धुम - ३

Submitted by उदयन.. on 21 December, 2013 - 05:54

वर्षाचा सर्वात महागडा आणि आतुरतेने वाट पहायला लावणारा चित्रपट "धुम-३" काल बघण्यात आला .

यशराज बॅनरच्या "रोजगार हामी योजना" अंतर्गत अभिषेक आणि उदय यांना काम देण्याकरीता "धुम" या चित्रपटांची साखळी तयार केली आहे असे फेबु ट्विटर भाष्य केले आहे......काही अर्थी हे बरोबरच आहे..:)
खरतर धुम -१ आणि धुम-२ हे चित्रपट तयार करताना काही लॉजिक वापरलेले होते..

पहिल्या धुम मधे जॉन बाईक वर आपली गँग घेउन पैसे लुटायचे.. मुंबई पोलिसांकडे अत्याधुनिक बाईक्स नसल्याने तसेच चोरांच्या बाईक्स २००किमी पेक्षा जास्त वेगाने पळत असल्याने त्यांचे फावत होते या साठी जय दिक्षित अली ला मदतीला घेतो.. आनि त्यांच्याच वेगाने पाठलाग करत त्यांना पकडतो..इतके पैसे चोरायचे असल्याने जॉन आपली गँग बनवतो. (लॉजिक) गँग च्या मदतीने प्रत्यक्ष चोरी देखील केली..

दुसर्या धुम मधे हृतिक रोशन ने या चित्रपटाची उंची प्रचंड म्हणजे प्रचंडच वाढवुन ठेवली..ह्रितीक चोरी फक्त एका अमुल्य वस्तुचीच करायचा...एखादा राजघराण्याचा हार, या दुर्मिळ नाणी, महाग हिरा.. अश्या छोट्या पण अत्यंत मुल्यवान वस्तुंची चोरी करायचा म्हणुन तो एकटा होता.. चोरी करताना त्याने अनेक क्लूप्त्या लढवल्या .. वेशांतर केले.. मुर्ती झाला बुटका झाला खुप काही केले...इतके केले की बहुदा काही शिल्लक ठेवलेच नाही.. ह्रितीक विदेशात चोरी करत करत भारतात आला..आणि जय दिक्षित त्याच्या मागे लागला ..(लॉजिक)

आता आपण येउया धुम-३ च्या कथेवर ..

अमेरिकेत शिकागो या शहरी "ग्रेट इंडीयन सर्कस" जॅकि श्रॉफ चालवत असतो..प्रचंड कर्ज घेतलेले असते .. हे कर्ज फेडण्यासाठी तो बँकेची मदत मागतो.. त्यासाठी शो देखील आयोजित करतो परंतु बँक कर्ज देण्यास नकार देते...कर्जाच्या चिंतेत जॅकी आत्महत्या आपल्या लहान मुलासमोर आणि बॅकेच्या अधिकार्यांसमोरच करतो.
जॅकिचा मुलगा साहीर (आमिर खान) मोठा झाल्यावर त्या बँकेचा बदला घेण्याचे ठरवतो आणि बँकेच्या प्रत्येक शाखा लुटण्यास प्रारंभ करतो एकटाच (लॉजिक???????????) .. एका बाजुला सर्कस देखील चालु करतो... बँक लुटताना साहीर हिंदीत संदेश लिहित असतो.. म्हणुन भारतातुन जय दिक्षित आणि अली यांना पाचारण केले जाते (लॉजिक???? )
जय दिक्षित केस ची स्टडी करतो..आणि साहीर च्या मागे लागतो.. साहीर वेगवेगळ्या क्लुप्त्या लढवुन ?????? जय दिक्षित ला वेळोवेळी मात देतो.. या क्लुप्त्यांमागे एक मोठे "रहस्य" असते जे इंटरवेल आधीच उघडले जाते Biggrin ..
शेवटी आमिर चे रहस्य जे प्रेक्षकांना आधीच कळते ते जय दिक्षित ला कळते का ?
बँक उध्वस्त होते का...??? कशी होते... ?

