प्रीस्कूल मध्ये शिकवल्या जाणार्‍या र्‍हाईम्स...

Submitted by वेल on 7 November, 2013 - 04:56

जॅक अँड जिल, जॉनी जॉनी, रेन रेन गो अवे (भारतात शिकवली जात असता), हश अ बाय बेबी ऑन थे ट्री टॉप, इत्यादी नर्सरी र्‍हाईम्स बद्दलची तुमची मते सांगाल का. तसेच चांगल्या काही र्‍हाईम्स तुम्हाला माहित असलेल्या आणि लोकप्रिय नसलेल्या त्यासुद्धा शेअर करा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मानसी ताई काय हो हे मराठी. Happy दिवे घ्या.

माझा मुलगा तीन वर्षाचा आहे.
तो ही कविता चांगली म्हणतो.

अश्वनि मामि या मायबोलित येउनच मराठि लिहायला सुरवात केलि आहे, टाईपताना खुप प्रोब्लेम येतो हो, समजुन घ्या ना .
चुक भुल द्यावि घ्यावि.

१ किती वेळा सांगितले बप्पा तुम्हाला
२ सांग सांग भो ला नाथ
३ असावा सुन्दर
४ मामाच्या गवाला
५ बा बा ब्लॅक शिप

वरील सगळी
+
ये रे ये रे पावसा रुसलास का
नाच रे मोरा
तबडक तबडक घोडोबा
मनीच्या कुशीत
आपडी थापडी
अडगुलं मडगुलं
कोणास ठाऊक कसा
चांदोबा चांदोबा भागलास का
ट्विंकल ट्विंकल लिट्ल स्टार
ईत्सी बीत्सी स्पायडर
रो रो रो द बोट
ए बी सी डी
पॅट अ केक पॅट केक
अजुन आठवली की लिहीन.

I am typing in english deliberately.These rhymes typing in marathi would take time and you can directly copy paste from here to google.

1 2 3 4 5 - once I caught a fish alive
miss polly had dolly
this old man, he played 1......
oh john the rabbit....
incy wincy spider went up the water spout...
the weels on the bus go round and round....
5 little ducks went swimming one day.....
hot cross buns...
5 little monkeys humping on the bed
london bridge is falling down
These are the sounds that the animals make

Some useful websites : hooplakidz.com, appuseries.com

On you tube, there is one more. 'Patty Shukla'.She writes the songs.Some of her songs are very good and action oriented. Try her cahnnel on you tube.Some of her good songs are as follows

1. Round the partner do si do
2.color clors every where
3.wigle your finger,blink your eyes
4.Stop song
5.Jump jump jump..
6.Flollow me follow me,let do something crazy...

mast collection. i have heard patty shukla, i liked her rhymes / songs ... wanted to play on my sons bday..

इथे बाल साहित्य विभागात पुरंदरे शशांक ह्यांनी खूप बालकविता लिहिल्या आहेत तसेच इतर बाल कवितांचा ही चांगला संग्रह भेटेल. जरूर बघा.

अर्णव आता २२ महिन्यांचा आहे. जेवताना किंवा कधी लॅपीवर काम करताना लुडबूड चालू असेल तर यूट्यूब वर लावून देते खालील गाणी.
त्याला आवडणार्‍या तोडक्यामोडक्या शब्दांत बोलता येणार्‍या कविता/बडबडगीते/ नर्सरी र्‍हाईम्स
इंग्रजी
१) ट्विंकल ट्विंकल ही तर फारच आवडते - http://www.youtube.com/watch?v=yCjJyiqpAuU
२) जॉनी जॉनी (महागात पडली ही... सतत साखर खायला हवी असते Happy ) - http://www.youtube.com/watch?v=zdE39rxwcDs
३) टेडी बेअर टेडी बेअर (ही पण खूप आवडते कृती करून म्हणायला) - http://www.youtube.com/watch?v=7X0Q4F--g0s
४) हॉप अ लिटील जंप अ लिटील - http://www.youtube.com/watch?v=FwSIXOWnvyo
६) ABC (अभ्यास आवडतोय आम्हाला "सध्या" फारच अगदी वहीवर रेघोट्या ओढता ओढता त्या हातापायापर्यंत कधी पोहोचतात कळतच नाहीत Lol ) - http://www.youtube.com/user/CyberVillageSolution?v=nvVDqTkbWnk
७) हिकरी डिकरी डॉक - http://www.youtube.com/watch?v=sWp0VKRVk2k

अजून बरेच आहेत जसं बा बा ब्लॅकशीप, मेरी हॅड अ, जॅक अ‍ॅण्ड जिल, चब्बी चिक्स, पुसी कॅट, हम्प्टी डम्प्टी पण अजून आम्हाला ते आवडत नाहीयेत Happy

