इरावती कर्वे

Posted
10 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
10 वर्ष ago

इरावती कर्वे काहीतरी ग्रेटच होत्या. अस व्यक्तिमत्त्व बघायला आणि वाचायला मिळण म्हणजे मी मराठी मनुष्य म्हणून जन्माला आलो त्याचे केवढे तरी अप्रुप वाटते आणि मला वाचनाची आवड आहे त्याचे अजूनच! पण आपण वाचायला लागतो आणि ती आवड आपल्यात निर्माण होते ह्याचे सर्वात पहिले कारण असावे ते म्हणजे आपण हाती घेतलेले पुस्तक. हाती पहिलेच पुस्तक यावे आणि ते सडकछाप निघावे म्हणजे त्या वाचकाला परत पुस्तक हाती धरावेसे वाटेल का? बहुतेक नाही!

मी इरावती कर्वेंचे सर्व साहित्य वाचल अस नाही पण जेवढ बाजारात मला मिळत गेल आणि मित्रांच्या कपाटात सापडत गेल तेवढ मी मनलावून गर्क होऊन वाचल आहे. मला कधीच आहे तेथून उठावस वाटल नाही. आपण काहीतरी वेगळच वाचतो आहे आणि नुसते वाचत आहोत असे नाही तर वाचता वाचता ज्या भावना वर वर उचंबळून येतात त्याचे श्रेय केवळ बाईंच्या लिखाणाला. ऐरवी कित्येक दिवस महिने वर्षानुवर्षे आपल्या बुद्धीला चालना देणारे, आपल्याला विचार करण्यास भाग पाडणारे साहित्य शोधून शोधून आपण थकून दमून हताश होऊन जातो पण आपल्याला ते सापडत नाही. मग एक वेळ अशीही येते मी आपण आउटडेटेड झालो आहोत. आपला मेंदू निष्कामी झाला आहे. आपण फक्त जीव आहे म्हणून तगत आहोत असे वाटायला लागते.

इरावती कर्वे जे काही लिहितात त्याचे दोन भाग पडतात. एक त्यांचे खरेखुरे अभ्यासू लिखाण. कारण, त्या एक संशोधक होत्या. अस काही लिहिताना त्यांची भाषा वेगळी असायची. आणि दुसरे लिखाण एक संपुर्ण अनुभवावर आधारलेले. म्हणजे आपण प्रवासाला निघालो की त्या अनुषंगाने दिसत जाणारे जग त्यांनी जगापुढे वाचकांपुढे मांडले. त्यांची विचार करण्याची पद्धत किती सुसुक्ष्म होती हे त्यांचे लिखाण वाचताना मला तरी वारंवार कळत गेले. त्या खूप चौकस होत्या. त्यांचे इतिहासाचे ज्ञान आणि त्याहून दहापटीने अधिक पुराणाचे ज्ञान केवळ महान होते.

आज मी पुन्हा एकदा युगांत वाचायला घेतले. मग ते खाली ठेवून त्यांनाच आठवत राहिलो. मी कधी त्यांना भेटलो नाही. त्यांच्या मृत्युनंतर अनेक वर्षांनी मी जन्माला आलो. खूप वेळ निघून गेल्यानंतर मी उठलो तर वाटले खरच बाई आपल्याला दर्शन देऊन गेल्यात.

बी

विषय: 
प्रकार: 

इरावती कर्व्यांचं फक्त 'युगांत' आणि एक प्रवासवर्णन ( नाव विसरलो, काश्मिर यात्रेबद्दल आहे) वाचलयं.
दोन्ही पुस्तके आवडलीत. त्यांच्या लिखाणातील सहजता आणि अतिरंजतेचा मोह न करता केलेले अनुभव कथनामुळे लिखाण आवडलं. अजून साहित्य वाचायचयं त्यांचं.

परिपुर्ती वाचलं आहे का? ललित लेख संग्रह आहे. ईरावती कर्वेंची संसारी बाईची बाजु, विशेषतः एका आईची, खुपच छान कळून येते यात!! वाचलं नसेल तर जरूर वाचा!!!!

परिपूर्ती आणि भोवरा दोन्हीही मस्ट रीड, विशेषतः भोवरा मधले त्यांचे 'आजोबा' हे धोंडो केशव कर्व्यांचे व्यक्तीचित्र एकदम खास.
इरावती बाईंच्या संसारी आणि संशोधक अशा काही दोन स्वतंत्र 'बाजू' नव्हत्याच, त्या जीवनाच्या सगळ्याच अंगांना सारख्याच उत्सुकतेने आणि उत्कट्तेने भिडायच्या.