हे सगळे बघण्यासाठी धुम - ३ पहावा लागेल . (मी आग्रह करत नाही आहे...हम तो डुबे है सनम ले तुझे भी डुबे)

चला आता इतर बाबींकडे लक्ष देउ या...

एका धाग्यावर "प्रेमळ पारधी" यांनी लिहिले तसेच मला ही वाटते की आदित्य चोप्रा यांनी अमेरिकन्स ची लायकी या चित्रपटात काढली आहे... शिकागो पोलिस हे मुंबई पोलिस पेक्षा चांगले असुच शकत नाही .. अज्याबात नाय.. नही बिल्कुल ही नही है....नोनो नो .. म्हणुनच मुंबई पोलिस मधले एसीपी जय दिक्षित आनि इंस्पेक्टर (ज्याला साधी इंग्लिश येत नाही Wink ) अली यांना शिकागोला पाठवण्यात येते (मागच्या चित्रपटात विदेशात जाउन चोर पकडण्याचा अनुभव असल्यानेच त्यांचे सिलेक्शन होते असा दाट गाढा थिक संशय मला आहे) चोरसाहेबांनी चोरी करताना हिंदीत संदेश लिहिल्याने भारतातुन मदत शिकागो पोलिस मागतात Biggrin (असा विनोद मायबोलीच्या कोणत्याच धाग्यावर कोणत्याही आयडीने लिहिला नसेल.)
असो. जय - अली शिकागो ला पोहचतात आणि लगेच जाहीर करतात एकाच बँकच्या शाखा लुटल्यागेलेल्या आहे..( हे शिकागो पोलिसांना कळत नाय :अओ:) म्हणुन बँकेचा शत्रुचेच काम आहे ...

"द ग्रेट इंडीअन सर्कस" प्रचंड कर्जात बुडालेली असते..ती ऑक्शन होते..(बहुदा कारण चित्रपटात बँकेचे अधिकारी तसे बोलताना दाखवले आहे.) अश्या प्रचंड रकमेच्या कर्जाची परतफेड साहीर कसा करतो..? चला एकवेळ मानु की बँक लुटुन तो पैसे मिळवतो ...तर कर्जाच्या रकमेची परतफेड करताना इंकमटॅक्स वाले विचारत नाही का ...ए बाबा तु इतके पैसे कुठुन आणलेस .." तु तर काही कामधंदा करताना तर दिसत नाही..(दाखवलेच नाही Wink ) मग सर्कस उभी कशी कोणत्या पैश्यातुन करत आहेस... हे अमेरिकन ढिसाळ कारभारावर मार्मिक बोट दाखवत आहे त्यांच्याकडे देखील भारतासारखाच भ्रष्टाचार माजलेला आहे..ढिसाळ कारभार करतात लेकाचे.. एक सामान्य मुलगा प्रचंड कर्ज्यात असलेली सर्कस सोडवतो काही ही कामधंदे न करता त्याची साधी चौकशी होउ नये ? Wink

चोर चित्रपटात मुख्य भाग असतो ती चोरी कशी होते.. यावर दिग्दर्शकाचा मुख्य भर असतो.. च्यामायला या बिनडोक चित्रपटात चोरी दाखवलीच नाही Angry निव्वळ चोरी कशी करायची याचे प्लॅनिंग चित्रपट भर साहीर करत असतो.. आपण मात्र वाट बघत असतो की अरे आता होईल चोरी मग होईल चोरी... दर्शकांना कळते कधी जेव्हा साहीर बँकेच्या बाहेर बाईक वरुन येतो आणि पळतो ...तेव्हा समजते..... हे भगवान चोरी हो भी गयी और पता भी नही चला.... मग सगळे त्याच्या मागे लागतात .. पाठलाग सुरु...
अरे कुठेतरी दाखवा चोरी कशी केली ? तुमच्या कडे चोरी करण्याच्या क्लुप्त्या नाहीत का.? की तुम्हालाच समजले नाही चोरी झाली ते.. निव्वळ आमिर ला बँके बाहेर पळवले की झाली चोरी.... Biggrin
चला केली चोरी....मग पैसे कशाला उधळत फिरायचे.... एक इटुकली पिटुकली बॅग पाठिला अडकवली की झाले आला चोरीचा माल..?? Uhoh अरे इतके कर्ज आहे तर किमान १०-१५ सुटकेस हवे ना पैश्याने भरलेले...किमान एक नोटेची किंमत १०००$ जरी धरली तरी १ करोड पाहिजे असे धरले तरी १०००० नोटा लागतील आता १०००० नोटेंसाठी एक "इंटुकली पिंटुकली" बॅगेत १०००० नोटा काय येतील का ? (लॉजिक????????)

