गाओ मॅरॅथॉन २०१४ : ..... तर तो/ती कुठलं गाणं म्हणेल? (भाग ६)

Submitted by मामी on 6 January, 2014 - 22:07

मायबोलीकर, सर्व प्रथम तुम्हा सगळ्यांना नविन वर्षाच्या शुभेच्छा!

गाओ, अर्थात गाणे ओळखा!.

तर तो/ती कोणतं गाणं म्हणेल? या धाग्यांतर्गत आज दिवसभर एक कोड्यांची मॅरॅथॉन आयोजित केली आहे. आज भारतीय वेळेनुसार सकाळी ९ वाजल्यापासून दर तासाला नवनविन कोडी इथे दिली जातील. तुम्हा सगळ्यांना ही कोडी डीकोड करायची आहेत. म्हणजे त्यातली गाणी ओळखायची आहेत.

बक्षिसं तर आहेतच अर्थात.....

तर थोड्याच वेळात मॅरॅथॉन सुरू होत आहे. लक्ष ठेवा! लक्ष ठेवा!! लक्ष ठेवा!!!

- टीम : जिप्सी, स्वप्ना_राज, माधव, मामी

**********************************************************************************************************
१. कोड्यांना क्रमांक दिले आहेत. उत्तरे लिहिताना तो क्रमांक नमुद करावा.
२. जी पहिले बरोबर उत्तर देईल ती व्यक्ती विजेती ठरेल.
३. लागोपाठ दोन बरोबर उत्तरं आली तर त्यातील ज्या पहिल्या उत्तरात कोड्याचा योग्य क्रमांक नमुद केला आहे ती व्यक्ती विजेती ठरेल.
४. नविन कोडी हेडर मध्ये टाकली जातील. जी कोडी सुटतील ती हेडरमधून खाली प्रतिसादांत हलवली जातील. त्यामुळे कोडीत्सुकांनी प्रामुख्याने हेडरवर लक्ष ठेवावे.
५. कोडी लगेच सुटली नाहीत तर क्ल्यू दिले जातील. ते देखिल हेडरमध्येच टाकले जातील.
६. बक्षिसांबद्दल कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
७. ऐकूणच कोणतीही तक्रार ऐकून घेतली जाणार नाही.
८. आक्षेप नोंदवण्यास सक्त मनाई आहे.

**********************************************************************************************************

सर्व भाग घेणार्‍यांचे आणि विजेत्यांचे मनःपूर्वक आभार आणि अभिनंदन!!!

गाओ मॅरॅथॉन २०१४ मध्ये मंगळवार दिनांक ७ जानेवारीला (भा.वे.नु) ९.०० वाजल्यापासून ते बुधवार दिनांक ८ जानेवारीपर्यंत (भा.वे.नु.) ११.३० पर्यंत एकूण ४५ कोडी विचारली होती.

कोडी बनवण्याची जबाबदारी घेतली होती टीम मेंबर्सनी - स्वप्ना_ राज (१४ कोडी), जिप्सी (१७ कोडी), माधव (२ कोडी) आणि मामी (१२ कोडी).

कोडी सोडवण्याची जबाबदारी यशस्वीरित्या पार पाडली : अश्विनी के (२ कोडी), झकासराव (१), श्रद्धा (१६), भरत मयेकर (८), मॅक्स (१), PracheeS (१), स्निग्धा (३), केदार जाधव (१), चमन (१), झिलमिल (७), साती (१), केया (१), स्वाती_आंबोळे (३), इश्श (१) यांनी.

बक्षिसं जिप्सी यांनी स्पॉन्सर केली होती.

आशा आहे की आपण सगळ्यांनी या मॅरॅथॉनचा मनापासून आनंद लुटलात. (आम्ही तरी एंजॉय केलं बुवा!)

आमच्या टीमतर्फे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कोडं क्र ११ सोडवलं आहे PracheeS यांनी. आणि त्याबद्दल त्यांना मिळत आहे :

आणि एक आंतरपाट. तो नको असेल तर साधा पाट मिळेल.

