फोटोग्राफी स्पर्धा..नोव्हेंबर.. "लोककला" निकाल

Submitted by उदयन.. on 11 November, 2013 - 06:43

नमस्कार,

दरमहिन्या प्रमाणे " नोव्हेंबर " महिन्या करिता नविन संकल्पना आपल्या समोर आणलेली आहे.

यंदाचा विषय आहे... " लोककला "

दर महिन्याला स्पर्धा अजुन क्लिष्ट करण्याचा मानस आहे..

आता सगळेच सरसावले आहेत.. म्हणुन.."लोककला" हा विषय घेउन आलो आहे.

लोककला हे भारताने जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. देशातिल ग्रामीण भागात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. देशात कुठेही जा, लोककला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या रूपात भेटते. भारतातिल लोककला इतकी समृद्ध आणि विविधतेने नटलेली आहे की आपल्या दैनंदिन जिवनातली मरगळ एक लोकगित ऐकल्या वर किंवा लोकनृत्य पार कुठल्या कुठे पळुन जाते. तुम्ही ही लोककला तुमच्या आयुष्यात कुठेना कुठे नक्कीच अनुभवली असेल आणि ते क्षण तुमच्या हृदयाच्या कप्प्या सोबतच कॅमेर्‍यातही बंदिस्त केले असतिल. तर तेच क्षण तुम्ही आमच्या समोर उलगडयाचे आहेत. या महिन्याच्या "लोककला" या थीमच्या माध्यमातुन..

माय्बोलीकर जगभरात आहेत म्हणुन जगातील सर्वच लोककला यांचा समावेश करण्यात येत आहे... थोडीफार माहीती त्याबद्दलची लिहिण्यात यावी .. कारण इतरांना माहीती सुध्दा मिळावी

प्रथम क्रमांकः नीधप : रावण तयार झाल्यावर
खुप छान फोटो. रंग छान आले आहेत. फोटो rule of thirds प्रमाणे आहे.

1 nidhap.jpgद्वितीय क्रमांकः नंदिनी: कल्लरेपायट्टू
फोटो मध्ये हाव-भाव, pose व वेग सुरेख टिपला आहे. फोटो थोडासा out of focus आहे पण ठिक आहे.

nandini 2.JPGतृतीय क्रमांकः प्रिया७ :
छान फोटो. वेग आणि poses छान आहेत.

3 priya.JPGऊत्तेजनार्थः फारुक सुतारः
छान pose. हा फोटो अगदी चेहर्‍यासमोरुन हवा होता.

faruk uttejanarth.jpg

आपल्याला शक्य असल्यास ( शक्य कराच ) कॅमेर्‍याची सेटींग्स याचा सुध्दा उल्लेख करावा...... जेणे करुन इतरांना सुध्दा माहीती होईल फोटो काढण्यासाठी काय काय करावे....

जिप्सी, शापित गंधर्व आणि मार्को पोलो ज्युरी (जज) आहेत....आणि महिन्या अखेरीस इथेच विजेत्याचे नाव घोषित होईल...

नियमः-

१) फोटो स्वतः काढलेले असावेत..(कॉपीराईट्स चा प्रोब्लेम होउ नये म्हणुन खबरदारी)
२) फोटो वर वॉटरमार्क असल्यास अतिउत्तम..... इथले फोटो दुसर्यांकडुन विविध संकेतस्थळांवर वापरले जातात
३) थीम नुसारच कृपया फोटो टाकावेत जेणेकरुन जज लोकांना निवडण्यास सोपे जातील (तेव्हढाच डोक्याचा ताप कमी त्यांना)
४) जास्तित जास्त २ फोटो......

"समजा आज एक फोटो टाकला आणि काही दिवसांनी तुम्हाला अजुन एक फोटो त्याच थीम नुसार अजुन सुरेख मिळाला तर आधीच्या फोटो च्या खालीच टाकावा" जेणे करुन जजेस ना तुमचे फोटो शोधायला त्रास होणार नाही..