इतकी मोठी बँक फक्त ३-४ बँकेत चोरी केल्यावर उधवस्त होईल का? काय लुटतो ते ही कळत नाही .. पैसे उधळत जातो मग स्वतः काय घेउन जातो हा ? Uhoh

आमिर ची हाईट फार मोठी चुकीची दाखवली आहे....त्यामुळे त्याच्या संपुर्ण व्यक्तिरेखेवर वाईट प्रभाव पडतो.. नको त्या ठिकाणी त्याला अतिशय बुटका दाखवलेले आहे.. सुरुवातीला कटरिना आनि आमिर एकाच हाईट ची दाखवले आहे...६=६
नंतर अभिषेक आमिर समोर आल्यावर आमिर एकदमच छोटा वाटतो अगदी त्याच्या खांद्याच्या सुध्दा खाली लागतो ६.५ = ५
आणि शेवटी अभिषेक कटरिनाला भेटतो तेव्हा कटरिना अभिषेक च्या उंची जवळपास दिसते. ६.५=६

मग जेव्हा आमिर अभिषेक समोर असतो तेव्हा ५फुटी कसा होतो आणि कटरिना बरोबर असताना लगेच १ फुट वाढुन ६ फुटी कसा होतो......... (दया पता लगाओ जरुर हाईट मे काली दाल मिली हुई है)

आता तुम्हाला वाटत असेल अरे फक्त आमिर आणि अभिषेकवर लिहिले कतरिनावर नाही.....तर माझ्या प्रिय मित्रांनो तुमची अत्यंत आवडती कटरिनावर ३ गाणी आहेत....झालात ना खुश...अजुन बोनस म्हणुन तिला संपुर्ण चित्रपटात ५-६ वाक्य देखील बोलायला दिली आहेत....:टाळ्या: आमिरखान चे धन्यवाद जे इतके मोठे फुटेज तिला दिले....

चित्रपटाची गाणी फक्त तोंडी लावण्यापुरती आहेत... टॅप डांस हवा तेव्हढा प्रभाव पाडत नाही .. रितिक च्या धुम डांस ची बरोबरी करण्याकरीताच बहुदा हा डांस घेतलेला आहे.. आमिर बिल्कुल नाचताना आकर्षक दिसलेला नाही..
मलंग... अत्यंत सुंदर आणि भन्नाट .. प्रचंड खर्च करुन याला आकर्षक बनवलेले आहे.. वर एरो डांस वगैरे जे आपण डीआयडी मधे बघत होतो नाचा चे प्रकार तसेच प्रकार यात दाखवले गेलेले आहे... सुंदर नाच आणि करामती आमिर आणि कटरिनाने केलेल्या आहेत...
कमली या गाण्यात कटरिनाने चांगले मुव्ह्स दाखवले आहेत परंतु.......ते सलग न असता तुकड्या तुकड्यात असल्याने लवकर कळते की एक एक स्टेप्स घेत शुटींग घेतलेले आहे.. काही सलग आहेत त्यात.... ज्यात कतरिनाने खरच चांगला प्रयत्न केलेला आहे... गोड आणि खरच सुंदर दिसते.....

अ‍ॅक्शन्स फक्त इंटरवल पर्यंत च आहेत त्यानंतर अतिशय संथ होतो चित्रपट उगाच त्याला भावनात्मक करण्याच्या नादात त्याचा टेम्पो बिघडवला.. चित्रपटाचे नाव धुम आहे म्हणुन बहुदा फक्त पाठलाग बाईक्स यावरच भर दिलेला आहे.. चित्रपटाच्या ९०% फ्रेम मधे फक्त आणि फक्त आमिरच दिसतो..