कोडं क्र. ११ : स्वप्ना_राज --> PracheeS

'ओके. तर तुम्ही General Administrator च्या पोझिशनसाठी अप्लाय केलाय?' खुर्चीवर बसलेल्या माणसाने चष्मा डोळ्यांवर चढवत विचारलं.
'यस सर. ही माझी क्कालीफिकेशन्स ची फाईल.' निलेश म्हणाला.
'बघतो मी. पण मला एक सांगा. तुमचं लग्न झालंय का?'
'आ? नाही. म्हणजे अजून झालं नाहीये पण ठरलंय. मी आणि माझी मैत्रीण पुढच्या महिन्यात लग्न करतोय'
'मग ठीक आहे. त्याचं काय आहे आम्हाला ह्या पोझिशनसाठी विवाहीत लोकांनाच कन्सिडर करायला सांगितलं गेलंय.'
'असं का?'
'आमचे मालक जरा conservative विचारांचे आहेत म्हणा हवं तर.'
इंटरव्ह्यू नंतर त्या माणसाने निलेशला तो सिलेक्ट झालाय असं सांगितलं. अर्थात त्याचं लग्नाचं सर्टिफिकेट सादर केल्यावरच त्याला appointment letter मिळणार होतं. आवडीचं काम आणि चांगला पगार असल्याने अट थोडी विचित्र वाटली तरी निलेशने खळखळ केली नाही.

पण त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा तो सारिकाला भेटला तेव्हा त्याच्या डोक्यावर जणू बॉम्ब पडला.

'आपलं लग्न नाही होऊ शकत निलेश.'
'काय बोलते आहेस तू सारिका?'
'माझ्या बाबांच्या एका जवळच्या मित्राच्या मुलाचं स्थळ आलंय. डॉक्टर आहे तो आणि अमेरिकेत स्थायिक आहे. परत ओळखीतलं स्थळ म्हणून आईबाबा खुश आहेत. ते माझं लग्न त्याच्याशीच लावून देणार.'

निलेशला पुढचं काही ऐकू आलं नाही. एकतर सारिका दुरावणार हा त्याच्यासाठी धक्का होता. तिच्या घरून परवानगी मिळेल असं ते दोघं धरूनच चालले होते. असं काही होईल असं त्याला स्वप्नातही वाटलं नव्हतं. दुसरी गोष्ट अशी की ही नोकरी मिळणार म्हणून त्याने आधीची सोडली होती. आता लग्नच नाही म्हटल्यावर नवी नोकरी हाताची जाणार हे उघड होतं.

गाणं म्हणण्यासारखी त्याची अवस्था असती तर त्याने कोणतं गाणं म्हटलं असतं?

उत्तर:

जिए (G.A. -> General Administrator) तो जिए कैसे
बिन आपके

साजन (१९९१)
http://en.wikipedia.org/wiki/Saajan
http://www.youtube.com/watch?v=SSyraGOD7-8

कोडं क्र. १३

चैन से हमको कभी आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर पीना तो पीने ना दिया

९ साठी एकतरी क्लू आवश्यक.

कोडं क्र. १३ : माधव --> श्रद्धा

टेकडीच्या पायथ्याशी असलेले भंगारचे गोडाऊन. त्यातली एक जूनी मोडकी क्रेन. त्या क्रेनच्या जाड्जूड साखळदंडाच्या आडोशाने तीन उंदीर रहात असतात - मिकी, मिनी आणि जेरी. मिकी सतत मिनीला त्रास द्यायचा . कधी कधी तर तिला जीव नकोसा होऊन जायचा. पण खरी गोष्ट अशी होती की मिकीचे मिनीवर खूप प्रेम होते. पण त्याला वाटायचे की मिनीचे जेरीवर प्रेम आहे . म्हणून त्याची चिडचिड व्हायची आणि मग तो तिला त्रास द्यायचा.
एकदा गंजून गेलेली ती क्रेन कोसळते आणि एकच हलकल्लोळ माजतो. त्या गोंधळात मिकी आणि मिनी धूम पळत सुटतात. सारा दिवस पळाल्यावर ते शहरात येतात. दोघांनाही प्रचंड भूक लागलेली असते. इतक्यात त्यांना खीरीने भरलेले भांडे दिसते. दोघेही खूष होतात. मिनी खीर खायला लागणार इतक्यात मिकी तिची शेपटी ओढून तिला मागे ओढतो.
मिनी: खाऊ दे ना रे. तू पण खा. भरपूर आहे खीर.
मिकी: अगं वेडाबाई त्यात उंदीर मारण्याचे औषध घातलय. भूकेमुळे तुला वास नसेल आला.
मिनीला सत्य समजल्यावर ती एक गाणे म्हणून मिकीचे आभार मानते. ओळखा ते गाणे.

