Submitted by जयदीप. on 11 January, 2014 - 05:08
तुटण्याआधी तुटलो होतो
तुटण्यासाठी जुळलो होतो
तितका दोषी नव्हतो नक्की
जितका दोषी ठरलो होतो
कुठला होतो कुठला झालो
भलती वळणे वळलो होतो
जिकडे तिकडे तुटक्या काचा
अगणित वेळा फुटलो होतो
लढता येते, लढलो नाही
लढण्याआधी हरलो होतो
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
तितका दोषी नव्हतो नक्की जितका
तितका दोषी नव्हतो नक्की
जितका दोषी ठरलो होतो
व्वा.
छान
छान
समीरजी,
समीरजी, वैभवजी........
धन्यवाद....
जिकडे तिकडे तुटक्या
जिकडे तिकडे तुटक्या काचा
अगणित वेळा फुटलो होतो<<< मस्त
धन्यवाद बेफिजी...
धन्यवाद बेफिजी...
छान
छान
धन्यवाद अरविंदजी...
धन्यवाद अरविंदजी...
२,५..... जबरदस्त शेर
२,५..... जबरदस्त शेर
सुर्रेखच ......
सुर्रेखच ......
आवडल
आवडल