अभिनय :- अभिनयात जॅकि श्रॉफ आणि छोटा आमिर झालेला मुलगा भाव खाउन जातात.. लहान मुलाने तर कमालच केली आहे.. अनेक प्रसंगात त्याचा चेहरा बोलका झालेला आहे... आमिर खान जिनिअस.. निव्वळ अप्रतिम एकाच वेळी त्याने विविध कांगोरे उभे केले आहे बर्याच ठिकाणी तो निव्वळ चेहर्यातुन फरक दाखवुन देतो.. परंतु मी आमिर खान आहे......हे त्याला खाली खेचते... आयुष्यात पहिल्यांदा खलनायकी भुमिका करताना कोणत्याही बाजुने खलनायक वाटला नाही.. स्क्रिप्ट लिहिताना देखील त्याला खलनायक न दाखवता अत्याचार झालेला युवक दाखवले गेले.. त्यामुळे तो मनाला भिडत नाही...त्याचे एक रुप किमान खलनायकी दाखवायला हवे होते.... तर तो ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट छान उभा राहिला असता.. परंतु सगळेच रुप गुडीगुडी करण्याच्या नादात सगळे केर मुसळात जातात...
खलनायकी करताना कधी तो डर , माय नेम इस खान मधला शाहरुख होतो..कधी धुम-२ च्या रितिक सारखा तर कधी धुम-१ च्या जॉन सारखा ..त्यामुळे आपल्याला आमिर कमीच दिसतो... तरी ही त्याची पकड शेवट पर्यंत सुटत नाही.चित्रपटावरुन... शेवटच्या फ्रेम पर्यंत आमिर वरच आपली नजर खिळुन असते... आणि हाच त्याचा स्ट्राँग पॉईंट आहे.....

अभिषेक आणि उदय यांच्या रोजगारा करिता त्यांना यात घेतले असल्याने त्यांच्या अभिनयावर काही बोलुन मी त्यांचा जाहीर अपमान करु इच्छित नाही..:)

आमिर चा चित्रपट स्क्रिप्ट ने परफेक्ट असायचा कमीत कमी लुपपोल्स असायचे त्यात.. आमिर स्वतः जातीने लक्ष द्यायचा .... परंतु "द - लाश" आणि "धोबीघाट" पासुन त्याने यावर लक्ष द्यायचे कमी केले असे वाटते..
निव्वळ स्पर्धेत उतरायचे ..पहिल्यांदाच खलनायक साकारायचा या निमित्ताने बहुदा आमिर चे दुर्लक्ष झाले आहे ... Sad चुका तर सगळ्याच चित्रपटात असतात.. अतिशयोक्ती सगळ्यातच असते यालाच बहुतेक लिबर्टी घेणे म्हणतात परंतु कैच्याकै घेउ नका. पटेल असे घ्या.......

बहुदा या चित्रपटामुळे शिकागो पोलिस आदित्य चोप्रावर केस दाखल करणार असे दिसत आहे...

असो............. पहिला भाग भन्नाट पाठलाग अप्रतिम लोकेशन्स ...... आणि दुसरा भाग अत्यंत संथ रटाळ थोडेफार धक्के ...... याचे मिश्रण बघायचा असल्यास बघावा.......

मी निव्वळ आमिर खान या चित्रपटात आहे म्हणुन गेलेलो...... त्यापेक्षा शुक्रवारचा "२४" मालिकेचा एपिसोड बघितला असता तर बरे झाले असते असे वाटत आहे.....

(मी परिक्षण केलेले नाही...) Happy

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

(मी परिक्षण केलेले नाही...)>>>>
सो ही चिरफाड आहे. रसप तुमचे काम अजून बाकी आहे. येउ द्या.:G

मागच्या चित्रपटात विदेशात जाउन चोर पकडण्याचा अनुभव असल्यानेच त्यांचे सिलेक्शन होते असा दाट गाढा थिक संशय मला आहे >>>>>> 24.gif
बहुदा या चित्रपटामुळे शिकागो पोलिस आदित्य चोप्रावर केस दाखल करणार असे दिसत आहे.. >>>> हरकत नाही चौकशीला उदय आणि अभिषेकला पाठवू Wink

मी पाहिला आजच. टॅप डान्स आज्जीबात आवडला नाही...*कार, *कार.