चला तर करुया सुरुवात

***********पिकासा वरुन मायबोलीवर फोटो कसे अपलोड करायचे या माहीती साठी खाली*********************
.

http://www.maayboli.com/node/43465

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Switzerland

वाद्याला काय म्हणतात माहित नाही.

lokkala1.jpg

Paris Momart इथे

lokkala3.jpg

हा competition मधे नाही

lokkala2.jpg

कोकणातील शिमगोत्सवात पालखी नाचवण्याची ज़ूनी प्रथा ...
DSCN8409.JPG

Camera : NIKON COOLPIX P100
F-Stop : f/7.1
Exposure Time : 1/346 sec.
ISO Speed : ISO-160
Focal Length : 5 MM
Max. Aperture : 3

कडकलक्ष्मी :

या फोटोची गंमत म्हणजे कडकलक्ष्मीच्या मागे नेमकं लॅक्मे सलून दिसत आहे. लॅक्मे हा शब्द फ्रेंच भाषेतून घेतला असला तरी त्याचं मूळ संस्कृत भाषेतच आहे. लॅक्मे म्हणजे दुधातून जन्माला आलेली - म्हणजेच लक्ष्मी.

क्षीरसागरातून म्हणजेच दुधाच्या सागरातून लक्ष्मी उपजली हा संदर्भ या लॅक्मे शब्दामागे आहे.

अधिक माहितीसाठी इथे पहा :
http://names-for-baby.org/lakme/
http://guruprasad.net/posts/why-was-the-cosmetics-company-named-lakme/

इथे लोककला सादर होतानाच फोटो अपेक्षित आहे की लोककलेचा ठळक संदर्भ असलेला पण प्रत्यक्ष परफॉर्मन्सचा नसलेला फोटोही चालेल?

हो नक्कीच.......

लोककला दिसली पाहिजे ... मग ती प्रत्यक्षात घडत असो या तिचा अभास होत असो... फोटो तुन ती दिसायला,कळायला हवी लोकांना

आभार. पहिल्यांदाच या स्पर्धेत भाग घेता येतोय. Happy

रावण तयार होताना...
लोककला - यक्षगान
स्थळ - निनासम, हेग्गोडू येथील थिएटरचे बॅकस्टेज
तारीख - १६ मे २०१३
makeup.jpg

हाच रावण तयार झाल्यावर स्टेजवर असताना... (फोटो प्रेक्षागृहातून काढलेला आहे)
ravan.jpg

कॅमेरा तपशील
कॅमेरा - कॅनन पॉवरशॉट SX 120 IS
हा पॉइंट अ‍ॅण्ड शूटवालाच कॅमेरा आहे पण याला काही प्रमाणात एक्स्पोजर कंट्रोल करायला मॅन्युअल ऑप्शन आहेत. अगदी लिमिटेड आहेत पण आहेत. तेच वापरलेय. नंबर्स लक्षात नाहीयेत.

हा फोटो गंमत म्हणून टाकतेय. स्पर्धसाठी नाही.
sita-smsng.jpg

सीतेला समस करायला असा फोन मिळाला असता तर दागिने फेकत खुणा पेरायची वेळच आली नसती नै! Wink

पोटलीत आणखी फोटो मिळाले... माझ्या मागील प्रवेशिका ऐवजी हे फोटो देत आहे...
प्रवेशिका १:
IMG_4804_1.jpg

प्रवेशिका २:
IMG_4789_1.jpg

माझे फोटोंचे वर्णन: (हे फोटोज रामोजी फिल्म सिटि मधिल "स्पिरिट औफ रामोजी" या तिथल्या सांस्क्रूतिक कार्यक्रम मधिल आहेत...)
प्रवेशिका १) बासरीच्या सूरांवर एक न्रुत्यांगना आपली कला सादर करताना.. (यात बासरी वाजवणारा पायाने अधू आहे..)

प्रवेशिका २) देशभक्तिपर गितावर न्रुत्य सादर करणारे कलाकार... कलाकारांनी घातलेले कपडे हे तिरंगेचे प्रतिक आहे..

