एस्सेल वल्ड की अ‍ॅडलॅब्स इमॅजिका की अजुन काही पर्याय ???

Submitted by _आनंदी_ on 16 December, 2013 - 05:27

एक दिवसाच्या सहली साठी मुंबई जवळ च्या ठिकाणी जायचे आहे..
दोघे च जाणार आहोत... रिसॉर्ट जरा बोअर झाल आहे...
मजा करायची म्हणुन एस्सेल किंवा इमॅजिका चा विचार करत आहोत...
प्लिज आपले अनुभव शेअर करा..
इमॅजिका काहिच्या काही महाग असल्याचे ऐकले .. तथ्य आहे का त्यात?
म्हणजे फूड कॉस्ट ई. आत गेल्यावर खुपच जास्त आहे ई.
अजुन काही स्थळं असतिल तर सुचवा..

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अम्युझमेंट पार्कला गृपने जाण्यात मजा आहे.
इमॅजिकामधे १८०-४०० रुपयांपर्यंत जेवणाचे दर आहेत. ४-५ मोठ्या राईड्स + ५-६ ३/४ डी शोज + ३-४ थीम स्टुडीओज आणि सटरफटर लहान मुलांच्या राईड्स साठी साधारण २०००/- तिकिट मला तरी वर्थ वाटलेल. ऐक्स्प्रेस तिकिटाचे चार्जेस एक्स्ट्रा घेतात (बहुतेक ३००/-) विकांताला जाणार असाल तर ऐक्स्प्रेस तिकिटच काढा नाहीतर प्रत्येक ठिकाणी लाईनमधेच निम्म्यापेक्षा जास्त वेळ जातो.

ओक्के धन्यवाद.. Happy ..
खरतर अ‍ॅनिवर्सरी आहे म्हणुन दोघेच.. मुलगी लहान आहे ..तिला घरी आई कडे ठेऊन जाणार ... त्यामुळे मुक्कामाची ट्रिप न करता एक दिवसात थोडी मजा करुन घरी परतायचे आहे...
इमॅजिका चांगला वाटत आहे तुमचा प्रतिसाद वाचुन .. बघु अजुन कोणी काही अनुभव लिहिते का ते..

मी केळवे बीचला राहतो. केळवे बीच मुंबई पासून २.३० तासाच्या अंतरावर आहे. झाडापानांनी बहरलेले आणि सुंदर समुद्र किनारा लाभलेले आमचे गाव आहे. समुद्र किनार्याजवाळच शीतलादेवीचे मंदिर आहे. जेवण्यासाठी, राहण्या साठी भरपूर हॉटेल्स आहेत. आपला दिवस मजेत जाईल यात शंका नाही. काही मदत लागल्यास मी आहेच.
https://www.facebook.com/kelva.beach.3

अजून एक पर्याय- नाशिकचं सूला वाईन रिसॉर्ट. आम्ही नेक्स्ट वीकेन्ड जात आहोत.

केळवे बीचला मुंबईहून जाण्याकरता काय आणि कशा सोयी आहेत? प्रायव्हेट कार व्यतिरिक्त?

* ओके. तुमची वेबसाईट पाहिली. धन्यवाद.

खरतर ... प्रेग्नंसी .. डिलिव्हरी अशा लांब कालावधीत बाहेर जाणे झाले नाही आणि झालेच तर अगदी रिसॉर्ट ई. इन्डोअर शांत ठिकाणीच जाउ शकलो म्हणुन सध्या काही एस्सेल्/इमॅजिका ई. बघत आहोत..

एस्सेल्च मोस्ट्ली कारण इमॅजिका एक्स्प्रेस तिकिट चेक केल तर डायरेक्ट ३०००/- आहे..
फार च महाग वाटल..
बघु काही सजेशन्स मिळाले तर पुनः विचार करेन Happy

इमेजिका सुरू झाल्या झाल्या गेलो होतो तेव्हा तिकिट १२००/- होतं प्रत्येकी. आम्हाला तरी ते वर्थ एव्हरी रुपी वाटलं होतं. काही शोज तर एकच नंबर आहेत तिथे. पण ३०००/- प्रत्येकी खूपच जास्त आहेत हे मान्य आहे Happy

अकलुज ला सयाजीराजे पार्क वर्थ आहे ४५०/- जेवणासह सगळ्या राईड्स ( रोलर कोस्टर, कप सॉसर, रेंजर राईड, कोलंबस, स्ट्रेट राईड आणि अधिक) प्लस वॉटर पार्क गेम्स आहे, रेन डांस, वेव्ह पुल, स्लाईड्स वगैरे. (स्वीमसुटस त्यांचेच घालावे लागतात त्याचे चार्जेस नॉमिनल आहेत)
स्वारगेटाहुन डायरेक्ट बस पण आहे तिथे जायला. पुणेकरांनी अवश्य लाभ घ्यावा आम्ही दिवाळीत जाऊन आलो.