हृतिक रोशनचा धुम २ जेव्हडा छान होता तितका तर धूम(१) आणि धूम ३ छान नव्हता.

खरतर रिव्हू टाकायलाच आले होते पण उदयनने आधीच रिव्हू (?) लिहिला आहे.....म्हणजे चित्रपटाची चिरफाडच केली आहे. Proud

कतरिना तशीही मला आवडत नव्हतीच पण धूम पाहिला तो धूम २ आवडला होता म्हणून...वाटलं होत, कि धुम३ जास्त भारी असेल. पण......

योग्य परिक्षण केलंय. Happy

तो टॅप ड्यान्स होता का? मी म्हटलं हा त्या गटाराच्या झाकणावर पायांनी का आवाज करतोय! Proud

आजच पाहिला. पकले आणि पस्तावले. मधून मधून मस्तपैकी डुलक्या घेतल्याने तगले.

अमीर म्हातारा दिसतो, त्याचे कान भारीच बाहेर आलेले दिसतात, नाचात तो हृतिकच्या पासंगालाही पुरत नाही हे डोळ्याआड करावं असे लॉजिकच्या भज्यांचे घाणेच्या घाणे सिनेमाभर तळलेत. अमीरची बाईक हा एक अत्यंत हास्यास्पद प्रकार होतो. फक्त शेवटी फेरीवरून पुन्हा किनार्‍यावर उडी मारताना त्या बाईकचं हेलिकॉप्टर होणार या माझ्या आशेला सुरुंग लागला. बाकी त्या बाईकची बरीच रुपांतरं झाली. आणि सगळीच विनोदी होती.

कतरीना कतरीना दिसते, अमीर अमीरच दिसतो, अभिषेक अभिषेकच दिसतो आणि सर्वात दुर्दैव म्हणजे उदय चोप्रा दिसतो.

मामी......................फक्त बाईक उडायचीच बाकी होती...........बाकी सगळे प्रकार करुन झालेले Biggrin

बघु की नको बघु असं झाल यं हे वाचुन
अभिशेक+ आणि तो कोन २रा बघा नाव देखील आठवत नाही यांच्या रोजगा रा आता . लागेल ब हु दा

'चोरी होतांना दिसत नाही.. डायरेक्ट चोरीनंतरचा पाठलाग दिसतो' हे पूर्ण धूम सिरीजचेच वैशिष्ठ्य नाही का?

चोरी होतांना दिसत नाही.. डायरेक्ट चोरीनंतरचा पाठलाग दिसतो' हे पूर्ण धूम सिरीजचेच वैशिष्ठ्य नाही का? >>>
Uhoh

ज्ञानेश ...?? आधीच्या दोन्ही चित्रपटात चोरी कशी केली आहे स्पष्ट दाखवले आहे..... बघितले नाही का तुम्ही ? Uhoh

फक्त बाईक उडायचीच बाकी होती...........बाकी सगळे प्रकार करुन झालेले

>> ख्याख्याख्याख्या !!!

प्रचंड सहमत...
लॉजीकच नव्हतं पिक्चरला ... अभिषेक नि उदय चोप्राने तर इथे पुर्ण वाट लावलीय
कॅटरिनाला डान्स तरी होता .. ती व्हिक्टोरिया उगाच पुतळा म्हणुन आणली होती ..

जॅकी श्रॉफ नि तो छोटा मुलगाच जास्ती लक्षात राहिले ..

तो टॅप ड्यान्स होता का? मी म्हटलं हा त्या गटाराच्या झाकणावर पायांनी का आवाज करतोय! >> Rofl

चोरी होतांना दिसत नाही.. डायरेक्ट चोरीनंतरचा पाठलाग दिसतो' हे पूर्ण धूम सिरीजचेच वैशिष्ठ्य नाही का<<< नाय हो. पहिल्यामधे पण चोरी होताना दिसते. अगदी सुरूवातीलानाही, कारण चोर कोण ते माहित नसतं.

