अपमान ! पण कोण करतय ?

Submitted by विजय देशमुख on 16 December, 2013 - 23:44

http://www.firstpost.com/world/the-us-has-gone-overboard-against-indian-...

शरमेची आणखी एक बाब. नेमकं काय खरं अन काय खोटं तेच कळत नाहीय. अमेरिकन पोलिसांनी देवयानी खोब्रागडे यांना हातकड्या घालुन अटक केली आणि ६ तास ड्रग्ज, खुनी यांच्यासोबत डांबुन ठेवले.
यावरुन काही प्रश्न डोक्यात आलेत.

१. भारतीय दुतावासात $४१२० पगार असणार्‍या देवयानीने $४५०० पगारावर नॅनी म्हणुन संगीता रिचर्डला कामावर कसे ठेवले.
किमान पगार कायदा देवयानीला लागू होत नाही का? तसं असेल तर भारतीय सरकार जबाबदार नाही का?

२. हातकड्या घालुनच अटक केली पाहिजे, हे गरजेचे (कायद्याने आवश्यक) आहे का?

३. ही अमेरिकन पोलिसांची दादागिरी आहे का?

४. देवयानी खोब्रागडे यांच्या वडिलांच्या नावे "आदर्श सोसायटीत" फ्लॅट असल्याचे वाचले. त्याची काहीच चौकशी नाही?

५. "हा देशाचा अपमान आहे" असे खुर्शीद साहेब म्हणाले, पण नेमका अपमान कोण करतय?
६. देशात सरकार पंगु आहे, त्याचा असाही फरक पडू शकतो?

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>
भारतातील अमेरिकन दूतावासाला इतके दिवस मिळालेल्या बहुतेक सवलती काढून घेतल्या आहेत. त्यामधे "लिकर इंपोर्ट"वर पण बॅन आणलाय म्हणे. (म्हणजे इतके दिवस लोकांच्या देशात नियम धा ब्य्वार बसवून हे अमेरिकन वागत होते ते योग्य होतं आणि त्यांच्या देशात गेल्यावर लगेच नियमांचा बडगा उगारायचा)
<<

मग त्यावर अ‍ॅक्शन घ्यायला भारताला कोणी बंदी घातली होती का? हे कशाची रिअ‍ॅक्शन म्हणून का करायचं? आधीच का नाही केलं कायद्याची इतकी चाड होती तर?

>> राजनैतिक संक्केत सोडून वगैरे केलेली अटक
कुठलेही संकेत मोडले गेलेले नाहीत असा अमेरिकेचा दावा आहे. आधीची चर्चा वाचली तर एम्बसी आणि कॉन्सुलेटला असलेल्या प्रिविलेजेसचा उलगडा होईल.

>> आणि प्रत्येक "गे" हा पीसफुलच पद्धतीने जगत असतो असे जनरलायझेशन कशावरून?
जो नसेल त्याच्यावर पीसफुल नाही म्हणून कारवाई जरूर करावी की. त्यात गे असण्यानसण्याचा काय संबंध आणि काय जनरलायझेशन?

या सगळ्या गदारोळात एक ठळक बाब विचारात घेतली पाहिजे, ती म्हणजे अमेरिकेत कायद्यासमोर सगळे गुन्हेगार सारखे. अन्लाइक भारत, इथे व्हिआयपी, नेते, उच्चपदस्थ वगैरे लोकांना सुध्दा बेड्या ठोकल्या जातात, त्यात नविन किंवा जगावेगळं काहि नाहि. पण भारतात तसं काहि होत नाहि; म्हणुन हा सगळा सामान्यांपासुन नेतेमंडळींपर्यंतचा आउट्क्राय समजु शकतो. Happy

इबा,
तुमचा तो पॅरा मी नीट वाचला आहे. सगळ्या बोल्ड सकट.

