फुंकर

Submitted by जयदीप. on 17 December, 2013 - 10:26

बोलका आहे तसा मी, माणसांना जोडतो
का असा गर्दीत मग एकांत माझा बोलतो

चाल तू आता जराशी, मी जरासा चालतो
संपवा अंतर मनाचे..ऎक रस्ता सांगतो

तू तुझेपण सोड थोडे सोडतो मी ही जरा
ताणणे नाही बरे हा खेळ तुटता संपतो

वाटते चर्चा नकोशी आपल्याला आजही
प्रश्न साधा ही तसा मग उत्तरांना टाळतो

वादळे झाली नव्याने आज माझ्या अंतरी
का कळेना आठवांना.. मीच फुंकर मारतो

Group content visibility: 
Public - accessible to all site users

तुम्ही बर्‍याच वेगात गझल रचत आहात असे मला तूर्त वाटत आहे. असे केल्याने खयाल वाया जाऊ शकतात असा स्वानुभव आहे.

मिसर्‍यातला सफाईदारपणा प्रशंसनीय.

बेफि म्हणताहेत त्याप्रमाणे खयालांवर गांभीर्याने विचार करायला लागावेत.

असे केल्याने खयाल वाया जाऊ शकतात<<< ह्याना सांगून झाले आहे माझे पण ह्या गाडीचे ब्रेक फेल दिसताय्त Wink थांब्तो म्हणताय्त पण थांबतीलसे वाटत नाही
असो रचना आवडली

वैभवजी....

धन्यवाद...
Happy

मा कसम...मी एक पण गझल घाई करून अपलोड करणार नाही... :p
Happy
(मला ही रचना नाही आवडली आहे...फक्त शेवटचा शेर आवडलाय).

आता खरोखर ब्रेक घेतोय...

Happy