बी मेरवान गुडबाय!!!!

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

मुंबईतं ग्रान्ट रोड स्टेशनच्या बाहेर पडल की अली भाई रेमजी रोड वर 'बी मेरवान' ही बेकरी दिसते. गेले ९१ वर्ष ही बेकरी आहे तिथेच आहे. त्यांचा मेनू सुद्धा उभ्या ९१ वर्षात कधी बदलला नाही. ह्या बेकरीत मिळणारा मावा केक, मावा सामोसा, प्लम केक, इरनी चहा, बन मस्का पावा, हॉट केक, अंडा भुर्जी ह्यांची जशी होती तशीच आजही टिकून आहे. मावा केकची पहिली बॅच सकाळच्या ८ पर्यत संपून गेलेली असते आणि शेवटची बॅच ५:३० ला. बेकरीमधील खुर्च्या झेकोस्लॉहोकीयामधून आणलेल्या आहेत तर छताला लागून असलेल्या टाईस ईटालियन आहेत. असे हे 'बी मेरवान' मार्चमधे बंद होत आहे Sad अजून थोडा अवकाश आहे. जे मुंबईत आहेत त्यांनी एकदा तरी ह्या बेकरीमधे पाय ठेवावा!!!

merwan3.jpgMarwan1.jpgmerwan4.jpgmerwan5.jpg

विषय: 
प्रकार: 

मेरवानचे केक पुर्वी आवडायचे, आता नाही आवडत. मला तरी टेस्ट आता बदलल्यासारखी वाटते.

अंधेरीला पण एक मेरवान नावाचं दुकान आहे (ह्या मेरवानचा त्या मेरवानशी नामसाधर्म्य इतकाच संबंध आहे) तिथले केक इथल्या पेक्षा जास्त चांगले वाटले होते, जेव्हा खाल्ले होते.

वाईट वाटले वाचून! या माहितीसाठी आभारी आहे. गतकाळातील स्मृतींवर आपला हलकासा ठसा उमटवणार्‍या अश्या खाणाखुणा नष्ट होतात तेव्हा प्रत्यक्षात काहीच फरक पडत नसला तरी कुठेतरी तुटल्यासारखे वाटतेच.

पुण्यातीलही अश्या असंख्य खाणाखुणा आठवतात, वाईट वाटते.

मार्चच्या आधी नक्कीच भेट देईन. मुलीला एकदा इराणी रेस्तरां काय असते ते दाखवुन आणायचे आहे, सगळी बंद होण्याआधी.

बंद होणार?? Sad कशी कुठून समजली ही बातमी?
मला अजूनही आवडतात इथले मावा केक आणि मावा पॅटीस.
लवकरच गेलं पाहिजे.

मेरेकु मेरवान पता नही... त्यामुळे असेल पण धाग्याचे शिर्षक आणि धागाकर्त्याचे नाव वाचुन भलताच अर्थ निघाला Uhoh

बी Light 1

कशी कुठून समजली ही बातमी?>>> मिडडेमधे आली होती की.

मेरवानच्या मावाकेकपेक्षा आमचा जीव अंडाभुर्जी आणि चहामधे जास्त अडकलेला असायचा.

चर्चगेट स्टेशनजवळचं स्टेडियम चालू आहे ना अजून?

मेरेकु मेरवान पता नही... त्यामुळे असेल पण धाग्याचे शिर्षक आणि धागाकर्त्याचे नाव वाचुन भलताच अर्थ निघाला >> +१

गेल्या आठवड्यात वाचली बातमी. वाईट वाटलं. अजूनही भारतवारीत मावा केक खाणं हा महत्त्वाचा भाग असायचा. Sad
हाऊ ग्रीन वॉज माय व्हॅली!

कोणीतरी मावा केकची रेसिपी मागा मेरवानकडे. Happy

मी मेरवानचे केक पुर्वी खाल्लेत, हल्ली बरेच वर्षे नाही खाल्ले, तेव्हा आवडायचे.>>>> मला अजूनही आवडतील,पण
तिथे एवढ्या पहाटे जाणे अशक्य!

माझे बाबा नेहमी तिथुन केक्,पेस्ट्री आणायचे. गेल्याच वर्षी बाबा गेले. ....
बेफिकीर म्हणतात .......गतकाळातील स्मृतींवर आपला हलकासा ठसा उमटवणार्‍या अश्या खाणाखुणा नष्ट होतात तेव्हा प्रत्यक्षात काहीच फरक पडत नसला तरी कुठेतरी तुटल्यासारखे वाटतेच......अगदी१००% खरे आहे.
ग्रान्ट रोडचे पुर्वेचे ब्रिजच्या खालचे "ए-वन" पारसी हॉटेल अजुन आहे का?