''खंबीर''

Submitted by डॉ.कैलास गायकवाड on 14 December, 2013 - 03:24

आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही

सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही

वेदना हसतात हल्ली खदखदूनी
हासणे ''कैलास''चे गंभीर नाही

--डॉ.कैलास गायकवाड

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही..........वाह वा वा !

सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही>>>>>>> संदिग्ध वाटतोय हा शेर (वै.म.गै.न.)

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही>>>>>> सुंदर मिसरा

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही.............क्या बात !!!

सर...

मला हा खूप खूप आवडला...

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही

व्वा…सुंदर गझल.

मला 'वेडापीर' समजला नाही.

बाकी चारही सुरेखच. 'तीर' आणि 'खंबीर' खूपच आवडले.

शुभेच्छा.

क्या बात ! व्वा !

तीर,खंबीर,गंभीर ---- खूप आवडले.

आसवांना रोखण्याचा धीर नाही
एवढा मी शूर नाही ,वीर नाही

डॉक.,
'शूर नाही' म्हटल्यावर 'वीर नाही' हेही म्हणणं आकृतीबंधाच्या पूर्ततेसाठी आल्यासारखं किंचित अनैसर्गिक वाटलं. इथे 'शूर नाही' ह्या 'गालगागा' जागेचा इतर काही उपयोग केला असता, तर आणखी मजा आली असती का? असं वाटलं.

सौख्य नाचू लागते वेड्याप्रमाणे
दु:ख म्हणजे ठार वेडापीर नाही

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही

हे तिन्ही शेर खूप आवडले ! खासकरून 'तीर'. मी तरी त्याला 'हासिल' म्हणीन.
व्वाह !!

वेदना हसतात हल्ली खदखदूनी
हासणे ''कैलास''चे गंभीर नाही

हा मक्ता पुरेसा स्पष्ट वाटला नाही.

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही.... फारच सुरेख!

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही... सहज सुंदर!

वेदना हसतात हल्ली खदखदूनी... छाने!

चांगली गझल वाचली. आभार!!!
सदिच्छा!

सगळेच शेर आवडले.

______________________________________________

हे अक्षरगण वृत्त असेल तर, दोन-तीन शेरांमध्ये ते पाळल गेलेलं नाही, असे वाटते. पण मात्रा वृत्त असेल तर भारीच.....छान आहे गझल.

वेडापीर बाबत सुप्रियातै +१
शूरवीर बाबत जितू +१
सर्वाधिक आवडलेले शेर/ओळी बाबत हबा +१

वाटतो मी तेवढा खंबीर नाही<<<<<तरहीसाठी परफेक्ट ओळ !!! Happy
आसवांच्या सागराला तीर नाही <<ही ओळही तितकीच आवडली
एकंदर गझलही आवडली

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही<<< वा, शेर आवडले.

बेफि +१

पोहलो आयुष्यभर मग जाणले मी
आसवांच्या सागराला तीर नाही

निसटला अश्रू तसा समजून गेलो
वाटतो मी तेवढा खंबीर नाही

छानच !
शूर-वीर बद्दल रणजितशी सहमत.