<<परिपूर्ती आणि भोवरा दोन्हीही मस्ट रीड, विशेषतः भोवरा मधले त्यांचे 'आजोबा' हे धोंडो केशव कर्व्यांचे व्यक्तीचित्र एकदम खास.>> +१

sagaLeech sundar aahet pustake paN gangaajaL sarwaadhik aawaDale malaa!!!!

madhech Devnagaree band kaa paDale?

परिपूर्ती आणि भोवरा दोन्हीही मस्ट रीड, विशेषतः भोवरा मधले त्यांचे 'आजोबा' हे धोंडो केशव कर्व्यांचे व्यक्तीचित्र एकदम खास.>>> +१. त्यांच्या जाणीवा त्या काळाच्या मानाने पुढारलेल्या होत्या. त्यांचं लिखाण कधी "हे किती सुंदर आहे, हे किती छान आहे" असल्या लालित्यामधे अडकून राहिलं नाही. भाषा अगदी सरळ, धारदार आणि सुस्पश्ट.

त्यांनी लिहिलेला परिपूर्तीमधला उत्खननाच्या अनुभवावरचा लेख माझा सर्वात आवडता आहे.

बी, खूप छान लिहिलंय, मलापण इरावती कर्वेबद्दल खूप आदर आहे, शाळेत असतानापण त्यांचा मराठीत धडा असायचा, त्याकाळी एवढी शिकलेली, संशोधक व्यक्ती आणि तरीसुद्धा ललितलेखनपण एवढे ओघवते आणि प्रभावी ह्याचे खूप कौतुक वाटते मला.

इरावती कर्वे जे काही लिहितात त्याचे दोन भाग पडतात. एक त्यांचे खरेखुरे अभ्यासू लिखाण. कारण, त्या एक संशोधक होत्या. >> मी इरावती कर्वे यांनी लिहिलेले ललित लेख / पुस्तकेच (गंगाजल, परीपूर्ती आणि भोवरा) वाचली आहेत. याव्यतिरिक्त त्यांच्या अभ्यासू / संशोधनपर लेखासाठी कोणते पुस्तक सुचवाल?

काळाच्या खूपच पुढे होते कर्वे कुटुंब सर्वार्थाने. इरावती शोभल्या त्यात . एरवीही स्वयंप्रकाशी होत्या. त्यांच्या नर्मविनोदाला तोड नाही.मराठी परिप्रेक्षात विद्वत्ता वाचनीय झाली ती बाईंमुळे.
युगांत, भोवरा,परिपूर्ती यांचा उल्लेख आलाच आहे.घरात यातले एकतरी पुस्तक पाहिजेच .

त्यांनी मराठीत शेवटचा लिहिलेला लेखसंग्रह 'संस्कृती '.पहिले दोन लेख महाभारत व रामायण यांच्या तौलनिक चिकित्सेवर आहेत. 'महाभारत हा इतिहास अन रामायण हे काव्य ' ही बाईंची मूळ धारणा.तीन लेख मग रामायणावर आहेत.'मुलांच्या औरसत्वासाठी सीतेने शेवटचे दिव्य केले' असे बाई मांडतात.त्यांची लेखणी इथे अव्यक्त भावूकतेने ओथंबली आहे.धर्म हा मुक्तचिंतनात्म दीर्घ लेख आहे. त्यात सत -असत , संस्कार यावर मूलभूत चिंतन आहे.

तशाच दीर्घ परिशिष्टात बाईंना , हा त्यांचा शेवटचा संग्रह ठरल्यामुळे श्रद्धांजली वाहिली आहे ती तशाच तोलामोलाच्या व्यक्तिमत्वाने.नरहर कुरुंदकरांनी ..

मनातली बाईंची जागा अनन्य आहे. त्यांच्यानंतर क्लेम फक्त त्यांच्याच कन्येचा! अत्यंत भिन्नप्रकृती गौरी देशपांडे यांचाच !

भारती, मी पण इरावती आणि गौरी देशपांडे दोघींचीही फॅन. इरावती बाईंची युगान्त, परिपूर्ती ही पुस्तक आणि 'तू ती मीच का' ह्या किंवा अशाच काहीशा नावाचा लेख सगळ्यात आवडते.

मी फक्त युगान्त वाचलय. भाषा अतिशय स्पष्ट आणि लिखाण एकदम टू द पॉईंट आहे त्यातले. आता बाकीचीही वाचायला हवी.

परिपूर्ती, भोवरा, गंगाजल आण युगान्त वाचलीयेत.
युगान्तची पारायणे.
मी १७-१८ वर्षांची असताना युगान्त हातात पडले. सगळे अमजले असे नाही तेव्हा पण बरेच पडदे झडून गेले दृष्टीवरचे.

