Submitted by पुरंदरे शशांक on 13 January, 2014 - 01:22
चाल चाल बाळा ....
चला चला चला
पाय टाका जरा
सोनु मोठी राणी (सोनु मोठा राजा)
काय तिचा तोरा (काय त्याचा तोरा)
पाऊल एकेक
उचला अस्सेच
थोडे थोडे पुढे
टाका हलकेच
डुगडुगु डुगडुगु
होतीये गाडी
जरा गडबडे
मागे पुढे थोडी
कशी आता झाली
हळुहळु चाली
मजा किती किती
द्या बै टाळी....
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान.... ठेक्यात म्हणता
छान.... ठेक्यात म्हणता येते.
"जरा गडबडे
मग पुढे थोडी"
इथे
"जरा गडबडे
मागे पुढे थोडी"
असे केल्यास ??
मनापासून धन्यवाद काका -
मनापासून धन्यवाद काका - सुयोग्य बदल ....
मस्त
मस्त
छान आहे.
छान आहे.
मस्त शेवट जरा हलल्यासारखा
मस्त
शेवट जरा हलल्यासारखा वाटला
खरं की नै सोनू
किती मजा आली<<<< अश्या ओळीने शेवट झाला असता तर ...
असो
आपण ह्या बालसाहित्य-विषयात तज्ञ आहात मी फक्त सुचेल ते बोलून टाकले
धन्यवाद