परिपूर्ण

Submitted by अज्ञात on 4 December, 2013 - 01:38

वळे न माथा दिशा एकली मूक चालणे आता
स्पंदने हरवली आकाशी पार्थिव उरली गाथा
काहुर ब्रह्मानंदी विरले कवेत तुझिया नाथा
भोगुन झाले प्राक्तन आत्मा म्हणे जाहलो जेता

मी-माझेपण, रिक्त-रितेपण व्यथाच नाही दाता
निराकार आकार तुझे परिपूर्ण जाहली गीता

………………… अज्ञात

Group content visibility: 
Public - accessible to all site users

उल्हासजी, मनःपूर्वक आभार. Happy

वैवकु, "स्पं"दने हरव"ली" आकाशी ... यात "स्पं" आणि "ली"वर आघात करून म्हणून पहा. जमेल असं वाटतं.. Happy

ळे न माथा दिशा एकली मूक चालणे ता
स्पंदने हरवली आकाशी पार्थिव उरली गाथा
काहुर ब्रह्मानंदी विरले वेत तुझिया नाथा
भोगुन झाले प्राक्तन आत्मा म्हणे जाहलो जेता

मी-माझेपण, रिक्त-रितेपण व्यथाच नाही दाता
निराकार आकार तुझे परिपूर्ण जाहली गीता

वाचताना बोल्ड केलेल्या अक्षरांवर आघात करून म्हटल्यास लय सापडावी....