अमुक माणसाला अटक करताना कोणती कलमे लावलीत, ते त्याला अटक करतांना सांगण्याची पद्धत सगळीकडेच आहे. अमेरिकेत तर जास्तच आहे. 'रीडींग युअर राईट्स' अशी ती कन्सेप्ट आहे.

त्या 'आमच्या' देवयानीबाईंना अटक करताना 'ह्यूमन ट्रॅफिकिंग' कलम लावले होते का?

जर फक्त सिव्हिलियन ऑफेन्स = कागदपत्रे चुकीची देणे, व पगार दिला नाही (*योग्य पगार दिला नाही याचा पुरावा कुठे आहे? पण ते अलाहिदा.) असे कलम लावून अटक केलेली असेल, व तशीच ती होती, किमान पहिल्या बातम्यांत तरी, तर क्रिमिनल ऑफेन्स तो देखिल ग्रिव्हियस असल्यासारखी वागणूक देणे, यात अर्थ काय?

अमेरिकन प्रशासनाची ही वागणूक बरोबर, की चूक, या बद्दल बोलण्याऐवजी 'आमच्या' देवयानीबाई, इत्यादी सुरू आहे, ते का??

America drew the first blood. Happy त्याचे रिपर्कशन्स तर येणारच.

इथे तापलेल्या लोखंडावर फटके मारुन तेढ वाढवण्याचा प्रकार चालु आहे.
१) सोनियांजींविरुद्ध तक्रार अमेरिकन शीख संघटनेने केली आहे. ते असले प्रकार सर्वत्र (कॅनडा, युके, जर्मनी) तुन करत असतात. याचा खोब्रागडे केसशी काहिही संबंध नाही. अशा तक्रारी भाजप, कॉन्ग्रेस, टी पार्टी खुद्द अमेरिकन सरकार विरुद्ध कोणना कोण करत असते.
२) कायदा आणि त्याचे पालन याच्यात सर्वत्र "due procedure" आणि "non-retaliation" ह्या गोष्टींनी किती महत्व असते हे भारतातील वा अमेरिकेतील कोणताही लॉयर सांगेल.
यामुळे भारताने जर गे पार्टनर्स ना व्हिसा नाकारायचे ठरविले तरी त्यात ड्यु प्रोसिजर पाहिजे म्हणजे
अ) हा कायदा फक्त अमेरिकनच नाही तर सर्व देशांना समान रित्या लागु करावा.
ब) पुर्वी हा कायदा लागु नसताना त्या कालावधीत दिलेल्या व्हिसाचा मान राखावा लागेल.
क) भारतीयांना पण हा कायदा लागु होतो तसा करावा लागेल.

मी याआधी पण लिहिले की मलाही देवयानीबद्दल वाईट वाटले पण अमेरिकन सरकारने ही कारवाई "भारता"विरुद्ध केली नाही तर स्वस्तात इथे लोकांना आणुन नंतर त्यांना फरार करायला मदत करणार्या अधिकार्याविरुद्ध केली आहे. अशी कारवाई यापुर्वी इतर देशातिल अधिकार्यांविरुद्ध आणि अमेरिकेन एजन्सीज व नागरिकांवर पण वेळोवेळी केली गेली आहे.

आपण बरेचदा भारतात असताना म्हणतो की बाहेर कायदे कसे कडक असतात, जसे सिंगपोरला चुइंगगम रस्त्यात टाकल्यावर अटक करतात, आता ते सर्वांनाच करतात आणी दुर्दैवाने उच्च्पदस्थ अधिकार्याने केली तरी त्याला पण करण्यात येइल (स्पेसिफिकली करण्यात येइल) अशी परंपरा असते. हा कल्चरल डिफरन्स आहे. वाईट ह्याचे वाटते की बर्याच जणांना ही मुद्दाम भारतीय म्हणुन दिलेली ट्रीटमेंट वाटते.
अमेरिकेत अजुन रेसिझम नाही असे अजिबात नाही पण ही केस त्यातली जरा पण वाटत नाही कारण ह्या निर्णयात अनेक लोक सामाविष्ठ आहेत.

