंदिर सिनेमा थिएटर, हे
राजमंदिर सिनेमा थिएटर, हे संध्याकाळी नक्की चालू असते! बघण्यासारखे आहे.
ग्रेट. मी गुगल करुन बघीतलं.
ग्रेट. मी गुगल करुन बघीतलं. नक्की आवडेल तिथे जाऊन सिनेमा पहायला.
मी तिथे डॉन टू बघीतला, थिएटर
मी तिथे डॉन टू बघीतला, थिएटर नक्कीच जास्त चांगले वाटले!
तुम्ही संध्याकाळी लाईट &
तुम्ही संध्याकाळी लाईट & म्युझिक शो बघायला "आमेर" किल्ल्यत जाउ शकता. खुप सुरेख अनुभव. सधारण्तः ६ पासुन शो सुरु होतात थंडीत. अंधार पडला की शो असतो. वेब साइट वर कळेल.
शॉपिंग साठी खच्चुन दुकाने आहेत. पण नीट बघुन घ्यावे लागते. साधारण पणे जे स्वस्त असते त्याकापडांचे रंग जातात. ब्लॉक प्रिंट मस्त मिळते. राजस्थाली म्हणुन गव्हर्न्मेंट चे दुकान आहे ते झकास आहे.
http://rajasthalitest.rajasthan.gov.in/
बाकी चोकी धानी मधे इंटरेस्ट
बाकी चोकी धानी मधे इंटरेस्ट असेल तर जाता येइल. पण ते फार लांब आहे. ( खुप बाजारु झालय आता)
थॅन्क्स मीरा. हा शो बघायला
थॅन्क्स मीरा. हा शो बघायला जमेल. खूप ऐकलंही आहे त्याबद्दल.
हवा महालाजवळ बर्याच ठिकाणी
हवा महालाजवळ बर्याच ठिकाणी उत्तम कुल्फी मिळते, एकंदरीत कचोरी टाइप्स स्नॅक्ससाठी रावत (का लक्ष्मी?) मिठाई.
एका मित्राने राजस्थान
एका मित्राने राजस्थान टुरिझमच्या नाईट टूरची ही लिंक पाठवली आहे.
http://rtdc.in/pcitynt.htm
एकंदरीत कचोरी टाइप्स
एकंदरीत कचोरी टाइप्स स्नॅक्ससाठी रावत (का लक्ष्मी?) मिठाई.>> दोन्ही.
Mawa Kachori - Rawat sweets and Kanji sweets near the bus stand and at LMB.
Ghewar Jaipur Speciality The best shops for this are LMB at Johri Bazar and Rawat Sweets.
LMB - near Johri Bazar,BaniPark, famous for Rajasthani ethinic food, DMB Spl Thali
Rawat Misthan Bhandar - near Station Road famous for Sweets
Lassiwala - Panch Batti chowk, MI Road for great local food
Natraj Restaurant - Panch Batti Mirza Ismail Road for great local food
स्वाती, आंटी की पावभाजी आणि
स्वाती, आंटी की पावभाजी आणि अजून एक दोन धाबे पण फेमस आहेत ना तिथले?
वॉव.. स्वाती,
वॉव.. स्वाती, खाद्यभ्रमंतीकरता उपयुक्त माहिती