ग्राहकांची फसवणूक .. कशी टाळू शकता ?

Submitted by अभि१ on 27 November, 2013 - 10:12

मला आलेले काही अनुभव आणि त्यावरचे मला सुचलेले उपाय . तुमचे मत आणि असेच काही अनुभव तुम्हाला आले आहेत का ?

१. रद्दी . आपल्याला वाटते कि रद्दीवाले हे गरीब बिचारे लोक. त्यांनी मारले थोडे पैसे तर मारू दे. १०/२० रुपयांनी काय नुकसान होते आपले ? मुळात रद्दीचा भाव - १० रु / किलो . जेव्हा ते हा भाव आपल्याला देतात तेव्हा त्यना नक्कीच १२ ते १३ रु / किलो कमीत कमी मिळत असणार. कदाचित १५ रु पण.
हे लोक वजनात भरपूर मारतात. जेव्हा २८ किलो रद्दी असते तेव्हा यांचे वजन १९/२० किलो भरते. म्हणजे ९ किलो चे पैसे यांनी खाल्ले . ११० रु. एका ग्राहक कडे. मी ३० % tax bracket मध्ये येतो. मला काही फरक पडत नाही. पण किती तरी लोक ज्यांना यामुळे फरक पडत असेल, पण माहित पण नसेल कि आपली अशी फसवणूक होते. आपल्याला वाटते कि हे गरीब भय्ये आहेत . जाऊ दे. काय फरक पडतो. पण तसे नाही. हे लोक अशी फसवणूक करून भरपूर पैसा कमावतात. शेजारी शेजारी मधला तो भंगार वाला बिरजू पाठक म्हणतो कि - बहुत पैसा हमरे पास . नक्कीच खरे आहे ते.
यावर उपाय - घरी वजनाचा काटा आणणे. मेडिकल च्या दुकानात मिळतो हजार रु ला. तो वापरायचा. भय्या ला सांगायचे कि रद्दीचे वजन इथे घरी कर आणि पैसे दे
नाहीतरी मेडिकलची बिले लागतातच द्यायला office मध्ये Happy
हे का ? मी एकदा बँक मध्ये गेलो होतो. माझ्या पुढचा माणूस ( अंदाजे वय ४० , मध्यम वर्गीय दिसणारा ) खात्यात ५०० रु भारत होता. मला खरेच आश्चर्य वाटले कि ५०० रु हि काय भरायची रक्कम आहे का ? जर त्या माणसाला ५०० रु ने फरक पडतो तर वर्षनुवर्ष रद्दी मध्ये त्याची कितीने फसवणूक होतेय ती टाळली तर. मी हे माझा मोठेपणा सांगायला लिहित नाही तर , हि टीप जर का सर्व लोक पर्यंत पोचली तर हि फसणूक थांबेल म्हणून.
२. गोदरेज चा e swipe locker घेतला. दुकान दाराने तो त्याच्याकडच्या स्टील च्या कपाटात बसवून दिला. आणि loker कसा वापरायच याची जुजबी माहिती दिली. मी म्हटले कि घरी आले कपाट कि बघू. manual वाचून वापर करू. कपाट घरी आल्यावर बघतो तर locker चा master कोड , जो manual मध्ये दिलाय तो चालत नाही. दुकानदाराकडे तक्रार केली तर तो म्हणाला कि डीलर कडून लोकेर आणला आहे, त्याच्याकडे तक्रार करा. डीलर कडे फोन केला तर तो म्हणतो कि कोड reset करावा लागेल, ५०० रु पडतील. मी - नवीन locker, मी का paise भरू. गोदरेज चे कामच आहे हे. तो - मग आम्ही काही करणार नाही. गोदरेज कडे तक्रार नोंदवा. गोदरेज कडे बरीच फोनाफोनी , त्यांचा माणूस ४ वेळा घरी. शेवटी एकदाचा कोड reset करून मिळाला.
मुद्दा - गोदरेज चा लोकल डीलर , mastar कोड आधीच बदलून ठेवतो. नवीन ग्राहकाचा फोन आला कि त्याचा PCB घेऊन ज्यायाचा. कोड reset करायचा. प्रोब्लेम solve . ५०० रु काढले ग्राहक कडून. गोदरेज कडे बरीच तक्रार केली डीलर विरुद्ध . पण काहीही action नाही.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुणी माहिती विचारली तर द्यावी म्हणून गायीचं तूप कसं करावं ते सांगितलं होतं. पण अनुभव इतके विचित्र आले कि इथं मौन.