वरती लिहिल्याप्रमाणे जर न परवडणार्‍या मिनिमम पगाराचा मुद्दा आहे आणि प्रत्येक वेळेला त्याची कटकट होते आहे तर याची वरच्या पातळीवरून आधीच दखल का घेतली गेली नाहीये हे कळलं नाही

त्याशिवाय मला पडलेले काही प्रश्न -
भारताप्रमाणेच इतरही 'गरीब' देशातल्या दूतावासांतल्या नोकरांच्या पगारांमधे पण अशा इर्रेग्युलॅरिटीज असतील का?
का इतर देशांच्या दूतावासात नोकर नसतात? नोकर नसल्यास ते कर्मचारी कसं काय काम चालवतात?

आपण दूतावासातल्या नोकरीत हाताखाली चाकर न ठेवता दैनंदिन संसार चालवू शकत नाही यामागे भारतीय मानसिकता, घरातल्या प्रत्येकाने घरकामात समान कॉन्ट्रिब्यूशन न करणे इ. बाबी असू शकतात का? (हे उपरोधाने विचारलेले प्रश्न नव्हेत, तर खरंच असलेल्या शंका आहेत)

समजा एखादी युरोपीअन, अमेरिकन स्त्री अधिकारी त्याजागी असती तर तिच्याकडेही बाय डिफॉल्ट नॅनी असलीच असती का? (त्यांना पगार परवडतो का नाही हा मुद्दा इथे लागू नाही - आवश्यकता भासली असती का असा मुद्दा विचारायचा आहे)

>> आणि प्रत्येक "गे" हा पीसफुलच पद्धतीने जगत असतो असे जनरलायझेशन कशावरून?
जो नसेल त्याच्यावर पीसफुल नाही म्हणून कारवाई जरूर करावी की. त्यात गे असण्यानसण्याचा काय संबंध आणि काय जनरलायझेशन?
<<

अहो,
'गे' असणे, हेच मुळात आजच्या भारतीय कायद्यानुसार, गुन्हेगारी वर्तन आहे. अनैसर्गिक संभोगाला कडक शिक्षाही आहे. Happy हातकड्या घालून अटक करायला हवी होती का? इथे फक्त कारवाई होऊ शकते इतकेच सांगितले गेले आहे.

भारतीय कायद्यांना भारताच्या भूमीवर काडीचीही किम्मत नाही का? Wink

अमेरिकेत कायद्याचे राज्य आहे हो इब्लिसभौ...आपल्यासारखं नाय काय...आनि अमेरिकेचा कायदा म्हंजी काय एकदम जंक्शन असतो काय समजलात? Wink

इब्लिस, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिना यांनी दिलेल्या लिंकमधे आणि निलिमा यांच्या लेटेस्ट पोस्टमधे आहेत. तेच ते पुन्हा लिहीत नाही.

त्या अमेरिकन अधिकार्‍यांना आणि त्यांच्या त्या कंपॅनियनना काय ते करताना पकडा आणि मग ठोका बेड्या शक्य असेल तर. मुळात त्या कायद्याखाली किती भारतीयांना तरी बेड्या ठोकल्यात ते कळू दे,

वरदा, तुझ्या बाकी प्रश्नांची उत्तरं नाहीयेत, पण
समजा एखादी युरोपीअन, अमेरिकन स्त्री अधिकारी त्याजागी असती तर तिच्याकडेही बाय डिफॉल्ट नॅनी असलीच असती का? >> भारतात नेमणूक झालेल्या बहूतेक सगळ्या (९९%) युरोपियन /अमेरिकन अधिकार्‍यांकडे नॅनी आणि मेड्स असतात (एकापेक्षा जास्त). बहूतांशी या मेड्स भारतियच असतात.
कॉन्स्युलेट्सच्या पार्ट्यांना /ख्रिसमस - न्यु इयर डिनर्सना या अधिकार्‍यांबरोबर, मुलांसोबत त्यांना सांभाळणार्‍या भारतिय आया खूपवेळा बघितल्या आहेत.