मराठी
१) ससा तो ससा की कापूस जसा (ही ऑल टाईम फेव कधीही केव्हाही कुठीही ऐकू शकतो वर शशा एवढंच तालासुरात बोलतो, पुढचं आपण बोलायचं याचं मी कार्टून कटआऊट्स काढून भिंतीला पण चिकटवून दिलेत. ते बघत बघत जेवण चालतं ) http://www.youtube.com/watch?v=eV1c9SdrtXI&list=PL90RgI1lZoeLxv2lsBOX0HL...
२) सांग सांग भोलानाथ http://www.youtube.com/watch?v=BxsVFqI_KQU&list=PL90RgI1lZoeLxv2lsBOX0HL...
३) एका माकडाने काढलंय दुकान http://www.youtube.com/watch?v=dDMTvFxjV78
४) येरे येरे पावसा रूसलास का http://www.youtube.com/watch?v=CLUHkfzvFyQ
५) नाच रे मोरा http://www.youtube.com/watch?v=1kr70SLuSFc
६) चांदोबा चांदोबा भाग्लास का (याचंही अ‍ॅनीमेशन खूप आवडतं त्याला. यातील बाळ म्हणजे तो स्वतः आणि त्याची आई म्हणजे मी असते Happy ) http://www.youtube.com/watch?v=37GbK3sdhRU
७) कासवाचं पिल्लू त्याचं नाव कल्लू (ही मला आमच्या शाळेत शिकवलेली. ती त्याला म्हणून दाखवल्यावर खूप आवडली)
८) चॉकलेटचा बंगला http://www.youtube.com/watch?v=Ay11bCGHl3I
९) शेपटीवाल्या प्राण्यांची http://www.youtube.com/watch?v=zCSxHgeW0lU&list=PL90RgI1lZoeLxv2lsBOX0HL...
१०) ऑल टाईम फेव वालं दुसरं मनीमाऊचं बाळ (हे खास त्यातल्या केतकी साठी Happy ) http://www.youtube.com/watch?v=UjvDuOmlIpk

यातही खूप आहेत खबडक खबडक घोडोबा, कोणास ठाऊक कसा, खोडी माझी काढाल तर, मामाच्या गावाला, गोरी गोरी पान, किलबील किलबील पक्षी बोलती, छडी लागे (याचे सुंदर अ‍ॅनिमेशन व्हिडीओज आहेत युट्यूब वर)

गोष्ट : चिऊताई दार उघड, पळ रे भोपळ्या टुणूक टुणूक, लाकूडतोड्याची कुर्‍हाड (ही नेहमी आणि बाबानेच सांगायला हवी) जेवताना आईने तयार केलेली माशाबाऊची कुठलीही ज्यात छोटा मुलगा अर्णव आणि त्याचे आईबाबा असतील. Happy

हिंदी
१) लकडीकी काठी http://www.youtube.com/watch?v=tuPb_5ZcA34
२) मछली जल की रानी है http://www.youtube.com/watch?v=rsUSP7Zr9JU

माबो वरची पुरंदरे शशांक यांची गाणी आणि मितानच्या गोष्टी सांगणारेय त्याला थोड्या दिवसांनी

Dreamgirl - arnavlaa aanach parava, kitti god. mi paN aanate maazyaa mulaalaa. pan asa nako vhayala, aapalya gappaa rahilyaa bajoolaa aanI he doghech gappaa marat basale.

वल्लरी... Happy हो त्याला आणणारच आहे. सध्या सर्दीमुळे चिडचिड करतोय.. पण फिरायला आवडतं त्याला म्हणून एक छोटासा प्रवासही होईल Happy

चिऊ ताईच्या पिला खरे सांग मला
अट्टु आणी गट्टू फिरायला गेले ह्या दोन कविता कोणाला माहित आहेत का ? इथे सर्च केले पण मिळाल्या नाहीत .

जुईली,
चिऊताईच्या पिला खर सांग मला
आकाशातले रस्ते कसे सापडतात तुला?
आकाशातल्या रस्त्यांवर पांढर्‍या खूणा असतात का?
लाल, हिरवे, पिवळे दिवे आणी पोलिस मामा दिसतात का?
रस्ता चुकुन चुकला तर चौकी वरती नेतात का?
नाव, गाव, पत्ता विचारुन गोळ्या चॉकलेट देतात का?

लेकीसाठी कायम म्हणायचे त्यातले हे एक गाणे आहे Happy

१ .एक होत झुरळ
चालल होत सरळ
बसमध्ये चढल
सीटाखाली लपल...
तिकीट नाही काढलं... तसंच घरी गेलं

२. एक होती भेंडी
तिला आली शेंडी
शेंडी गेली तुटून
भेंडी बसली रुसून