मातीमोल

Submitted by मी_आर्या on 2 December, 2013 - 04:37

हिवाळ्यातला पाऊस
ढगांची दाटी
पळतोय चंद्र

कुंद हवा
सुटले आभाळ
पावसाची चुकार सर

झुलणारी फांदी
त्यावर एकच थेंबुटला
ओघळतांना वाचला

स्वतःचेच प्रतिबिंब
निरखतेय त्यात
खोलखोल आरपार

तुझ्या माझ्या आयुष्यात
अधांतरी लटकणं
एवढच नशिबात?

कुणी झेललं
ओंजळीत तर ठीक
नाहीतर मातीमोलच!!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

बाप रे! आर्ये जबरदस्त आहे कविता.
वाचायला सुरू केली तेव्हा बडबडगीत वाचतोय असं वाटलं.
एन्ड् एकदम जोरदार Happy

आधी दक्षी आता आर्या...........

गप्प्याचे दुकान बंद करणार वाटते

वा!!

तुझ्या माझ्या आयुष्यात
अधांतरी लटकणं
एवढच नशिबात?

कुणी झेललं
ओंजळीत तर ठीक
नाहीतर मातीमोलच!!
>>
हेच आवडलं खुपच!

आवडली कविता.

मात्र या गंभीर कवितेत "थेंबुटला" हा बालकवितेतला शब्द खटकतो आहे. त्या ऐवजी "एवलुसा थेंब" किंवा फक्त "थेंब" हे योग्य वाटले असते असे आमचे मत आहे.

हॉय्लॉ, मस्तच आर्यातै Happy
तुझ्या माझ्या आयुष्यात
अधांतरी लटकणं
एवढच नशिबात?

कुणी झेललं
ओंजळीत तर ठीक
नाहीतर मातीमोलच!!>>> हे मस्तच जमलय! (खरं वाटणारं आहे अगदी)

गप्पिष्ठ, थेंबुटला हा बालकवितेतला शब्द आपलं बालमन जागृत असेल तर वापरु शकतोच की आपण Wink (तिने तिच्याच बालमनातला शब्द वापरलाय.... Happy हो ना आर्यातै????)

धन्यवाद सर्वांना! Happy

आदे, मला मान्य आहे अग्दी साधीशीच कविता आहे, ही. परवा रात्री पाऊस पडला तेव्हा मनात आलेली स्पंदनं मांडली.
थेंबुटला हा शब्द मागे कुणाच्या तरी कवितेत वाचला तेव्हा इतका आवडला की बस्स! त्याला चपखल बसेल अशी कविता करावी असं तेव्हाच मनात आलं होतं. Happy

व्वा! आर्यादेवी, आपण हेही क्षेत्र पादाक्रांत केलेत. अभिनंदन! Happy
तुझ्या माझ्या आयुष्यात
अधांतरी लटकणं
एवढच नशिबात?

कुणी झेललं
ओंजळीत तर ठीक
नाहीतर मातीमोलच!!>>>>>>>>>>>>>>अप्रतिम. Happy