आधीची चर्चा वाचली तर एम्बसी आणि कॉन्सुलेटला असलेल्या प्रिविलेजेसचा उलगडा होईल.
<<
ज्या देशात सामान्य नागरिकालाही अटक करताना, रस्त्यावर हातकड्या घालताना "ह्युमनेटरियन" विचार केला जातो, तिथे या बाईंना अशी हिडिस वागणूक का दिली, हा संतापाचा मुद्दा आहे. राजदूत अन राजनैतिक कर्मचारी यांच्यातला फरक गेला उडत.

नॉर्मल ऑर्डर देऊन, किंवा नुसतं हात धरून गाडीत बसवलं असतं तर काय हिने काय गोळीबार वगैरे केला असता का?

कैच्याकै.

जी प्रोसिजर तुम्ही तुमच्या देशातल्या गोळीबार करणार्‍या माथेफिरूला अटक करताना वापरतानाही विचार करता, ती प्रोसिजर भारताच्या राजनैतिक अधिकार्‍यास का वापरली गेली? हे या प्रकरणातल्या संतापाचे मूळ आहे.

बाकी हा प्रश्न इथे विचारून काडीचाही उपयोग नाही, कारण अमेरिकी प्रशासनातील अधिकारी इथे नाहीत, अन मी भारताचा प्रवक्ता नाही. भारताच्या अधिकृत प्रवक्त्याने योग्य तिथे योग्य प्रश्न विचारलेच आहेत. भारताने करायची ती कारवाई केलीच आहे. अन फॉर अ चेंज भारतातील सर्व पक्षांनी एकमुखाने याचे समर्थन केले आहे.

कुठे तरी १०५ आहोत, याचा मला अभिमान वाटतो आहे.

इब्लिस, तुम्ही मागे पण एका चर्चेत 'तुमचं आमचं' सुरू केलं होतं. इथे पण. काय संबंध? समजा ही चर्चा इराक-भारत अशी असती तरी तुम्ही तुमचं-आमचं केलं असतं का?

इब्लिस, सीरियसली?

>>
She was not handcuffed until she arrived at the courthouse, a law enforcement source familiar with the case told CNN, calling that "a courtesy not afforded to most people," including alleged white-collar criminals.
<<
हे वाचलं नाहीत का?
आणि
>>
Khobragade, 39, was held in a cell with other females and strip-searched in New York following her arrest, the U.S. Marshals Service said, noting such treatment was standard procedure in her case and that no policies were violated. She eventually posted bond and was released.
<<
हे ही?

>> जी प्रोसिजर तुम्ही तुमच्या देशातल्या गोळीबार करणार्‍या माथेफिरूला अटक करताना वापरतानाही विचार करता
हे कशावरून म्हणे?

शाळेसमोर बेड्या घातल्या आणि कॅव्हिटी सर्च केला ही भारतीय मीडियाने केलेली एग्झॅगरेशन्स दिसताहेत.
फ्रॉडला सपोर्ट करणारे १०५ तुम्हाला लखलाभ!

.

रस्त्यावर हातकड्या घातल्या नव्हत्या अशी बातमी आहे. ही विडीओ लिन्क बघा(भारतात दिसेल की नाही माहिती नाही)
http://www.cnn.com/video/?/video/bestoftv/2013/12/17/exp-erin-sot-candio...

"Foreign nationals brought to the United States to serve as domestic workers are entitled to the same protections against exploitation as those afforded to United States citizens," Manhattan U.S. Attorney Preet Bharara said in a statement last week announcing Khobragade's arrest.
<<

एक्स्प्लॉईटेशन विरुद्ध आमच्या नागरिकांइतकेच आम्ही फॉरेन नागरिक असलेल्या नोकरांबद्दलही सेन्सिटिव्ह आहोत,

फक्त, त्यांच्या मालकिणींना, मुलांना शाळेत सोडायला आलेले असताना रस्त्यात पकडून हातकड्या घालून नेऊ, हे जास्त सेन्सिटिव्ह आहे. जै प्रीत भरारा द अम्रिकन अ‍ॅटर्नी.

