Submitted by जयदीप. on 1 January, 2014 - 04:57
इतका परका झालो आहे
मला पाहुणा झालो आहे
इतका हळवा नव्हतो मी पण
नकळत आता झालो आहे
खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे
कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे
तुझा कधी ना होऊ शकलो
तसा कुणाचा झालो आहे?
-जयदीप
(थांबायला होत नाही.. अजून लिहीन म्हणतो ..पुन्हा क्षमस्व.. )
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
व्वा. सहज आहे. गझल फार
व्वा. सहज आहे. गझल फार आवडली.
कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे
सुंदर गझल
सुंदर गझल
खोटे हसणे शिकलो आहे आता मोठा
खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे
कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे
तुझा कधी ना होऊ शकलो
तसा कुणाचा झालो आहे?
व्वा!
शेर अगदी मस्त, सुलभ. शेवटच्या शेरातला खयाल न्युमरसली रीपीटेड असला तरी चांगला वाटत आहे तो शेर.
उगाच आव आणून लिहिण्यापेक्षा मनापासून लिहिले की गझल भिडते हे अनेकदा सिद्ध झालेले आहे तुम्ही ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे जयदीप, मनःपूर्वक शुभेच्छा!
आवडली ! पहिला अन् तिसरा फारच
आवडली ! पहिला अन् तिसरा फारच ! लिहितच रहावं आपण; आपलंच आपल्याला थाम्बावसं वाटेपर्यंत !
सर्वांचे मनापासून आभार. तुमचं
सर्वांचे मनापासून आभार.
तुमचं प्रोत्साहन आणि मार्गदर्शन लाभल्यामुळे इथवर आलो आहे. पण एक असंतोषसा मनात आहे..लिखाणाबद्दल.
प्रयत्न चालू आहेत....
वाह क्या बात !! सर्वांशी
वाह क्या बात !!
सर्वांशी सहमत
शुभेच्छा !!
कुठला होतो माहित नाही आता
कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे
व्वा…
गझल आवडली…
शुभेच्छा.
इतका हळवा नव्हतो मी पण नकळत
इतका हळवा नव्हतो मी पण
नकळत आता झालो आहे
खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे
कुठला होतो माहित नाही
आता इथला झालो आहे
तुझा कधी ना होऊ शकलो
तसा कुणाचा झालो आहे?
वा.. आवडली गझल.
उगाच आव आणून लिहिण्यापेक्षा मनापासून लिहिले की गझल भिडते हे अनेकदा सिद्ध झालेले आहे तुम्ही ते पुन्हा एकदा सिद्ध केले आहे जयदीप, मनःपूर्वक शुभेच्छा!
सहमत.
खोटे हसणे शिकलो आहे आता मोठा
खोटे हसणे शिकलो आहे
आता मोठा झालो आहे >>> हा सर्वात छान.
सुंदर आवडली
सुंदर
आवडली
सर्वांचे मनापासून आभार....
सर्वांचे मनापासून आभार....
वा वा ! मस्त साधे-सुधे पण
वा वा ! मस्त साधे-सुधे पण भिडणारे शेर .
कशी सुटली ही गझल ?
धन्यवाद !
धन्यवाद सुप्रियाजी.
धन्यवाद सुप्रियाजी.