दुसर्‍या लग्नानंतर अपत्याचे नवीन नाव लावण्याबद्दल कायदेशीर सल्ला हवा आहे.

Submitted by इदं न मम on 3 December, 2013 - 06:12

लोकहो,
माझ्या एका मैत्रीण तिच्या नवर्‍यापासुन गेली ४ वर्ष विभक्त रहाते. कायदेशीररीत्या घटस्फोट झालेला आहे. तिला एक १२-१३ वर्षाचा मुलगा आहे. ती आता दुसर लग्न करतेय. हा नवरा तिच्या मुलाला सांभाळायला तयार आहे. त्याच नावही मुलाला द्यायला त्याची हरकत नाही. माझा प्रश्न हा आहे, की हे अस नाव लावण्यासाठी काय कायदेशीर प्रोसीजर आहे? दत्तकविधान करावे लागते का?सरकारी गॅझेटमधे द्याव लागेल का?
माझ्या ओळखीतल्या एका व्यक्तीची या बाबतीतली गोष्ट सांगते.
त्यांची मोठी बहीण वारली. तिचा मुलगा या व्यक्तीने दत्तक घेतला. त्याला आपलं नाव दिल. पण अजुनही जेव्हा परदेशात जावे लागते तेव्हा त्यांना त्या मुलाच्या मुळ वडीलांची लेखी परमिशन घेउन ते पेपर्स व्हिजासाठी दाखवावे लागतात. पासपोर्ट वर त्याच्या मुळ वडीलांचच नाव आहे. अशी काही अडचण येते का?

दुसरा महत्वाचा प्रश्न असा की ही मैत्रीण बॅकवर्ड कॅटेगरीतली आहे. तीला मुलाच्या जातीच प्रमाणपत्र मिळवण्यात देखील अडचणी आहेत. तिच्या पहिल्या नवर्‍याचं/ त्याच्या नातेवाईकांच असं काहीच प्रमाणपत्र नाही. जातीच्या दाखल्यासाठी आख्ख्या खानदानाची प्रमाणपत्र लागतात. आता जर हा (नविन) नवरा त्याच नाव लावायला तयार असेल (तो ही त्यांच्याच जातीचा आहे) तर त्याच्या प्रमाणपत्रांचा या कामासाठी उपयोग होईल का?
माबोवरील कायदेतज्ञांनी कृपया मदत करावी.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो दत्तक विधान करावे लागेल हे तर नक्कीच.
माझ्या एका मैत्रिणीच्या मोठ्या बहिणीला ही दुसरं लग्न करताना आधी तिच्या मुलाचं दत्तक विधान करावं लागलं, मग लग्न.

मुलगा जरी आईकडे रहात असला तरी कायद्याने वडीलांनी हक्क सोडला नसेल तर दत्तक विधान करण्यासाठी मुलाच्या वडिलांची परवानगी लागेल ना?

अस नाव लावण्यासाठी काय कायदेशीर प्रोसीजर आहे? दत्तक विधान करण्यासाठी मुलाच्या वडिलांची परवानगी लागेल ना?>>> १००%.
पहिल्या नवर्‍याच्या ऑफीसमधील सर्वीसरेकॉर्ड्वर जात नोंदवली असल्यास त्याची attested झेरॉक्स जातीच्या प्रमाणपत्रासाठी घेऊ शकता.
आहे, की हे अस नाव लावण्यासाठी काय कायदेशीर प्रोसीजर आहे? >>> वकीलाची मदत घ्या.ढोबळमानाने सांगायचे झाल्यास १.पहिल्या वडिलांची बाँड्पेपरवर लेखी संमती घेऊन नोटरी करणे
२. दत्तकविधान करून रजिस्टर्ड करणे.
३.गॅजेट्मधे नवीन नावाच्या नोंदीकरिता अर्ज करणे.