जी प्रोसिजर तुम्ही तुमच्या देशातल्या गोळीबार करणार्‍या माथेफिरूला अटक करताना वापरतानाही विचार करता, ती प्रोसिजर भारताच्या राजनैतिक अधिकार्‍यास का वापरली गेली? हे या प्रकरणातल्या संतापाचे मूळ आहे.
>>
इब्लिस ही गोष्ट मला एकदम मान्य आहे, जर कोणताही संपर्क आधि न साधता (उदा वारंवार नोटिस, फोन
करुन स्पष्टीकरण मागविले वा भेटायला बोलविले असताना भेट नाकारणे, देवयानीला तिचे अधिकार वाचुन न दाखवणे) अशी प्रक्रिया कायद्याबाहेर जाउन अधिकार्यानी केली असेल तर देवयानीचे वकिल नक्कीच त्यांना शिक्षा देउन देवयानीला न्याय आणि कॉम्पेनन्सेशन मिळवुन देतिल (त्यात त्यांचा पण फायदा आहे).
पण ही घटना अमेरिकेने भारताचा अपमान करण्यासाठी केली आहे असे मला अजिबात वाटत नाही.

माझ्या ओळखीचं एक अमेरिकन दांपत्य युरोपीअन देशातल्या एका दूतावासात उच्चपदस्थ अधिकारी आहे. दोघंही. त्यांना लहान बाळही आहे. क्रेश आहे. पण एरवी ते दोघं कुठल्याही मदतीशिवाय व्यवस्थित मॅनेज करतात. त्यांच्याकडे नोकर नाही. म्हणून हा प्रश्न पडला. >> मला सुद्धा वाटतं यामध्ये भारतिय मानसिकता आहे. म्हणजे कामाची समान वाटणी नाही हेच कारण असेल असं नाही, पण भारतामध्ये आयएफएस /आयएएस अधिकार्‍यांकडे असतात मेड्स /नॅनीज्/ड्रायव्हर्स म्हणून सवयीचा स्टेट्सच भाग म्हणून तिथेही न्यायचे.

निलिमा,
आपण जी चर्चा करीत आहोत, ते बातम्या पाहून.
'वर' बसलेले लोक जे काय करत आहेत ते जास्त खोल असते.
नुसती लिकर लायसन्सेस नव्हेत, अमेरिकन एंबसीजवरील टेररिस्ट हल्ल्याची शक्यता, कार बाँब इत्यादी गृहित धरून देऊ केलेले एक्स्ट्रा प्रोटेक्शन काढून घेण्यापर्यंत ऑफिशिअल अ‍ॅक्शन जाते आहे, तरीही,

(edit: cnn news : http://edition.cnn.com/2013/12/17/politics/india-us-diplomat/index.html?...)

The U.S. State Department sought to prevent tensions from escalating further, while admonishing the Indian government on the punitive measures.

Marie Harf, a State Department spokeswoman, said appropriate procedures appear to have been followed by the Diplomatic Security agents who arrested Khobragade. She said conditions surrounding her processing by U.S. Marshals would be examined.

"We understand that this is a sensitive issue for many in India," Harf said. "Accordingly, we are looking into the intake procedures surrounding this arrest to ensure that all appropriate procedures were followed and every opportunity for courtesy was extended."

She said the United States and India "enjoy a broad and deep friendship and this isolated episode is not indicative of the close and mutually respectful ties we share."

But Harf said Khobragade's arrest should not be cause for a diplomatic tit-for-tat with reciprocal measures against U.S. diplomats.

"This limited episode was somebody who was charged with a crime, is a separate and isolated incident," Harf said. "We have conveyed at high levels to the government of India our expectations that India will continue to fulfill all of its obligations under the Vienna Convention."