दुसर्यामधे तर सुरूवातच ह्रितिक रोशन आंटी बनून चोरी करून मग रेल्व्हेच्या टपावर चढून उडी मारूनग्वगैरे आहे. नंतर पिक्चरभर ह्रितिक एकटाच चोर्‍या कशा करतो तेच तर बघण्यासारखे आहे. खास करून तो फ्रेस्कोमधला पुतळा बनून जातो आणि हिरा चोरतो तो अख्खा सीन ग्रेट आहे. (आताच धूम २ लागला होता टीव्हीवर. पाहिलाच)

आमिर खानने या पुढे धूम सीरीजचे चित्रपट बनवायचे नाहीत असा त्याच्या कॉन्ट्राक्टमधे क्लॉज घातल्याची बातमी खूप आधी वाचली होती. तसं असेल तर आदित्य चोप्रा यडा आहे. आमिर खान ऐवजी सुपर व्हिलन म्हणून रणबीर कपूर, रंणवीर सिंग. अर्जुन कपूरसारख्या पोरांनी मस्त मजा आणली असती. अगदी धूम १२ पर्यंत सीरीज चालू राहिली असती तर तेवढाच उदय चोप्र अपण बिझी राहिला असता, आता दिग्दर्शक होइन म्हणतोय~!!!

@ उदयन आणि नंदिनी-

पहिल्या धूमच्या पहिल्या सीनमधे चोरी होतांना पूर्णपणे दाखवले आहे. ते सिग्नलमधे फेरफार, गाडी बॉम्बने उडवणे, मग पैसे घेऊन पळ काढणे.
त्यानंतर आयसीआयसीआय बँकेत दरोडा (उदय चोप्रा बाहेर फुगे विकतो) दाखवलाच नाही, सरळ बाहेर पडून झाल्यानंतरचा पाठलाग दाखवला आहे. ते तिथे कसे गेले, काय केले- दाखवले नाही.
त्यानंतर जॉन अभिषेकला चॅलेन्ज देऊन करतो, ती चोरी- यातही सर्वजण डायरेक्ट चोरी करून, मंडपाखालून पळतांना दाखवले आहेत. मुळात ते तिथे कसे गेले- पत्ता नाही.
शेवटची बारमधली चोरी- सविस्तर आहे, पण नंतरच्या पाठलागाइतकी नाही.

धूम टू- पुन्हा पहिली चोरी डिटेलमधे दाखवली. दुसरी चोरी (पुतळा बनून) हिरा उचलणे दाखवले आहे, पण मुळात तिथपर्यंत तो जातो कसा, पुतळा बनतो कसा हे दाखवले नाहीये.
दुर्मिळ तलवार उचलणे- बर्‍यापैकी डिटेल्स आहेत.

धूम थ्री- पाहिला नाही. यापेक्षा वाईट आहे काय? Happy

ज्ञानेश, तेवढ्या डीटेलमधे प्रत्येक चोरी दाखवत् बसले तर केकता कपूरची सीरीयल होइल की. पण् पाठलाग मात्र एकदम सविस्तर दाखवलेत. माझा आवडता पाठलागसीन धूम २ मधला सर्वात शेवटचा पाठलाग!

तो जातो कसा, पुतळा बनतो कसा हे दाखवले नाहीये.>> तो पाण्याच्या टाकीमधून त्या म्युझियमच्या वॉशरूममधे येतो आणि मेकप फासायला सुरूवात करतो असा शॉट आहे की.

पहिल्या धूमच्यावेळेला सीक्वेल काढायचं डो़क्यात नसणार, त्यामुळे तिथे चोरीपेक्षा पाठलाग महत्त्वाचा. कारण बाईक दाखवायच्या होत्या. दुसर्‍यामधे ह्रितिक रोशन जास्तीत जास्त किती फॅन्सी ड्रेसमधे दाखवता येऊ शकेल याला जास्त महत्त्व दिलं होतं. तिसर्‍यामधे काय केलंय अद्याप माहित नाही मला.

