Submitted by जयदीप. on 24 December, 2013 - 00:00
तू मला सांगू नको मी झिंगलो होतो किती...
माहिती माझे मला मी संपलो होतो किती !
तू मनाशी ठरवले -मी रंगलो होतो किती
ना, तुला ना उमगले- मी रापलो होतो किती !
गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती !
उत्तरांनाही हवासा प्रश्न माझ्यासारखा
उत्तरे स्वीकारण्या मी झुंजलो होतो किती?
दु:ख पडले अंगवळणी, दु:ख वाटे आपले
आपला माझ्या सुखा मी वाटलो होतो किती?
का नशीबा मिरवशी हे जिंकणे असले तुझे...
मी तुला हरवूनही मी जिंकलो होतो किती?
विषय:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
छान!
छान!
धन्यवाद आर.के. जी
धन्यवाद आर.के. जी
गुंतताना कळत नाही गुंततो आहे
गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती
मस्त शेर.
दोनतीन शेरांच्या दुसर्या ओळीत 'मी'ची पुनरावृत्ती टाळण्यासाठी दुसर्या 'मी' च्या जागी 'की' हा शब्द चपखल वाटेल असे सहज सुचवावेसे वाटत आहे. गै.न.
----------
अवांतर : वरच्या शेरावरून एक माझा शेर आठवला,
ह्याच कारणासाठी रडलो तू जाताना
किती गुंतलो कळण्यासाठी मीटर नसते
धन्यवाद व शुभेच्छा!
व्वा सर....
व्वा सर.... मस्त....धन्यवाद....
>>>ह्याच कारणासाठी रडलो तू जाताना
किती गुंतलो कळण्यासाठी मीटर नसते>>>
व्वा.... सॉलिडच!
-------------------------------------------------
सर....
मतला थोडा बदलला आहे... शेवटच्या शेरात की चपखल वाटेल का?
छान
छान
शेवटच्या शेरात नाही वाटणार
शेवटच्या शेरात नाही वाटणार जयदीप
बढिया.. और बधाईया
बढिया.. और बधाईया
गुंतलो आणि जिंकलो हे सर्वात
गुंतलो आणि जिंकलो हे सर्वात छान.
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती ! >>> ही ओळ
"गुंतल्यावर जाणले मी गुंतलो होतो किती"
अशी वाचून पाहिली.
धन्यवाद...
धन्यवाद...
गुंतताना कळत नाही गुंततो आहे
गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती
थांबल्यावर जाणतो मी गुंतलो होतो किती !
दु:ख पडले अंगवळणी, दु:ख वाटे आपले
आपला माझ्या सुखा मी वाटलो होतो किती?
आवडले हे शेर.
छान आहे.
छान आहे.
सुप्रियाजी... माशा... खूप खूप
सुप्रियाजी...
माशा...
खूप खूप आभार...
प्रयत्न चांगला आहे. लिहीत रहा
प्रयत्न चांगला आहे. लिहीत रहा जयदीपजी
गुंतताना कळत नाही गुंततो आहे किती >>> मस्त मिसरा
अनपेक्षित पणे इथे 'हे लेखन
अनपेक्षित पणे इथे 'हे लेखन आवडलेले माय्बोलीकर' मधे १ दिसत आहे...
हे कसं कळावं की कोणाच्या निवडक १० त ते आहे?