बाळू शिंत्रेला अनमोल रत्न पुरस्कार द्या - भाग २

Submitted by जुनाच कुणीतरी on 19 November, 2013 - 21:48

कॉलेजात बाळूने कितीही डाउन फ्लोअरला (लो प्रोफाईल) राहण्याचा प्रयत्न केला तरीही रत्न झळाळून उठायचे ते थांबते का ? बारावीच्या परीक्षेआदी त्याने सहजच एका विद्यार्थ्याला दिलेल्या टीपा इतक्या प्रभावी ठरल्या कि ते पोरगं बोर्डात आलं. बाळूने जरी आर्ट्स साईड घेतली होतॉ तरी त्याच्याकडे सर्व शाखांमधल्या स्टुडंटसची लाईन लागू लागली.

सायन्सच्या एका मुलाला त्याने केलेल्या मार्गदर्शनामुळे तो मुलगा आता नॅनो टेक्नॉलॉजीत संशोधन करत आहे. त्याला अमेरिकेच्या एका विद्यापीठात (कुठलं ते माहीत नाही ) सन्मानाने बोलवण्यात आले. एका फीमेल स्टुडण्टला तर सुपरकंडक्टर्समधे बाळूमुळे रीसरच करता आला. यावरून बाळूकडे सायन्स, आर्ट, कॉमर्स असा भेद नव्हता तसच स्त्री पुरूष असाही भेद नव्हता हे आपल्या लक्षात आले. ज्ञानाच्या क्षेत्रात भेदाभेद कशाला ? देवकण शोधतांना देवाचे अभंग गुणगुणता आले पाहीजेत असं बाळू शिंत्रे म्हणायचा.

अशी बातमी आहे कि कॉलेजचे प्रोफेसर्सही बाळूला गुपचूप भेटत असत आणि मी इथं आलो होतो हे कुणाला सांगू नकोस अशी विनंती करत. मॅथ्सच्या सरांना त्यांनी शोधून काढलेल्या नव्या गणितीय प्रमेयाबद्दल नो-बेल पुरस्कार मिळाला. खरं तर हे प्रमेय त्यांना बाळूने शिकवल्याची चर्चा होती. मॅथ्सच्या सरांना रात्रीच्या अंधारात बाळुकडून येताना खुद्द प्राचार्यांनी पाहीले होते. पण प्राचार्यांचे बाळुकडे काय काम निघाले हा प्रश्न उपस्थित होत असल्याने तेरी भी चुप , मेरी भी चुप या न्यायाने कुणीच काही बोललं नाही. पुढे कॉलेजात केलेल्या शैक्षणिक सुधारणा आणि नवं शैक्षणिक मॉडेल बनवल्याबद्दल प्राचार्यांना राष्ट्रपती पदक मिळाले. बाळू मात्र कधीच काही बोलत नसे.

त्याने स्वतःच सायन्सला अ‍ॅडमिशन का घेऊ नये असा प्रश्न अनेक जणांना पडायचा. पण बाळूचे विचार पक्के आणि ठाम होते. अनेक होतकरू विद्यार्थी पडलेले असताना आपण का त्यांची वाट अडवा असं त्याला वाटे. या मुलांना फक्त योग्य दिशा दाखवण्याची गरज आहे असं त्याचं म्हणणं होतं.

बाळुकडे फक्त मुलंच येत हे काही खरं नाही. मुलीही तितक्याच, खरं तर जास्त संख्येने येत. यातल्या काही मुली त्याच्या फॅन्स असण्याची शक्यता जास्त होती. इतर कॉलेजच्या आणि शहरातल्या मुलीही त्याच्याकडे येत. एका कन्येला त्याने मेक अप विषयी काही टीपा दिल्या होत्या. पुढे ती विश्वसुंदरी बनली आणि बॉलीवूडात व हॉलीवूडात आघाडीची अभिनेत्री बनली. बॉलीवूडाचा उघडाबंब सुपरस्टार तिचा दिवाना झाला तर अनेक होतक्रू नायकही तिचे पंखे झाले. पुढे बॉलीवूडाच्या ज्येष्ठ सुप्रस्टारच्या मुलाने तिच्याशी लग्न केलं. यशाच्या धुंदीत जरी ती बाळु शिंत्रेला विसरली तरी लवकरच बाळूची तिला आठवण झाली. लग्नाच्ञा आधी काही समस्या निर्माण झाल्या तेव्हां ज्येष्ठ सुप्रस्टार व प्रश्नकर्ते यांनी तिला एकच प्रश्न विचारला कि " अगला प्रश्न है , शादी की लॉटरी के लिये, एक सही जवाब आपको बना सकता है हमारे खानदान की बहू ! "
त्यांनी अशी सुरुवार करून तिच्या करीयरच्या प्रेरणास्थानाबद्दल विचारलं. तेव्हां सांगू का नको या विचारात असतानाच खरं बोलावं असा निर्णय करून तिने बाळु शिंत्रेचं नाव सांगितलं तेव्हां सुप्रस्टारने तिला प्रेमभराने मिठी मारली आणि उपस्थितांना माहिती पुरवली कि बाळुजी के पिताजी दिगू शिंत्रे मरे गुरू रह चुके है ! अशा पद्धतीने शिंत्रे कनेक्शन लक्षात आल्यावर नटी वरमली. पण लग्न झाल्यावर ती पुन्हा बाळुला विसरली ती आजतागायत.

दुनियेचा हा दस्तुरच आहे. बोलेल त्याचे लोखंडाचे चणेही विकले जातात आणि न बोलेल त्याचे सोनेही विकले जात नाही. बाळु अर्थातच काही विकायला बसला नव्हता. अगदी लहान असताना कृष्णाच्या वेषात फिरणा-या एका अनवाणी आजोबांना त्याने तुम्ही रथातून का फिरत नाही असा सूचक प्रश्न विचारला होता. तेव्हां त्या आजोबांबरोबर असलेल्या साधूंनी ये बालक साधारण नही है, इसकी बात मानलो असा सल्ला आजोबांना दिला होता. पुढे ते आजोबा रथावर चढले आणि महाभारत घडले. आजोबांना वयोमानानुसार बाळुचा विसर पडला. बाळुला त्याचं काहीच वाटलं नाही.

क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Proud

बरेचदा अडी अडचणीला प्रसिद्ध व्यक्तींऐवजी तोच बेमालूम वेषांतर करून त्या व्यक्तींची जागा घेत असे, जसे चंद्रावर जायला आर्मस्ट्राँग घाबरला म्हणून त्याच्या ऐवजी बाळूच गेला होता. ही गोष्ट अमेरिकेने गुप्त ठेवली आहे..

बरेचदा (२०० पैकी निदान १५० टेस्ट्स मधे) तो सचिन तेंडूलकर चा वेष घेऊन खेळत असे. ही गोष्ट कुणालाहि माहित नाही. आता सचिन निवृत्त झाल्यावर हे सांगायला हरकत नाही.

Happy

बाळू शिंत्रे त्याच्या जन्माच्या ही आधीपासून झक्की या आयडीने अ‍ॅक्टीव्ह आहे.