अचाट मजेदार बातम्या

Submitted by उदयन.. on 29 November, 2013 - 04:36

निंबुडा यांचा पत्रकारितेची कमाल - मांजरीचे सूडनाट्य हा धागा वाचला..

या वरुन या धाग्याची संकल्पना घेतली

सकाळ, नवाकाळ इत्यादी बर्याच वृत्तपत्रांतुन आणि न्युज चॅनल्स च्या माध्यमातुन काही अचाट मजेदार बातम्या प्रसिध्द होतात......त्याला ना आगा असतो ना पिछा असतो..

यात इंडिया टिव्ही नावाचे न्युज चॅनल सर्वात पुढे आहेत......या चॅनल्स च्या हेडलाईन्स तर इतक्या अचाट असतात की हसुन हसुन पोट दुखायला लागते

काही उदा.

1.jpg2_1.jpg3.jpg4.jpg5.jpgइथे फक्त मजेदार आणि अचाट बातम्या द्याव्यात ... Biggrin

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

उदयन Rofl

दिनांक ३१ जुलै २०१३ चा सकाळ - पान क्रमांक नऊ - बातमी खालीलप्रमाणे (अगदी फोटोसकट)

(ह्या बातमीचे कात्रण मी ठेवलेले आहे, सापडले की स्कॅन करून येथे टाकतो)

मुंडी नसलेला कोंबडा!

आपण सगळेच जाणतो की कोंबड्याची मुंडी कापली की तो मरतो. मात्र (कोठेतरी) एक मुंडी नसलेला कोंबडा सापडला आहे. छायाचित्रात दाखवलेला हा कोंबडा मुंडी नसतानाही गेले पंधरा दिवस रस्त्यावरून फिरत आहे. तो एका कचरापेटीत एका प्लॅस्टिकच्या पिशवीत आणखीन एका मुंडी कापलेल्या कोंबड्यासहित होता. तो दुसरा कोंबडा मेलेला होता, मात्र हा कोंबडा मुंडी नसूनही प्लॅस्टिकच्या पिशवीतून बाहेर यायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर तो रस्त्यावरून फिरत राहिलेला आहे. लोक हा भुताटकीचा प्रकार असावा असे समजून घाबरलेले आहेत.

Rofl

माहिती असेल रे गप्पि... बाजारात भाजी आणायला गेली असेल आणि कांद्यांचे भाव ऐकुन ऑन द स्पॉट गेली असेल त्यामुळे तिचा कांदे विकत न घेता आलेला अतृप्त आत्मा कांदे मागत फिरत असेल... Biggrin

मुग्धा, जबरदस्त हसले, कांद्याचे भाव ऐकून.....अतृप्त आत्मा कांदे मागत फिरत असेल.

मुग्धा Lol

रात के अंधेरे मे... वाला संवाद मला वाटले कोणत्यातरी सिरीयल मधली एक स्त्री दुसर्‍या स्त्री बद्दल बोलत आहे. त्यात आधी ते 'प्यार माँगती है' असेही वाचले Happy

अरे मला वाटल हिमेशच्या बातमीवर तुडुंब चर्चा होईल.
ती बातमी बघुन माझ्या डोक्यात आल की हिमेश तोंड वर करुन ऊऊऊऊऊऊऊ करुन गायचा ना त्यामुळे त्याचा एलियंसशी संपर्क झाला असावा. एलियंसना तो त्यांच्यातलाच वाटला असेल, "कुंभ के मेले मे हरवलेला भाईबंद" म्हणुन ते त्याला घेउन जायची योजना बनवत असावेत. एखाद्या अतिउत्साही एलियनने हिमेशला ही बातमी पोस्ट करता करता चुकुन मिडियाला गेली

http://www.usatoday.com/story/news/world/2013/12/12/mandela-sign-languag...

नेल्सन मंडेलांच्या स्मरणानिमित्त जो समारंभ केला होता त्यात जगातल्या मोठ्या नेत्यांची भाषणे झाली. ती कर्णबधीर लोकांपर्यंत पोचवायला जो तथाकथित साइन ल्यान्ग्वेज तज्ञ बोलवला होता तो त्या भाषेत ठार अक्षरशत्रू होता. भाषण चालू असताना तो अक्षरशः वाट्टेल त्या अर्थशून्य खुणा करत होता.

जेव्हा त्याला नंतर त्याबद्दल विचारले तेव्हा तो म्हणाला त्याला भाषण चालू असताना डोक्यात वेगवेगळे आवाज ऐकू येत होते! ( बहुधा त्यातला निदान एक आवाज "आता तरी ती भाषा शिकायचे मनावर घे" असा असावा!)

इतकेच नाही तर तो एक माथेफिरू, हिंसक मनोरुग्ण आहे आणि त्याच्यावर काही खून वगैरे गुन्ह्यांचा आरोपही आहे. वेडसरपणाचा आधार घेऊन त्यातल्या एका आरोपातून तो सुटला आहे.

हा असला नमुना इतक्या अतीमहत्त्वाच्या व्यक्तींच्या इतक्या निकट उभा राहू कसा शकला आणि त्याला ह्या कामाकरता कुणी नि कसा निवडला हे एक कोडेच आहे.

सुमारे साडेपाच हजार वर्षांपूर्वीच्या कांस्य युगामध्ये पुरण्यात आलेल्या या सांगाड्याचा हा मानवी चेहरा तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश आले आहे!
4619318879432260766_Mid.jpg

Pages