आयुष्य

Submitted by HemangiPurohit on 18 December, 2013 - 06:01

आयुष्याच्या वाटा
थोडे खळगे थोड्या लाटा

जपून चालावे तर
लाटांबरोबर वाहत जाण्याची भीती
धावत जावे तर
खळग्यात पडण्याची भीती

तरीही मन होते फुलपाखरू
स्वप्नगंधी फुलांनी लागते बहरू

आसमन्ताच्या जादूने रंगांची उधळण
अंगणात जणू प्राजक्ताची पखरण

वृक्षवल्लींना चढतो फुलांचा साज
कधी गंभीर होते मन ऐकून समुद्राची गाज

बहर ओसरू लागताच तुटतात स्वप्न साखळ्या
कागदावर उतरू लागतात शब्द चारोळ्या

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान !!!

आयुष्याच्या वाटा
थोडे खळगे थोड्या लाटा

या ओळी फारच आवडल्या !