मी पण इरावती आणि गौरी देशपांडे दोघींचीही फॅन. इरावती बाईंची युगान्त, परिपूर्ती ही पुस्तक आणि 'तू ती मीच का' ह्या किंवा अशाच काहीशा नावाचा लेख सगळ्यात आवडते.>>>> +१००

'युगान्त'मुळे बाईंची ओळख झाली. प्रस्तावनेतलं 'माझं म्हणणं कोणाला पटलं नाही तर मला वाईट वाटत नाही, कळलंच नाही असं झालं तर मात्र वाटतं' अशा अर्थाचं वाक्य वाचून त्यांच्या प्रेमात पडले.
'युगान्त'पासून सुरू झालेलं मैत्र नंतर वाचलेल्या परिपूर्ती, भोवरे, गंगाजल आणि संस्कृती या पुस्तकांबरोबर वृद्धिंगतच होत गेलं.

पुढे दुर्गाबाईंच्या 'आठवलं तसं' पुस्तकात इरावतीबाई फ्रॉड होत्या, कोणत्याश्या बाईंचा ओव्यांचा संग्रह त्यांनी हरवला असं सांगून पुढे आपल्या नावाने प्रकाशित केला इ. आरोप वाचले. आरोप पटले नाहीतच, पण ते असे त्यांच्या पश्चात (त्या स्वतःला डिफेन्ड करू शकत नाहीत अशा परिस्थितीत) जाहीर करणंही आवडलं नव्हतं. असो.

तुम्हा सर्वांचे अभिप्राय मला मनापासून आवडले. धन्यवाद मित्रांनो. आपल्याला आवडलेल काहीही दुसर्‍यांशी वाटून घेताना त्यांनी आपल्या चवीची दाद द्यावी आणि आपला त्या गोष्टीमधला आनंद द्विगुणित व्हावा तसे काहीसे मला वाटत आहे.

प्रसाद, हो मी दुर्गा भागवतांचे 'आठवले तसे' वाचले आहे आणि वर स्वाती अंबोळेची जी प्रतिक्रिया आहे तिच माझी देखील आहे. मला दुर्गाबाईसुद्धा खूप आवडतात. कुठल्यातरी, बहुदा २००१ च्या हितगुजच्या दिवाळी अंकात, मी दुर्गाबाईंवर श्रद्धांजलीपर लेख लिहिला होता. तो लेख इथल्या वाचकांना खूप आवडला होता.

मला शाळेत कधी इरावती कर्वंचे धडे होते असल्याचे आठवत नाही. बहुतेक माझ्या बहिणीला असावेत. इरावती कर्वेंची काही पुस्तके ईंग्रजी भाषेत आहेत ते मला इथल्या ग्रंथालयातून वाचायला मिळालीत. पण त्यांचे खरे साहित्य हे म्हणजे त्यांनी केलेले ललित लेखन!

त्यांच्या पुस्तकांची यादी मला जी माहिती आहे तेवढी इथे पुरवतो आहे:
ईंग्रजीतून लिहिलेली पुस्तके:
Hindu Society - an interpretation (1961)
Kinship Organization in India (1953)
Maharashtra -Land and People (1968)

मराठी पुस्तके:
युगांत
भोवरा
आमची संस्कृती
संस्कृती
गंगाजल
परिपुर्ती

ह्या व्यतिरिक्त, 'वाचू आनंदे' च्या अंकांमधे बाईंनी दिवाळी अंकांमधे हे लेखन केल त्यातील काही लेखन प्रकाशित करण्यात आलेले आहे. उदा: लंडनचा हिवाळा हा एक लेख मी वाचल्याचे मला आठवते आहे.

निलिमा गुंडी ह्यांनी 'इरावती कर्वे : व्यक्ती आणि वाङ्मय ' असे एक पुस्तक लिहिले आहे. मी वाचले नाही.

परिपूर्ती आणि भोवरा दोन्हीही मस्ट रीड, विशेषतः भोवरा मधले त्यांचे 'आजोबा' हे धोंडो केशव कर्व्यांचे व्यक्तीचित्र >>>> +१

पु. लं. नी इरावतीबाईंचे व्यक्तीचित्रण लिहिले आहे. ते ही एकदा वाचण्यासारखे च आहे. विशेषतः त्यांच्या म्रुत्यूनंतर इतक्या वर्षांनी जन्मलेल्या आपल्या पिढीला त्या कशा होत्या याबद्दल पु. लं. च्या शब्दात वाचणे म्हणजे आहा!