मदत हवी आहे...

Submitted by rahul utekar on 18 December, 2013 - 02:29

मदत हवी आहे...

मुलाच्या लग्नासाठी प्रोवीडट फंड (पी.एफ..) मधून पैसे काढण्यासाठी मराठीत अर्ज करणारे एक लेटर पाहिजे आहे.... प्लीज कोणाकडे त्याचा मायना असेल तर किंवा कोणी टाईप करून देणारे असेल तर त्यांचे खूप खूप आभार होईल...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

राहुलजी,
पीएफ विड्रॉअलसाठी दोन फॉर्म असतात असं माझ्या ऑफीसमधुन नुकतच कळलय!
ते पीएफ ऑफीसमधे पण मिळतात. आणि मराठी/ इंग्रजी अशा दोन्ही भाषेत मिळतात.

पण त्यांनाच मराठीत लेटर पाहिजे तर काय करू... आणि गुगल वर पण खूप सर्च केलं काहीच सापडलं नाही म्हणू तुमच्या सारख्या मित्रांची मदत घ्यावी लागत आहे... Sad

मी आताच ऑफीसमधे चौकशी केली ते म्हणाले, मॅनेजमेंटला तुमच्या पी. एफ. शी काही देणं घेणं नसतं.
कारण ते सर्वस्वी तुमचे पैसे असतात. तुम्ही ते काही विशिष्ट कारणासाठी काढु शकता. इथे एम्प्लॉयरला अर्ज करण्याची काहीच आवश्यकता नाही आणि त्यासाठी पी.एफ. ऑफीसमधेच अर्ज मिळतात. तो भरुन त्यावर फक्त त्यांचा सही शिक्का घ्यायचा आणि पी. एफ. ऑफीसला सबमिट करायचा.

मी_आर्या खूप खूप धन्यवाद... आणि बाकीच्यांचे पण खूप खूप धन्यवाद तरीही जर तुम्ही मला मायना दिला असता तर चाललं असतं... ठीकाय मीच बघतो काही ते... :'(

तरीही जर तुम्ही मला मायना दिला असता तर चाललं असतं... ठीकाय मीच बघतो काही ते... :'(

>> अहो राहुल, ज्याअर्थी तुम्हाला हा अर्ज तुमच्याच एम्लॉयरला द्यायचा आहे, त्याअर्थी हा काही सरकारी अर्ज नाही ज्याचा काही ठराविक नमुना असावा. एखाद्या गॅस एजन्सीला किंवा पोस्ट खात्याला अ‍ॅड्रेस बदलण्याचा जसा अर्ज लिहाल तसाच लिहुन टाका स्वत:च.

आणी तुमच्या कंपनीचा काही स्वतःचा ठराविकच फॉरमॅट असेल तर तो तुम्हाला एचआर डिप. कडे मिळेल अगदी सहज. काळजी करू नका.