हा ते एक्स्प्रेस तिकिट ३०००/- ला... ज्यामुळे रांगेत जास्त थांबावे नाही लागणार,,,

नॉर्मल १५००/- आहे.. पण लग्नाचा वाढदिवस गर्दी असेल अशा वेळिच येत आहे त्यामुळे एक्स्प्रेस्स तिकिट काढावे लागेल... अशा भलत्या तारखेला का केल लग्न आम्ही?? Happy

शर्मिला:- <<<<<<हा ते एक्स्प्रेस तिकिट ३०००/- ला... ज्यामुळे रांगेत जास्त थांबावे नाही लागणार,,,

नॉर्मल १५००/- आहे.. >>>>>>>>>>>

आनंदी, कधीकधी गर्दीतही दुकटेपणा अनुभवता येतो Happy १५०० रु. अगदीच वर्थ आहेत. एकवेळ राईड्ज घेतल्या नाहीत तरी चालतील (भीती वगैरे वाटत असेल तर) पण सर्व शोज बघाच. मेड इन इंडिया या एकाच शोमधून पैसा वसूल होतो. हां, आत जेवण, पाणी वेगळे विकत घ्यावे लागते. त्याचे पैसे निराळे आहेत.

शर्मिला, आम्ही नेट बुकिंगच केले होते. एक्स्ट्रा चार्जेस नाही पडले काही.

आनंदी, great escape ला नास्ता आणि जेवण हि खूप स्वादिष्ट असते. मात्र शुद्ध शाकाहारी हा.......

सध्याचा इमॅजिकाचा रेट १९००/- आहे.
पौर्णिमा सगळे शोज मला आवडले.परत गेलो तर शोजसाठीच जाऊ.
पेंड्युलमवाली राईड पण पैसा वसुल आहे.

जर तुम्ही सोम ते शुक्र जाणार असाल तर ऐक्स्प्रेस तिकिट काढावे लागणार नाही.
शुकु पेंड्युलम राईड ईमॅजिकात ३ मिनिटाची आहे. मस्तच आहे ती.

खोपोलीपर्यंत ट्रेननी जाता येईल तिथुन त्यांचा पिक अप फ्री आहे.
स्वतःच्या कारने जाणार असाल तर ऐक्स्प्रेस वे वर खालापुर टोलनाक्याजवळ खोपोली ऐक्झिट घेउन, खोपोली पेण रोडवर आहे ईमॅजिका. ऐक्स्प्रेस वेपासुन २-३ किलोमीटर आहे. खोपोलीपासुन ६ किलोमीटर आहे.

आनंदी, अ‍ॅनिवर्सरीबद्दल

आनंदी,
अ‍ॅनिवर्सरीबद्दल अभिनंदन.

अ‍ॅडलॅब्ज इमॅजिका महाग आहे हे खरेच. तुम्ही दोघे जाणार असाल तर मुंबईहुन जाणे/येणे, तिकिट तिकडे खाणे/पिणे इ. वर खर्च सगळे मिळुन ६,००० रु. पर्यंत खर्च होतील. पण तिकडे तुम्ही घालवलेला वेळ, त्यातुन मिळालेला आनंद याचा जर तुम्ही हिशेब केलात तर तुम्हाला हा बराच स्वस्त सौदा वाटेल.

मला माहित आहे की आपल्यापैकी बर्‍याच जणाना (मलाही) स्वतःवर थोडासा जास्त खर्च झाला कि गिल्टी वाटते पण त्यावर माझा उपाय म्हणजे मग दुसरीकडे कुठेतरी काटकसर करायची उदा. एखादा चित्रपट थेटरला जाउन पाहणे टाळायचे..झाली १०००-१२०० ची बचत, किंवा एखाद्या वेळचे हॉटेलिंग टाळायचे. Happy

मला तरी वाटते तुम्ही जास्त विचार न करता इमॅजिका ला जायचे ठरवुनच टाका. मला तरी वाटते इट इज वर्थ इट.

Have fun!

शुभेच्छा.

मनस्मि .. धन्यवाद.. एक्झॅक्टली.. गिल्ट राहतो मनात .. आणि मी तुम्ही सांगितल आहे तसच इतर ठिकाणी काटकसर करुन भरायचा प्रयत्न करते.. Happy

यस्स्स्स.. इमॅजिका लाच जात आहोत .. जाउन आले की इथेच ट्रिप बद्दल सांगेन..

सगळ्यांनाच धन्यवाद.. Happy

सर्वांना धन्यवाद..
सगळ्यांचे खास करुन मनस्मिंचे आभार...
इमॅजिका ला गेलो होतो ..
ऑस्स्म ऑस्सम ऑस्स्म जागा...
खुपच मजा आली .. पैसे सार्थकी लागले..
वेळ मिळेल तसा एखदा धागा काढुन फोटो आणि अनुभव लिहेन ..
सगळ्यांना पुन्हा धन्यवाद.. Happy