वॅक्युम क्लीनर बद्द्ल माहीती हवी आहे.

Submitted by टकाटक on 27 November, 2012 - 00:19

माझ्या एका मित्राला वॅक्युम क्लीनर घ्यायचा आहे त्याबद्द्ल माहीती हवी आहे. वॅक्युम क्लीनर रोजच्या कामात म्हणजे झाडु मारण्यासाठी वगैरे उपयुक्त ठरु शकतो का?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

टकाटक रोज व्हॅक्यूम क्लिनर Uhoh वापरणे कटकटीचे होईल. त्यापेक्षा झाडू बरा. महिन्यातून एकदा फारतर आठवड्यातून एकदा अवघड सफाई साठी (जळमटं वगैरे)व्हॅक्लि वापरायला ठिक आहे कारण जोडाजोडी, आवाज आणि प्लगिन्ग्-अन्प्लगिंग करावे लागेल सारखे प्रत्येक खोलित.

१) रोज वापरायचा असेल तर कमी वजनाचा आणि कमी शक्तीचा हँडहेल्ड घ्यावा लागेल, त्याचा विशेष साफसफाईसाठी उपयोग नाही.
२) रोजच्या वापराला अवजड व्हॅक्युम क्लीनर उपयोगाचा नाही.उपकरणांची जोडणी, काम झाल्यावर पुन्हा सुटे करून खोक्यात भरून ठेवणे यात जेवढा वेळ लागेल त्यापेक्षा खूपच कमी वेळात झाडू मारून होईल.
दक्षिणा म्हणतात तसा काही दिवसांतून एकदा वापरायला ठीक. जिथे हात /झाडू सहज पोचत नाही असे कोपरे, पलंगाखालची जागा साफ करायला व्हॅक्लि मस्त.

टकाटक, आम्ही Eureka forbes चा wet & dry vacuum cleaner घेतला आहे. आम्ही रोज जरी वापरत नसलो तरी आमची बाई जेव्हा येत नाही तेव्हा वापरतो. त्याचा वैशिष्ट्य असं आहे की आपण फरशीवर पाणी टाकून पुसून घेऊ शकतो. फारशी अत्यंत स्वच्छ होते. तसेच सोफे वगैरे पण थोडे पाणी स्प्रे करून साफ करता येतात. थोडे महाग आहे (१००००/- +) पण उपयुक्त ठरू शकते.

माझ्या कडे युरेकाफोर्ब्स चा लेटेस्ट आहे. चांगला आटोपशीर आहे, फार धूळ, जाळी जळमट काढायला उपयोगी होतो, मुख्य म्हणजे धूळ घरभर न उडता साफ होते.पडदे,मॅट वगरे क्लीनींग साठी उपयोगी आहे.
अटॅचमेंट्स भरपूर असतात आपल्याला उपेगी तेव्ढ्या वापरायच्या बाकीच्या माळ्यावर Proud

मी ब-याच वर्षांपुर्वी एक लहान क्लिनर घेतलेला, युरेकाचा नव्हता, कुठलातरी लोकल होता. त्याने सोफा, ग्रिलचा बेस, गादी कॉम्प्युटर कि-बोर्ड वगैरे छान साफ व्हायचे. त्याची आतली जाळी आता फाटलीय त्यामुळे कचरा बाहेर येतो. अशा जाळ्या कुठे विकत मिळतात का?

स्मिता, तुझ्याकडे कुठले मॉडेल आहे आणि किंमत किती?

व्हॅक्ली दररोजच्या वापरासाठी अगदीच कंटाळवाणा असतो, कारणं तीच वर सगळ्यांनी लिहिलेली. रोजच्यासाठी झाडु, पोछा, फिनेलला पर्याय नाही. पण टुनटुन, व्हॅक्ली घरात असणं मस्ट ! Happy मला तर घरात असलेली आणि नसलेली धुळ सतत दिसत रहाते, त्यामुळे प्रत्येक विकेंडला व्हॅक्लीने बेड्स, पडदे, सोफा स्वच्छ केलं कि छान वाटतं. आणि मग डस्ट बॅग मोकळी करताना त्यातली पाव किलो धुळ पाहिली कि व्हॅक्लीचं महत्व कळतं. माझ्याकडे युरेका फोर्बसचा व्हॅक्ली आहे आणि त्यातल्या प्रत्येक अ‍ॅटॅचमेंटचा मी पुरेपुर उपयोग करते. खरं तर युरेकावाल्यांनी मला डेमो ऑफिसर म्हणुन नोकरी द्यायला हरकत नाही. Wink माझ्याकडे तरी व्हॅक्लीचा पैसा वसुल आहे.