भरपुर फोटो आहेत पण स्पर्धेसाठि कुठले टाकावे हे कळत नाहिये. randomly pick करुन स्पर्धेसाठि पहिले २ आणि बाकि असेच.
हवाई ला हुला म्हणुन Hawaiian traditional डान्स आहे त्याचे हे फोटो. हुला डान्स मधे बरेच प्रकार असतात. इथे दिलेले mostly फोटोत Hula Kahiko प्रकार आहे.
१.
IMG_5704.JPG
२.
IMG_5707.JPG
३.
IMG_5729.JPG
४.
IMG_5634.JPG
५.
IMG_5663.JPG
६.
IMG_5689.JPG
७.
IMG_5690.JPG

Camera-Canon EOS Rebel T1i

स्पर्धेत पहिल्यांदाच भाग घेत आहे.
हा फोटो कर्नाटकात बदामीला गेलो होतो तेंव्हाचा आहे.
बनशंकरी देवीच्या देवळात हा कलाकार (बहुधा गोंधळी) बसला होता.
फोटो काढताना त्याने हात उंचावून प्रतिसादही दिला.

कॅमेरा - सोनी डिजिकॅम

g1.jpg

प्रचि क्र. १ - लोककलेचा प्रकार भित्तीचित्र
आपल्याइथे जुन्या काळापासून घराच्या भिंतींवर चित्रे रंगवण्याची मोठीच परंपरा होती. विशेषतः देवळांमधल्या भिंतींवर चित्रे काढण्याची परंपरा अगदी अजून अजून पर्यंत होती.
हे आहे, मौजे वावोशी, ता. खोपोली, जि. रायगड येथील महादेवाच्या देवळातले मराठा शैलीतील एक भित्तीचित्र. ह्या देवळातल्या भिंतींवर इतरही देवादिकांची, पौराणिक संदर्भ असलेली, ई. चित्रे आहेत.

रच्याकने - मेणवलीला, नाना फडणवीसांच्या घरामधली ह्या (मराठा) शैलीतील भित्तीचित्रे बरीच प्रसिद्ध आहेत.

Bhittichitre.jpg

प्रचि २ - लोककलेचा प्रकार बांबूचे विणकाम

मेळघाटातील काही गावांमधे गेलो असताना काही ठिकाणी बांबूच्या टोपलीसारखे विणकाम केलेला एक उभट खांब जमिनीवर उभारलेला दिसला. पहिल्यांदा वाटले की बाणाचा भाता आहे की काय? अधिक चौकशी करता कळले की हा प्रकार लहान रोपांचे जतन व संवर्धन व्हावे म्हणून केलेला असतो. जोराचा पाऊस, वादळी वारे, चरणार्‍या बकर्‍या ई. पासून संरक्षण म्हणून ह्या बांबूच्या विणकामाचा वापर केला जातो. ह्याचा वरून घेतलेला फोटो.

DSC01652.JPG

नीट कळावे म्हणून अजून एक फोटो टाकत आहे.
DSC01653.JPG

लिंटिं दिसतंय का? खूश का?

लोककलेचे १.प्रयोगात्मक व २. हस्तकला असे २ प्रमुख प्रकार.हस्तकलेत शिल्पकला येते,तशीच जीवनोपयोगी वस्त्रनिर्मिती व त्यावरील कलाकुसरही!

1
वेरूळची जगप्रसिद्ध शिल्पकला

2
लोककला : पैठणी वस्त्रनिर्मिती

माझाही सहभाग.
१. वासुदेव.
Copy of DSCN7438.jpg

फोटो नीट आला नाही म्हणून हा एक.
Copy of DSCN7437.jpg

२. दशावतार.
1452433_359558877522319_1032580720_n.jpg

क्लोग्गर्स म्हणजे पुरातन पाश्चिमात्य चर्मकार... त्यांनी बनवलेले क्लोग्स घालून करण्यात येणारा नृत्यप्रकार हा बराच लोकप्रिय आहे. हे छायाचित्र अमेरिकेतल्या व्हर्जिनिया प्रांतात स्टॅनर्सविल्ले ह्या खेड्यातले आहे... ह्या छायाचित्राचे वैशिष्ट्य म्हणजे मधल्या आजी.... त्या तब्बल पंचाहतरीच्या होत्या पण त्यांचा उत्साह, जोश आणि नाचातली नजाकत लाजवाब होती
DSC_3354.JPG

Pages