दत्तक विधानाची अजिबात जरुरी नाही. सरकारी गझेट मध्ये मात्र नवीन नाव लावावे जेह्वा बाईचे दुसरे लग्न होईल तेव्हा. ती स्वताचे नाव बदलेल त्याच वेळी मुलाचे नाव बदलून घ्यावे. त्यामुळे मुलगा जेव्हा दहावी होईल तेव्हा बोर्डाच्या मार्क शिट वर आपोआप नवीन नाव येईल आणि पुढे त्याला कुठलाच त्रास होणार नाही Happy

<<पासपोर्ट वर त्याच्या मुळ वडीलांचच नाव आहे. अशी काही अडचण येते का?>> का बर? जेह्वा त्यांनी मुलाला दत्तक घेतला तेव्हा त्याचे नाव बदलले नाही का ? त्याला स्वताचे नाव दिले नाही का ? मग दत्तक घेण्याचा काय उपयोग?

अशा केसमध्ये दत्तकविधान केलेले पाहिले आहे. एखाद्या स्त्रीशी लग्न करणारा पुरुष तिच्या प्रथम लग्नाच्या मुलाचा पिता होतो असे नाही.

<<जेह्वा त्यांनी मुलाला दत्तक घेतला तेव्हा त्याचे नाव बदलले नाही का ?<<
बदलले. त्याला स्वतःचे नाव दिले आहे. निदान कॉलेजच्या कागदोपत्री तरी या नविन वडीलांचेच नाव आहे. पण पासपोर्टवर मुळ वडीलांचे नाव आहे, कदाचीत तसा पासपोर्ट मिळण्यात अडचणी आल्या असतील. आणी प्रत्येक वेळेस परदेशी जातांना त्या मुलाच्या मुळ वडीलांची त्यांना परवानगी घ्यावी लागते.

<<पहिल्या वडिलांची बाँड्पेपरवर लेखी संमती घेऊन नोटरी करणे<<
हिच्याबाबतीत, हिच्या पहिल्या नवर्‍याने मुलावरचा हक्क कधीच सोडला आहे. तसं घटस्फोटाच्या पेपर्समधे नमुद केलय. की 'तिचा किंवा तिच्या मुलाचा या (पहिल्या) नवर्‍याच्या इस्टेटीवर नंतरही काहीही हक्क रहाणार नाही'.
एवढ ठळकपणे पेपर्समधे लिहिलेल असल तरी दत्तकविधान करताना तिच्या पहिल्या नवर्‍याची परवानगी घ्यावी लागेल?

आमच्या नात्यामध्ये अशा केसमध्ये दतकविधान झाल्याचे आठवतंय.(अंदाजे २० वर्षांपूर्वी) आणि त्यावेळी मुलाच्या वडिलांची (स्त्रीच्या पहिल्या नवर्‍याची) संमती वैगरे घ्यावी लागली नव्हती. पासपोर्ट पण मुलाच्या नविन नावानेच आहे.

वाचते आहे.
चांगला वकील गाठावाच लागेल.
भरत तुमचे म्हणणे पटते आहे.
कलम ९(२) चा मुद्दा योग्यच आहे.
आणि एक म्हणजे वयाचा मुद्दा-
हे वाचा
Hindu Adoptions and Maintenance Act, 1956

10. Persons who may be adopted

No person shall be capable of being taken in adoption unless the following conditions are fulfilled, namely,-

(i) he or she is Hindu;

(ii) he or she has not already been adopted;

(iii) he or she has not been married, unless there is a custom or usage applicable to the parties which permits persons who are married being taken in adoption;

(iv) he or she has not completed the age of fifteen years, unless there is a custom or usage applicable to the parties which permits persons who have completed the age of fifteen years being taken in adoption.
त्या मुलाचे वय नक्की १५ च्या आत आहे ना त्याची खात्री करा. काही वकील मित्र्-मैत्रीणींशी बोलते आहे.
लिहिते परत, एका conclusion ला येण्याची वाट पाहाते आहे

