Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 December, 2013 - 03:24
आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही
सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही
निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही
वेदना हसतात हल्ली खदखदूनी
हासणे ''कैलास''चे गंभीर नाही
--डॉ.कैलास गायकवाड
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
शेवटचे दोन सर्वात विशेष
शेवटचे दोन सर्वात विशेष वाटले.
त्यातही शेवटचा खासच.
आसवांना रोखण्याचा धीर
आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही..........वाह वा वा !
सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही>>>>>>> संदिग्ध वाटतोय हा शेर (वै.म.गै.न.)
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही>>>>>> सुंदर मिसरा
निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही.............क्या बात !!!
सर... मला हा खूप खूप
सर...
मला हा खूप खूप आवडला...
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही
व्वा…सुंदर गझल. मला
व्वा…सुंदर गझल.
मला 'वेडापीर' समजला नाही.
बाकी चारही सुरेखच. 'तीर' आणि 'खंबीर' खूपच आवडले.
शुभेच्छा.
पोहलो आयुष्यभर मग जाणले
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही >>>> क्या बात है .......
सगळे मिलून रडा... अत्यंत
सगळे मिलून रडा...
अत्यंत फाल्तू गझल आहे!
पोहलो आयुष्यभर मग जाणले
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही>>>>> सुरेख!
क्या बात ! व्वा
क्या बात ! व्वा !
तीर,खंबीर,गंभीर ---- खूप आवडले.
आसवांना रोखण्याचा धीर
आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही
डॉक.,
'शूर नाही' म्हटल्यावर 'वीर नाही' हेही म्हणणं आकृतीबंधाच्या पूर्ततेसाठी आल्यासारखं किंचित अनैसर्गिक वाटलं. इथे 'शूर नाही' ह्या 'गालगागा' जागेचा इतर काही उपयोग केला असता, तर आणखी मजा आली असती का? असं वाटलं.
सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही
निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही
हे तिन्ही शेर खूप आवडले ! खासकरून 'तीर'. मी तरी त्याला 'हासिल' म्हणीन.
व्वाह !!
वेदना हसतात हल्ली खदखदूनी
हासणे ''कैलास''चे गंभीर नाही
हा मक्ता पुरेसा स्पष्ट वाटला नाही.
पोहलो आयुष्यभर मग जाणले
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही.... फारच सुरेख!
निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही... सहज सुंदर!
वेदना हसतात हल्ली खदखदूनी... छाने!
चांगली गझल वाचली. आभार!!!
सदिच्छा!
तीर खंबीर आवडले.
तीर खंबीर आवडले.
ग्रेट...
ग्रेट...
सुंदर गझल !
सुंदर गझल !
सगळेच शेर आवडले.
सगळेच शेर आवडले.
______________________________________________
हे अक्षरगण वृत्त असेल तर, दोन-तीन शेरांमध्ये ते पाळल गेलेलं नाही, असे वाटते. पण मात्रा वृत्त असेल तर भारीच.....छान आहे गझल.
वेडापीर बाबत सुप्रियातै
वेडापीर बाबत सुप्रियातै +१
शूरवीर बाबत जितू +१
सर्वाधिक आवडलेले शेर/ओळी बाबत हबा +१
वाटतो मी तेवढा खंबीर नाही<<<<<तरहीसाठी परफेक्ट ओळ !!!
आसवांच्या सागराला तीर नाही <<ही ओळही तितकीच आवडली
एकंदर गझलही आवडली
पोहलो आयुष्यभर मग जाणले
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही
निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही<<< वा, शेर आवडले.
बेफि +१
बेफि +१
पोहलो आयुष्यभर मग जाणले
पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही
निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही
छानच !
शूर-वीर बद्दल रणजितशी सहमत.
रणजित आणि इतरांशीही ....
रणजित आणि इतरांशीही .... १००% सहमत आहे.
मनःपूर्वक आभार मित्र हो.
व्वा…सुंदर गझल.
व्वा…सुंदर गझल.
व्वा…छानच !
व्वा…छानच !
खूपच छान
खूपच छान