सिमला मिरची ची चटणी

Submitted by सामी on 28 November, 2013 - 08:42
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

दोन सिमला मिरच्या,
एक लहान हिरवी मिरची,
३/४ लसूण पाकळ्या, छोटा आल्याचा तुकडा
जीरे
ऑलीव्ह ऑईल
चिवड्याची डाळ
अर्धा कांदा
कडीपत्ता
मीठ , साखर

क्रमवार पाककृती: 

सिमला मिरचीचे मध्यम आकाराचे तुकडे केले. कढईत एक लहान चमचा ऑलीव्ह ऑईल घेवून मोठ्या आचेवर अर्धवट शिजवले. वेगळे काढून ठेवले.
कांद्याचे मध्यम आकाराचे तुकडे करून ते पण मोठ्या आचेवर परतले. ते काढून त्याच कढईत डाळ थोडी भाजली.
मिक्सर च्या भांड्यात सिमला मिरची, फ्राय केलेला कांदा, कढीपत्ता, जीरे , डाळ, साखर आणि चवीपुरते मीठ टाकले. बारीक वाटले.
वरून हवे असल्यास मोहरी आणि हिंगाची फोडणी घालता येईल.
chutny.jpg

वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी भरपूर चटणी होते
अधिक टिपा: 

सिमला मिरची न आवडणारे पण मिटक्या मारत खातात. याच पदधतीने अजुन काही भा़जांच्या चटण्या करता येतील.

माहितीचा स्रोत: 
स्वतः केलेला प्रयोग
पाककृती प्रकार: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी करीनच. मला डाळं नाही मिळणार, दुसरे काहीतरी वापरावे लागेल. आमच्याकडच्या एकाच सिमला मिरचीची भरपूर होईल.

प्रभा, चटणी टिकेल असे वाटत नाही. लसूण टाकली होती,लिहायला विसरले. वरती अ‍ॅड करते. पाणी न घालता ही थोडी पातळच होते.