आमिर खान नी स्वत: चा जोकर बन्वून हस्यास्पद केलय स्वतःला !
त्यात फाल्तु स्क्रिप्ट , नसलेल आणि फसलेलं कथानक , बेक्कार गाणी आणि अगदीच बेसिक पुअर कोरिओग्राफी !
कितीही प्रयत्न केला तरी ह्रितिक विसरता येत नाही .. ह्रितिकचं फिजिक, हाइट , लुक्स .. ते डोळे ,परफेक्ट 'माचो मॅन' स्क्रीन प्रेझेन्स , डान्स मधे फ्लॉलेस, अ‍ॅक्शन स्टंट्स मधे फ्लॉलेस , स्टाइल मधे बाइक्स उडवणे कम्मॉन आमिर , इट्स नॉट युअर कप ऑफ टी !!!
धूम २ ची भट्टी मस्तं जमली होती , ह्रितिक-अ‍ॅश ची केमिस्ट्री किल्लर होती !!! 'सुनहरी' चा रोल कसला सही होता .. चोरीचे सीन्स आणि ह्रितिक चे गेटप्स , व्हिज्युअल इफेक्ट्स मस्तं होते !
धूम ३ मधे ते ही नाही ..
कत्रिनाला २-३ डान्स शिवाय काहीच काम नाही , तिचे डान्सेस सुध्दा अगदीच सामान्य .. आमिर आणि तिची काहीच केमिस्ट्री नाही , आमिर इज ऑब्सेस्ड जस्ट विथ हिमसेल्फ !
आमिर फॅन म्हणून त्याच्यासाठी पहायला गेले पण तो स्वतः च बिग डिसप्पॉइन्ट्मेन्ट !
बाल कलाकार सोडून काही उल्लेख करण्यासारखं नाही ..

स्पॉयलर अ‍ॅलर्ट :
धूम इतर सिरिज मधे मि. 'ए' मिस्टरी होता ,चोरी करून 'ए' टाकायची त्याची सिग्नेचर स्टाइल इथे उगीच बदलली, इथे चोराचं नाव 'ए' नाही हे कुछ जमा नही ...त्या साहिर ची सहनुभुति कथा वगैरे अगदीच तडा देते धूम च्या पारंपारीक चोराच्या इमेज ला !
आमिर बहुदा ह्रितिक चे बरेच मुव्हीज पाहून इन्स्पायर झाला आणि इथे हट्ट करून सगळे रोल एकत्रं करायचा पुअर अटेम्प्ट केला ..
ह्रिथिक ची कॉपी १) गुजारिश मधल्या मॅजिशिअन अ‍ॅक्ट्स
ह्रितिक कॉपी २) कोइ मिल गया च्या रोहित टाइप बोलण्याचा वागण्याचा पुअर अटेम्प्ट !
ह्रितिक कॉपी ३) धूम २ मधल्या अनेक डान्स अ‍ॅक्शन सीन्स ची कॉपी करायचा प्रयत्न.

आमिर खानच्या वडलाचा रोल जॅकी श्रॉफ ने केलाय? वीस वर्षापूर्वी दोघं एकाच मुलीसाठी लव्ह ट्रँगलमधे भांडत होते. Happy

धुम३ चा ट्रेलर बघुन तो थिएटरमध्ये जाउन बघण्याची इच्छा नव्हती. मला त्यात आधीच्या धुम इतका आकर्षकपणा वाटत नव्हता. पण नवरयाच्या आग्रहाखातर बघुन आले कालच....