<<'तिचा किंवा तिच्या मुलाचा या (पहिल्या) नवर्‍याच्या इस्टेटीवर नंतरही काहीही हक्क रहाणार नाही'. >> हे चूक आहे. घटस्फोट नवरा बायकोने घेतला आहे. मुलाने इस्टेटीवर अधिकार सांगायचा नाही हे आईने का ठरवायचं? आणि बापाने तरी असं का लिहून मागायचं. जन्म देताना नव्हती का अक्कल? मुलाचा हक्क मुलाला हवा असेल तर मिळालाच पाहिजे. मूल काय त्यांना सांगायला गेलं होतं का मला जन्माला घाला? असं कसं हे लोक वागू शकतात?

मूल दत्तक गेले तर त्याचा त्याच्या बायोलॉगिकल वडिलांच्या प्रॉपर्टीवरचा हक्क संपतो का? आईने दुसरे लग्न केले म्हणजे मुलाने नव्या वडिलांना दत्तक गेलेच पाहिजे का? मुलाची इच्छा नसेल तर. मुलाच्या लहानपनी ते दत्तक गेलं तर त्याला मोठेपणी हे दत्तक विधान नाकारता येतं का?

लहान मूल ही सुद्धा एक जिवंत व्यक्ती आहे. मोठ्यांपेक्षा समज कमी असेल त्यांची पण म्हणून त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांनी दुसर्‍या वडिलांना स्वीकारावं किंवा त्यांचं नाव स्वीकारावं हे का? त्यांनी पहिल्या वडिलांच्या प्रॉपर्टीमधला हिस्सा का सोडून द्यायचा? आपण इथे मुलांना वस्तू सारखं वागवत नाही का?

वल्लरी, तुझे म्हणणे खरे असेलही कदाचित.
पण ही केस वेगळी आहे... त्याचे संदर्भ वेगळे आहेत, आणि कायद्याची चौकट ही वेगळी आहे.
आपण कधी भेटलो तर कायदा कसा वळतो... वळावितात इ. सुरस आणि चमत्कारिक कहाण्या सांगेन....

'तिचा किंवा तिच्या मुलाचा या (पहिल्या) नवर्‍याच्या इस्टेटीवर नंतरही काहीही हक्क रहाणार नाही'. >> हे चूक आहे. >> तात्त्विक दृष्ट्या चूक वाटल तरी व्यवहारिक दृष्ट्या ह्यात काहीही चूक नाही. मूळ वडिलांना पण पुढे आयुष्य घालवायचे असते. आर्थिक सुरक्षितता नसेल तर एखादी स्त्री पुन्हा त्यांच्याशी लग्न करायला तयार होणे कठीण, झाली तरी पुन्हा पुन्हा मागचेच आर्थिक गुंते सोडवत राहणे हे शक्य नसते. वेगळे होताना दोन्ही पालकांनी सामंजस्याने मुलाचे आर्थिक भविष्य (गरज+ तरतूद + पिढीजात वाटा) हे विचारात घेणे जरुरीचे पण त्यापायी आपले आयुष्य ओलीस ठेवणे हे पालकांवर अन्याय आहे.

मुले जन्माला घालताना खरेच बरेच वेळा अक्कल नसते. पण त्याची शिक्षा पालकांनी कुठेपर्यंत, किती किती प्रकारे भोगावी?

'नाव लावणे' या संज्ञेचा अर्थ काय अपेक्षित आहे? फक्त नाव बदलायचे असेल तर ते काम खूप सोपे आहे. अ‍ॅफिडेव्हिट करायचे. वर्तमानपत्रात जाहिरात द्यायची. त्याची सरकारी मुद्रणालयातून अर्ज आणायचा आणि जुने नाव व नवीन नाव भरून तो दाखल करायचा. महिन्याभरात गॅझेट मिळते, त्या दिवसापासून नवे नाव लागू होते.

पण सर्व हक्क बदलायचे असतील तर मात्र दत्तक घेतलेच पाहिजे. त्याशिवाय जन्मदाते आईवडिल कसे बदलू शकतील?