अश्वत्थामा....

Submitted by sherloc on 5 December, 2013 - 03:53

श्री. अतुल ठाकूर यांनी आजच प्रकाशित केलेल्या "अश्वत्थामा.." http://www.maayboli.com/node/46663
या विषयावरील लेख वाचून मला माझ्या काही दिवसांपुर्वी सुचलेल्या ओळी आठवल्या -
********************************************

तसा आपल्या प्रत्येकातच एक अश्वत्थामा असतो
भळभळती जख़म घेऊन भणंग भटकताना कधीमधी दिसतो

अंधारामध्ये निरपराधांवर वार काय त्याने एकट्यानेच केलेत
अज्ञानाच्या अंधारातले असे कित्येक निरपराध आपणही चिरडलेत

तरीही प्रत्येक नव्या जख़मेनंतर
छातीवर हात ठेऊन दु:खाचं दळण आपण किती वेळा दळलं
मन जे म्हणतात ते छातीत नाही, डोक्यात असतं
हे फक्त कृष्णाला कळलं

- शैलेंद्र साठे

Group content visibility: 
Public - accessible to all site users