Submitted by बागेश्री on 2 December, 2013 - 07:07
तुज आठवते का काही
मन गंध फूल झालेले
अन् उनाड माळावरती
प्रतिबिंब कुणाचे ओले?
तुज आठवते का काही....
कधि शब्द शब्द गाताना
मज सरगम उमगत जाते
मी तुझ्यात हरवत जातो,
डोळ्यांचे गाणे होते...
तुज आठवते का काही...
मी सुन्न सुन्न असताना
तव भास अनाहुत जगतो,
हे तुलाच सांगत जाता
हलके हलके मोहरतो
तुज आठवते का काही...
ही साद नसे बोलांची
हाती घे हात अता तू
मी जगून घेतो आहे
पापण्यात जे जपलेले
तुज आठवते का काही...
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
मस्त! मी सुन्न सुन्न
मस्त!
मी सुन्न सुन्न असताना
तव भास अनाहुत जगतो,
हे तुलाच सांगत जाता
हलके हलके मोहरतो
तुज आठवते का काही...>>>हलकेच पुन्हा मोहरतो - असं वाचून बघीतलं आणि ते मला जास्त चपखल वाटलं
व्वा ! छान लयीतली छान कविता
व्वा ! छान लयीतली छान कविता ..... मस्त वाटलं वाचताना.
मस्त!!!!!!!!!!!!! बागे हे ऐकव
मस्त!!!!!!!!!!!!!
बागे हे ऐकव मला तुझ्या आवाजात
वेटींग
तुज आठवते का काही....>>
तुज आठवते का काही....>>
आवडली.
कधि शब्द शब्द गाताना मज सरगम
कधि शब्द शब्द गाताना
मज सरगम उमगत जाते
मी तुझ्यात हरवत जातो,
डोळ्यांचे गाणे होते...>>>>
सुरेख!!
छान लयीतली कविता!
मस्तच कविता बागेश्री .
मस्तच कविता बागेश्री .
डोळ्यांचे गाणे ह्या कडव्यात
डोळ्यांचे गाणे ह्या कडव्यात डोळेच का हा प्रश्न पडला शब्दांचे का नाही ?
मी सुन्न खिन्न असताना ...अशी वाचली ओळ ..भास जगतो ऐवजी भास हसतो म्हणता आले असते का ?..हलकेच् पुन्हा मोहरतो बद्दल कविन +१
तुज आठवते का काही हा भाग प्रत्येक कडव्यानंतर चपखल पणे बसत नसल्याने दिला नसता तर अधिक सहजपणे पुढे पुढे सरकत जात असलेली दिसली असती कविता
शेवटचे कडवे अपने आपमे विस्कळीत वाटत आहे त्यामुळे कवितेला समर्पक समारोप मिळत नाही आहे असे वाटले
असो ...
जितूची बहुधा एक कवितेची ओळ होती ..'तुज आठवते का ताई'...अशी काहीशी ती आठवली
अर्थात कविता आवडली आहे म्हणून हिचा इतका विचार करतोय हे वेगळे सांगणे न लगे ना बागेश्री ?
मस्त कविता..
मस्त कविता..
मला पण ऐकायची आहे ही......
मला पण ऐकायची आहे ही...... रिया आणि मला एकत्र 'कॉन कॉल' वगैरे करून ऐकवलीस तरी चालेल.....
लै भारी आहे कविता !!
तुज आठवते का काही मन गंध फूल
तुज आठवते का काही
मन गंध फूल झालेले
अन् उनाड माळावरती
प्रतिबिंब कुणाचे ओले?
तुज आठवते का काही.... मस्त ...............
वा, खूपच सुंदर कविता .....
वा, खूपच सुंदर कविता ..... किती लयबद्ध ...
सुंदर !
सुंदर !
डोळ्यांचे गाणे ह्या कडव्यात
डोळ्यांचे गाणे ह्या कडव्यात डोळेच का हा प्रश्न पडला शब्दांचे का नाही ?
>>
आखें भी होती है दिलकी जुबाँन
भास जगतो ऐवजी भास हसतो म्हणता आले असते का
>>
बहुदा नाही वैवकु, त्याने अर्थ बदलतोय..
इथे 'भास' जगत नाहीये... 'तो' तिचा भास जगतोय...
मला नीटसं सांगता येत नाहीये
पण तीने जे लिहिलय ते पोहचलय. तुमचं जरासं वेगळं आहे!
चाल लावायचा किरकोळ प्रयत्न
चाल लावायचा किरकोळ प्रयत्न केलाय.
ऑफिसमध्ये, मोबाईलवर केलेले रेकॉर्डिंग आहे. जरा आवाज कमी व डिस्टर्बन्स असण्याचीही शक्यता आहे. तसेच स्वरसाथही नाहीये त्यामुळे फिकं वाटेल.... तरी देतोय.......
https://soundcloud.com/rasap/tuj-aathavte-ka-kahi
ईमेल मध्ये, वॉट्स अप वर शेअर
ईमेल मध्ये, वॉट्स अप वर शेअर करण्यात यावं ही धमकी वजा विनंती
बागे रिया ला अनुमोदन ग .खरच
बागे रिया ला अनुमोदन ग .खरच तुझ्या आवाजात ऐकायचीय हि कविता!
ऐकवशील का?
हे बघ रिया मी जे म्हटले ते
हे बघ रिया मी जे म्हटले ते तुला समजेल अश्या पद्धतीने तुला समजावून सांगणे हे माझ्या समजावून सांगण्याच्या क्षमतेच्या अगदीच पलिकडचे काम आहे हे मी जाणतो त्यामुळे समजावून सांगू शकत नाहीये त्याबद्दल क्षमस्व पण तुला जे समजले आहे ते मलाही समजलेच आहे तरीही मी भाष्य केले ते का केले हे मला पूर्णपणे समजते इतकेच तूर्तास तू समजून घे
बाकीचे तुला समजेल तेव्हा समजेल
धन्यवाद
रणजीत, त्या स्पेशल इफेक्टसाठी
रणजीत,
त्या स्पेशल इफेक्टसाठी धन्यवाद.. छान चाल आहे, आवाजही.
रिया, थंड, रणजीत..
नक्कीच माझ्या आवाजात ऐकवते.
वैवकु
खरं सांगू तर, डोळ्यांचे गाणे, भास जगणे, हलके मोहरणे हे सारं एका तरलतेतून आलंय.. त्याला भेदून, ' ते तसं का' इत्यादी चिरफाड खरंचच करावी वाटत नाही आहे.. होप यू डोन्ट माईंड
सर्व वाचक दोस्तांची आभारी आहे
मस्त कविता! या तुमच्या
मस्त कविता!
या तुमच्या कवितेवरून मला - ' तुला ते आठवेल का सारे. दवात भिजल्या जुई परि हे, मन हळवे झाले....' हे गीत आठवलं.
मी सुन्न सुन्न असताना तव भास
मी सुन्न सुन्न असताना
तव भास अनाहुत जगतो................ व्वा!