"The safety and security of our diplomats and consular officers in the field is a top priority," she added. "We'll continue to work with India to ensure that all of our diplomats and consular officers are being afforded full rights and protections."
<<

हे अमेरिका ऑफिशिअली म्हणते आहे.

पाणी कुठे मुरते आहे?

मी फक्त आंधळेपणाने इथली जी लोक्स देवयानी खोब्रागडे यांना आधीच गुन्हेगार ठरवून मोकळी झालीत, त्यांच्याशी डोकं लावतोय. Wink

स्वातीताई, कॅव्हिटी सर्च केल्याचे खुद्द देवयानी खोब्रागडे म्हणत आहेत. त्या खरे बोलत आहेत की खोटे याची शहानिशा होण्याआधी किंवा अमेरिकन संस्थांकडून काही खुलासा येण्याआधीच तुम्ही हे 'एग्झॅगरेशन' कशाच्या आधारे ठरवत आहात हे कळेल का?

Lol बायदवे इब्लिस ना १०५ चं कौतुक वाटावे इतके ते भाबडे जीव असतील असे वाटले नव्हते Happy
अहो निवडणूक तोंडावर ,त्यात भारतीय नारी, स्त्रीची अब्रू, अमेरिका, देशप्रेम , इतके सगळे टिआरपीचे मुद्दे एकत्र भेटल्यावर कोणता पक्ष फायदा घेणार नाही !

इब्लिस , अहो मार्था स्टिवर्ट , Blagojevich, रजत गुप्ता या सगळ्यांना स्टँडर्ड प्रोसिजरला सामोरे जावे लागलेले आहे. अभिमान बाळगण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आणि एकजुट वगैरे पण ग्रेट. पण ती चुकीच्या ठिकाणी वापरली जातीये दुर्दैवाने.
वरदा, बाकिंच्याच मला माहित नाही. पण जनरली ४५०० पगारात जर तुम्ही घराच भाड देत असाल स्वखर्चातून न्युयॉर्क सारख्या ठिकाणी तर वीकली मेड परवडू शकते. पण नॅनी नाही.कारण मिनिमम जे वेतन वरती लिहिलय त्यापेक्षा कितीतरी अधिक नॅनींचा रेट सध्या इथे आहे. १०/१५ डॉ पर अवर.(यात मुलांना संभाळणे, होम मेंटन्न्स वगैरे धरलयं.) अशा वेळी दिवसाला ८ तास जरी नॅनीने काम केल तरी ते परवडू शकत नाही.
तस असत तर नॉर्मल IT जॉब करणार्‍या सगळ्या लोकांनी नॅनी ठेवली असती.
मला वाटतय उगाच याला अमेरिका विरुद्ध भारत असा रंग दिलाय. मायबोलीवर पण जे लोक अमेरिकेच्या बाजूने लिहितायत ते "अमेरिका कायदा जंक्शन असतो" वगैरे भावनेतून नाही. तर सिंपली, डे टु डे लाईफ मध्ये बर्‍याच प्रमाणात हा कायदा जवळून पहायला मिळतो एवढचं. आणि म्हणुन ती बाजू मांडली जातीये.

ज्ञानेश, देवयानी खोब्रागडे मेडला दरमहा $४५०० देणार असंही लेखी म्हणाल्या होत्या. त्यांच्यावर किती विश्वास ठेवायचा?
भारतीय मीडिया शाळेसमोर बेड्या ठोकल्या आणि कॅव्हिटी सर्च झाला म्हणतो आणि सीएनएन शाळेसमोर बेड्या ठोकल्या नाहीत आणि स्ट्रिप सर्च झाला म्हणतो. माझं मत सीएनएनला.

