जरी शांत वाटे, ताठ आहे माझा

Submitted by किरण कुमार on 21 December, 2013 - 06:29

किती थंड आहे गोल माठ तुझा
जरी शांत वाटे ताठ आहे माझा

कशाला पाहिली तू मुर्दाड माती
नदीलाच ओला काठ आहे माझा

का उगी झूरावे अल्याड पल्याड
जंगलात अंधार दाट आहे माझा

ये तू निघोनी सैल पावलांनी
जरी वळणाचा घाट आहे माझा

जरा बिलगोनी बसशील जेव्हा
कळेल कसा थाट आहे माझा

- किकु

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>> जंगलात अंधार दाट आहे माझ्या

ते माझा असं हवं होतं!

हेच बरोबर आहे. त्याचे "जंगल"

Rofl

Rofl
एकदम जानदार शानदार आहे रचना
मी तर शीर्शकाच्या ओळीतील अर्थाच्या व्यामिश्रतेवरच फिदा

mansmi18, काय म्हणून काय विचारता राव! चार ठिकाणी धूळदाण उडाल्यावर पप्पूला सुचलेलं गीत आहे हे. Lol
आ.न.,
-गा.पै.