हम्म चित्रपट नेत्रसुखद आहे, पण चित्रपट संपल्यावर आपण खुप काही ग्रेट बघितले असे नाही वाटत.
१. आमिर आवडला. तो धुम३ मध्ये कसा वाटेल याबद्द्ल आधी शंका होती. पण त्याने त्याला दिलेले काम छान केले आहे. त्याला उंची हवी होती. पण त्याचा वावर, अभिनय नेहमीच आत्मविश्वासपुर्ण असतात.
२. कॅतरिना फक्त शोभेची बाहुली म्हणुन वावरलीय किंवा हिरोला एक हिरोईन हवीच म्हणुन आणि फक्त त्यासाठीच तिला घेतली आहे. तिला या चित्रपटात जास्त स्कोप नाही. पुर्ण चित्रपट आमिरखानमय आहे. तिने देखील बिग बजेत चित्रपटात आमिरबरोबर काम करायला मिळत आहे म्हणुन चित्रपट केला असणार. बाकी ती प्रत्येक फ्रेममध्ये कमालीची सुंदर, आकर्षक वाटते. तिने केलेले नृत्य देखील मस्त. तिने डान्स व अभिनयात बरयापैकी प्रगती केली आहे.
३. अभिषेक ठिक आहे. खरे तर त्याला चांगला स्कोप आहे धुम सिरीजमधील चित्रपटात पण त्यामानाने तो एवढी छाप सोडत नाही. आमिर खानच्या अभिनयासमोर त्याचा अभिनय फिका वाटतो.
४. उदय चोप्राबद्दल चित्रपटातील विदुषक एवढीच अपेक्षा ठेवली तर तो आपले काम ठिकच करतोय म्हणायचे.
५. यात सर्वात जास्त भाव खाउन गेला आहे तो म्हणजे आमिर खानचा लहानपणीचा रोल केलेला मुलगा... अप्रतिम एक्टिंग केलीय या मुलाने... खुपच आवडला
६. जॅकीने त्याला मिळालेला रोल छान साकारला आहे.
७. गाणी मस्त आहेत. पण खुप मस्त नाहीत.
८. आमिरने केलेला डान्स ओके ओके. कदाचित धुम२ मध्ये हृतिकने अप्रतिम डान्स करुन अपेक्षा वाढवुन ठेवल्या होत्या. आमिर आमिर वाटतो हृतिक हृतिक. हा धुम सिरिज पेक्षा आमिरचा चित्रपट म्हणुन बघितला तर बराच म्हणायचा.
९. या चित्रपटाचे एकाच ओळीत वर्णन करायचे झाले तर मी म्हणेन "Wonderful Movie with Visual Treat but LACK OF LOGIC"

ह्या परिक्षणाशी आणि दीपांजलीने लिहलेल्या कॉमेंटशी सहमत.
सिनेमा टीकठाक आहे पण धुम/ अमिरखान यांची भट्टी जमली नाही आणि अपेक्षाभंग झाला.
म.टा. मधील रिव्ह्यु हा आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी लिहिला असावा

बरं या तरी चित्रपटामधे जय आणी अली चोराला पकडतात की नाही? आधीच्या दोन्मधे चोर यांच्या नजरेसमोरून टाटाबाय बाय करत निघून्जातात. Happy

चोर को सिर्फ चोरी करते हूये पकडा जा सकता अहि उसके पह्ले या बादने नही" इतकं नितांतसुंदर अणि कायद्याचं सखोल ज्ञान प्रदर्शित करणारे काही असल्यास अवश्य सांगा.

आमीरचे फॅन म्हणून जाणार असाल तर बरीच निराशा होईल कारण Mr. perfectionist च्या ह्या पिक्चर मध्ये logic ला पूर्ण फाटा दिला आहे आणि ते पचवणं अवघड जातं! चांगल्या स्टोरीला काहीच पर्याय असत नाही. चांगली स्टोरी असली पाहीजे आणि ती छान सांगता आली पाहीजे (ज्यासाठी आमीर प्रसिद्ध आहे) पण धूम ३ मध्ये ह्यातलं काहीच नाही! मला फार श्या वाटलं first day show पाहून Sad
बाकी धूम सिरीज ला शोभेसा पिक्चर आहे! बाईक चेझ आहे. चांगले (Hollywood च्या तोडीचे) special effects आहेत. कतरिना कैफ सुंदर दिसली, नाचली आहे (त्या पलीकडे तिला काहीही काम नाही).
अभिषेक, उदय चोप्रा आपलीआपली कामं करतात. छोटा आमीर एकदम भाव खाऊन जातो! पण..हा पण बराच मोठा आहे! माझ्याकडून 3 stars.

मस्त लिहिलय उदयन Happy
आमिर खानने आमिर खानच रहाव , त्यातच त्याची शान आहे .
हे म्हणजे एखाद्या संस्थानाच्या राजाने विधानसभेच्या निवडणूकीत उभ राहण्यासारखा आहे .
Nothing to win , but everything to lose .

Pages