कॅव्हिटी सर्च ही सुद्धा काही जेल ऑथारिटीने ठरविलेली स्टँडर्ड प्रोसिजर आहे ज्ञानेश. वेगळ काही केल नाहीये. त्या पर्टीक्युलर जेलचे जे नियम आहेत ते लावलेत.(जर खरोखर केली असेल तर)
त्यांना अगोदर वॉर्निंग मिळालेली. त्यांनी ती इग्नोअर केली. खरच इथे अशावेळी अजिब्बात सहानुभुती दिली जात नाही. साध उदा.
ड्रायव्हिंग तिकिट मिळालय. तुम्हाला फाईन भरता येतो. कोर्टात लढता येत. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंग घेता येत. तुम्ही महिन्याभरात तिकिटाकडे बघत नाही. डिफेन्सिव्ह ड्रायव्हिंगचा ऑपश्न गेला. फाईन वाढला. तरी तुम्ही लक्ष देत नाही. तुमच ड्रायव्हिंग प्रिव्हिलेज गेल. लॉज आहेत तसे.

इथे आमच्या इथे डॅलस मध्ये चाईल्ड अ‍ॅब्युज ची केस एका देसी बाईकडून झाली. तिला सुद्धा असेच बेड्या ठोकून नेलेले.
चाईल्ड अ‍ॅब्युज, एम्प्लॉयी अ‍ॅब्युज अत्यंत सिरिअसली घेतल जात.

सिंडाक्का,
>>
इब्लिस, तुम्ही मागे पण एका चर्चेत 'तुमचं आमचं' सुरू केलं होतं. इथे पण. काय संबंध? समजा ही चर्चा इराक-भारत अशी असती तरी तुम्ही तुमचं-आमचं केलं असतं का?
<<

हे बघा Happy

>>
इब्लिस, मी पहिल्या पानावर व्हीसाचे डीटेल्स दिलेत त्यात इन्व्हॉलेन्टरी सर्व्हिट्यूडबद्दल लिहिलेलं वाचा.
तुमच्या देवयानीबाईंनी मेड गायब झाल्यावर भारतात तक्रार नोंदवून आणि तिच्या कुटुंबियांना अटक करवून अब्यूजमधे भरच घातली आहे!
<<

एस्सेस टाकू?

सीमा मला नोकरांवर अति अवलंबून असणं हा भारतीय मानसिकतेचा भाग वाटतो. भारतातली परिस्थिती, आर्थिक गणितं आणि इतर काही फॅक्टर्स बघता इथे मोलकरणी, आया, घरगडी हे परवडण्यासारखेही असतात आणि आवश्यकही. पण त्यांच्याशिवाय इतर देशांतली वर्किंग पेरेन्ट्सची कुटुंबं चालतातच ना?

आय डिड नॉट ड्रॉ द फर्स्ट ब्लड मॅम Happy
आय डोण्ट.
स्पेसिफिक इब्लिस नांव घेऊन, 'तुमच्या देवयानीबाई'??? वू हू Wink
थयथयाट मोड ऑन करायलाही कारण लागतं ना भो Sad

सीमा | 18 December, 2013 - 08:12
इब्लिस , अहो मार्था स्टिवर्ट , Blagojevich, रजत गुप्ता या सगळ्यांना स्टँडर्ड प्रोसिजरला सामोरे जावे लागलेले आहे. अभिमान बाळगण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही. आणि एकजुट वगैरे पण ग्रेट. पण ती चुकीच्या ठिकाणी वापरली जातीये दुर्दैवाने.
वरदा, बाकिंच्याच मला माहित नाही. पण जनरली ४५०० पगारात जर तुम्ही घराच भाड देत असाल स्वखर्चातून न्युयॉर्क सारख्या ठिकाणी तर वीकली मेड परवडू शकते.
>>

सीमा हे विषयाला धरुन नाही पण मला जी लिन्क मिळाली होती (काल पोस्ट केली आहे) त्यात तिला १००००० पगार आहे आणि रहाण्याचे व्यवस्था भारत सरकारतर्फे होते. पण हा मुद्दा गौण आहे, फक्त सहान्भुती वापरण्यासाठी त्याचा वापर केला जात आहे म्ह्णुन लिहिले.

Pages