वेक्स, किती तो आगावुपणा जरा म्हणुन दुसर्‍यांच्या चुकांकडे दुर्लक्ष करायचं नाही. Proud पण मानते हं तुला. तुला मध्यरात्रीपण सगळं नीट दिसतं आहे. मला दिवसाढवळ्या सुद्धा टकाटकच्या जागी टुनटुन दिसली. Happy

खरं तर युरेकावाल्यांनी मला डेमो ऑफिसर म्हणुन नोकरी द्यायला हरकत नाही.>>>>>> मनी माझ्या घराचा पत्ता तुला समस करतो Lol

सुशांत, हे बघ. आना-जाना (रेडिओ कॅब) + वेलकम ड्रींक ( कॉफी चालेल) + लंच + डेमो चार्जेस असं सगळं कबुल आहे का? proforma invoice पाठवुन देवु का? Wink

उदय, चष्म्याची गरज नाही. मी सुशांतच्या वरच्या पोस्टला उत्तर लिहिलं होते तेव्हाच तुपण पोस्ट टाकलीस. तुलापण उत्तर तेच. Happy

आमच्याकडेही पडून आहे. रोज तर उपयोग नाहीच होऊ शकत. कोणाला एवढा वेळ आणि मुळात उत्साह असतो, जोडाजोडी करा एन् ऑल. पण वापर केला तर चांगले उपकरण आहे. Wink
पण आता मनिमाऊचं वाचुन मलाही उत्साह आलाय. Happy

आमच्याकडे प्रचंड धुळ येते. सो आता ९००० रुपये खर्च करावे लागतील बहुतेक Happy

माझ्याकडे बाई आहे कामाला, तिला एकदा दाखवले की ती करेल..

मी घेतला शेवटी यु फो चा वेट आणि ड्राय. वेट एकदाच वापरले, पण ड्राय खुप वेळा वापरला गेलाय आजपावेतो. जोडाजोडी आहे थोडी पण परिणाम मात्र एकदम मस्त. अर्थात रोज वापरत नाही पण आठवड्यातुन दोन्-तिनदा वापरला जातो.

परवा क्लीनर वापरत असता ना अचानक वेगळा आवाज यायला लागला। लगेच बंद करून सर्विसला फोन लावला- आज त्यांचा माणूस येउन म्हणतोय की आर्मेचर गेले,नवे घालावे लागेल. त्याचे १९५०+५५० सर्विस फी। म्हटले लाइफ़ टाइम फ्री सर्विस आहे म्हटलेले विकताना, तर म्हणे पार्टचे पैसे द्यावे लागणार।

आता काय करू? ह्या लाईफ टाइम सर्विसला काहीच अर्थ नाहीय मग. आर्मेचर तर बाहेर कोणीही बदलून देइल. त्याचे ५५० कशाला द्यायचे याना मग? बाहेरुन करणे बरोबर होइल का? क्लीनर घेउन एक वर्ष झाले डिसेम्बरात. त्यामुले कंपनीच्या मते वोरन्टी सम्पलीय.

तो एक हँडी व्हॅ. क्ली. मिळतो, छोटा असतो म्हणे, यु. फो. पेक्षा छोटा आहे असं मी ऐकून आहे. त्याचा रिपोर्ट कसा आहे ते कुणी सांगू शकेल काय? मलाही व्हॅ.क्ली. बद्दल असेच वर दिल्याप्रमाणे समजले आहे; की तो नुसता पडून रहातो आणि त्याच्यावरचीच धूळ पुसावी लागते!! पण तरीही काही काही गोष्टी साफ करायला व्हॅ.क्ली. उपयोगी पडत असणारच, उदा. वर मनिमाऊ नी लिहिल्या प्रमाणे. पण ह्या हँडी व्हॅ.क्ली. चा रिपोर्ट कुणी सांगितला तर बरे होईल.

मनस्विता, मनिमाऊ, साधना तुम्ही कोणता वेट अ‍ॅन्ड ड्राय व्हॅक्ली घेतलाय??? अजुनही कसा आहे परफॉर्मन्स???

Pages