गायीचे दुध कसे काढावे ते सांगितले नाहीत ना म्हणून Happy
बाकी तुमचा राग समजू शकतो. पोटावर पाय आला कि माणूस खवळून कसा उठतो याचे मूर्तिमंत उदा इथे दिसतेय. बाकी तुम्ही रद्दी वाले कि गोदरेज चे डीलर ?

मुळात भारतात गिर्‍हाइकाचे समाधान करावे अशी काही आवश्यकताच नसते. समजा भडकले कुणि, तर काय करतील, कुठे जातील? सगळीकडे तेच.

बरे तुम्ही नाही घेतले गोदरेज चे सामान, तर त्यांचे काय जाते? दुसरा कुणितरी घेईलच. पुरवठा कमी, मागणी जास्त. जास्त म्हणजे अफाट, अतिशय अफाट! किती लोकं ती भारतात! दहा नाही आले तर वीस आणखी येतील!

त्यातून ५०० रु. ही अगदी कमी रक्कम आहे तर तुम्ही त्या डीलरला देऊन टाका! एकूण किंमत आधी भरले अधिक ५०० असे समजा. कित्येक लोकांजवळ तर इतके पैसे असतात की कुठे खर्च करू?

आता रद्दी!!. अहो तुम्हाला तरी रद्दी विकून पैसे करण्या इतकी का परिस्थिती आली आहे? आमच्याकडे रद्दीला पैसे देणे तर सोडाच, ती नीट बांधून रिसायकल करायला लागते, जेव्हढे मिळतात तेव्हढा खरे तर निव्वळ नफा! तो सुद्धा करमाफ!

१. नाहीतरी मेडिकलची बिले लागतातच द्यायला office मध्ये
२. मी म्हटले कि घरी आले कपाट कि बघू. manual वाचून वापर करू.

*
अभि१,
राग मानू नका. पण, या दोन वाक्यांबद्दल तुमचे विवेचन ऐकायला आवडेल.

माझे अनुभव्/विवेचन पुढीलप्रमाणे:

मेडीकलची बिले. ऑफिसमधला मेडिकल बिलवाला कारकून. सरकारी ऑफिस नसेल तर इन्शूरन्स कंपनीतला कारकून, इत्यादींबद्दल मजकडे भरपूर ज्ञान आहे. (खोटीनाटी बिले टाकणे हा भारतियांचा मूलभूत स्वभाव आहे. त्याने (रद्दीवाला) गंडवले म्हणून ओरडण्यात अर्थ नाही. आपली सगळ्यांचीच मेंट्यालिटी तीच आहे. तो मला गंडवतो, मी तराजू आणून ऑफिसला मेडिकल बिल देऊन गंडवतो. घोषणा: हम सबऽ.. चोर है!)

दुसर्‍या बाबतीत आपला भोळेपणा नडला. वस्तू हातात घेताना अधिक चौकसबुद्धी दाखवावी. अतीशय निर्लज्जपणे १०० प्रश्न विचारावे. माझ्या दुकानात सिंधी/मारवाडी गिर्‍हाईक आले, तर पूर्ण पैसे वसूल होईपर्यंत कटकट करतात. अन वरतून थोडी जास्त, असा अनुभव आहे. बाजारात दुकानदार तुमच्या गळ्यात माल खपवायला बसलाय. "बोलणार्‍याचे खडे विकले जातात. न बोलणार्‍याचा गहू पडून रहातो" अश्या म्हणी पाठ असतात, त्यांचा अर्थ समजलेला नसतो Wink गोद्रेजवाले तुमच्या तक्रारीस हिंग लावून विचारणार नाहीत, कारण तो डीलर त्यांची १०० उत्पादने दर महा विकतो. तुम्ही काय देता गोदरेजला? इथे कुणाला रेप्युटेशनची पडलिये? तुम्हीदेखिल शिव्या डीलरलाच देताहात. गोदरेजला नाही Wink

असो.
(रच्याकने: अर्धवटरावांना बोलक्या लोकांचा भलताच लळा. जितक्या बाता जास्त, तितके हे जास्त प्रेमात.)

*
अवांतर सल्ला:
'आपल्याला कसे गंडवले याचे किस्से इथे टाकावे' असा धागा काढलात तर जोरात धावेल..

असा एक धागा मामी/अश्विनीमामी/निंबुडा कुणी तरी काढला होता ना?