उत्तर :

चैन से हमको कभी, आपने जीने ना दिया
जहर भी चाहा अगर, पीना तो पीने ना दिया

प्राण जाये पर वचन न जाये (१९७४)
http://en.wikipedia.org/wiki/Pran_Jaye_Par_Vachan_Na_Jaye
http://www.youtube.com/watch?v=Yc1MfFxpYEI

कोडं क्र. १६ : मामी --> केदार जाधव

मनधीर आणि मनकर्णिका यांचं आता प्रेम राहिलं नसलं तरी ते दोघे अजूनही घनिष्ठ मित्र-मैत्रिण होतेच. त्यामुळेच नंतर जेव्हा मनकर्णिकेचं गावगुंड पक्याबरोबर प्रेम जमलं तेव्हा मनधीर कळवळलाच.

तिनं हा असला वेडेपणा करू नये असं तो तिला वारंवार सांगत असे. पक्यालाही हे माहित होतं आणि मनकर्णिका आपल्यापासून दूर जाऊ नये म्हणून तो तिला मनधीरला भेटूही देत नसे. शिवाय त्याच्या विश्वासातले दोघेजण - गुंड लोचन लंगडा आणि गुंडी खतरा नेत्रा - सतत मनकर्णिकेच्या मागावर असतच.

पण तरीही मनकर्णिका अधून मधून मनधीरला भेटत असेच आणि याचा रिपोर्ट ते दोघे गुंडं लगेच पक्याला देत असत. शेवटी पक्या वैतागलाच. या मनधीरलाच गायब करतो म्हणजे न रहेगा बांस, न बजेगी बांसुरी असा विचार करून त्यानं त्याच्या गुंडांना आदेश दिला की मनधीरला किडनॅपच करा आणि डांबून ठेवा.

मनधीर गायब झालेला पाहून मनकर्णिकेनं ओळखलं की ही पक्याचीच करणी असणार. तिनं पक्याला सरळ जाऊन सांगितलं......

उत्तर :
जानेमन जाने मन (स्वतः मनकर्णिका)
तेरे दो नयन (लोचन लंगडा आणि खतरा नेत्रा)
चोरी चोरी ले के गये
देखो मेरा मन (मनधीर)

छोटीसी बात (१९७५)
http://en.wikipedia.org/wiki/Chhoti_Si_Baat
http://www.youtube.com/watch?v=ats8Y1yzgPI

१०१ Happy

कोडं क्र. ९

जब अंधेरा होता है
आधी रात के बाद..
एक चोर निकलता है
काली सी सडक पे..
ये आवाज आती है..
चोर चोर...

राजेश खन्ना, शर्मिला टागोर (राजा रानी)

कोडं क्र. ९ : स्वप्ना_राज --> श्रद्धा

'Good God Holmes! How in the world did you know that the thief is going to be roaming this particular street at this time?' Dr. Watson asked incredulously.

'Elementary my dear Watson! It's well past midnight and all the other streets in this city are painted pink.' Holmes said in a matter-of-fact manner.

'I still don't understand' said Watson in a puzzled tone.

शेरलॉक होम्सला हिंदी येत असतं तर त्याने कुठलं गाणं म्हणून डॉक्टर वॉटसनचं शंकानिरसन केलं असतं?

क्ल्यूजः
१. फेमस सुपरस्टार आणि त्याच्या बरोबर जोडी गाजवलेली हिरॉईन.
२. डिटेक्टिव्ह कोणाच्या मागावर असतो?

उत्तर:

जब अंधेरा होता है, आधी रात के बाद,
एक चोर निकलता है, काली सी सडक पर

राजा रानी (१९७३)
http://en.wikipedia.org/wiki/Raja_Rani_%281973_film%29
http://www.youtube.com/watch?v=yhjd83b3U_E

आणि कोडं क्र. १७ सोडवण्याचा मान पटकावला आहे स्निग्धानं. तिला बक्षीस मिळत आहे :

आणि एक आंतर्देशीय पत्र.

कोडं क्र. १७ : जिप्सी --> स्निग्धा

ह _ _
_न
_
_त
_ _
_त
मे
लि_

_ल_ _
_ल_
ग_
_ _रे
व_

उत्तर:

हमने सनम को खत लिखा
खत मे लिखा
ए दिलरूबा दिलकी गली शहरे वफा

शक्ती (१९८२)
http://en.wikipedia.org/wiki/Shakti_(1982_film)
http://www.youtube.com/watch?v=vUaLOTcyL3U

चहा बरोबर श्रध्दानं कोडं क्र. १९ फस्त केलं आहे. त्याबद्दल तिला बक्षिस :

आणि मायबोली लोगोचा एक स्टीकर.

Pages