येता जाता कधीतरी
येऊन जाईन तुझ्या घरी
दचकुन किंवा हरखून मला
घरात घे हं... तेंव्हातरी!
दाराबाहेर चप्पल सोडून
मोकळ्या पायांनी येईन आत
हसून म्हणेन तुला सहज...
"झाली का रे वर्षं सात?"
तुही हसशील छानसं आणि
देशिल बसायला खुर्ची एक
गोंधळलेल्या डोळ्यांत तुझ्या
आठवणींचा तरळेल मेघ?
"आलोच" म्हणत जाशील आत
आणशील घोटभर गार पाणी
तेवढ्यात ओढणीआड माझे
झाकून घेईन काळे मणी....
नजर जराश्या घाईघाईनं
फिरवून आणिन घरभर
नोंदून घेईन काही खुणा...
काही तस्विर भिंतीवर!
अंगठ्याखाली दाबलेलं
स्वप्नं अलगद करीन सुटं
हळूच घालीन फुंकर आणि
स्वच्छ होतील जळमट पुटं
तेवढ्यात तूही येशील तिथं
बसशील समोर, बघशील वर
दोन्ही टोके कल्लोळाची
मधे शुन्यता आभाळभर!
तसेच तिथेच बसून आपण
मनाचं मनाशी बोलत राहू
ओठांतून मागे परतणार्या
बिचार्या शब्दांची गंमत पाहू
बोलता बोलता विषय पुन्हा
फिरून परत येईल तिथेच...
तेंव्हा मात्र सावध होऊन
समजूत घालशील नजरेनेच.
’खरंय तुझं... नकोच ते...’
मीही झालेय समजुतदार
ओढणीने का झाकता येतं
अंतर सगळं... आरपार...
दाराबाहेर माझ्याच चपला
चुळबुळत मला घालतील साद
म्हणतील, ’बये अनवाण्यानी
कुठवर जाशील आत आत?’
उठेन मग मी... तूही उठ...
म्हणेन, ’निघते... झालंय लेट...’
तेवढा एक क्षण सावरून घे...
टाळच बघणं डोळ्यांत थेट!
दाराबाहेर पडताच पुन्हा
घसरेल ओढणी, अडकेल पाय
भिंतीवरल्या तस्विरीला
सांग हं... माझं नाव काय...?
सुरेख.
सुरेख.
प्रसंग तर डोळ्यापुढे उभा
प्रसंग तर डोळ्यापुढे उभा राहिलाच पण वाचून कविता पूर्ण केल्यावरही काही वेळ प्रचंड हुरहुर लागून राहते ...
हेच कवितेचं सगळ्यात मोठ्ठं यश !
ग्रेट !!
छान.
छान.
धन्यवाद!!!
धन्यवाद!!!
>>दोन्ही टोके कल्लोळाची मधे
>>दोन्ही टोके कल्लोळाची
मधे शुन्यता आभाक्लास!....
हाय क्लास!
खरे तर अख्खी कविता अशक्य सुंदर अनुभूती आहे.
मस्त! काय भारी लिहिलयसं
मस्त! काय भारी लिहिलयसं
धन्यवाद योग, चनस.
धन्यवाद योग, चनस.
सुंदर कविता. आवडली.
सुंदर कविता. आवडली.
दोन्ही टोके कल्लोळाची.... मधे
दोन्ही टोके कल्लोळाची....
मधे शून्यता आभाळभर !!!!.................. क्या बात है !!!
’बये अनवाण्यानी
कुठवर जाशील आत आत?’....... किती सुंदर एक्स्प्रेशन !!!
धन्यवाद!
धन्यवाद!
जबरदस्त कविता.
जबरदस्त कविता.
सुंदर!.............
सुंदर!.............
सहज सुंदर. आवडली.
सहज सुंदर. आवडली.
मुग्धमानसी , अशक्य दुष्ट आहेस
मुग्धमानसी ,
अशक्य दुष्ट आहेस तू … काय कमाल सुंदर लिहून ठेवलंयस… किती वेळा वाचली मी ही कविता आणि किती वेळा डोळे पाणावले । गणतीच नाही ….
धन्यवाद!
धन्यवाद!
खुप खुप आतवर पोचली... !!
खुप खुप आतवर पोचली... !!
दोन्ही टोके कल्लोळाची
मधे शुन्यता आभाळभर! >> हे तर अगदी सही उतरलंय.. खुप छान
अ प्र ति म च
अ प्र ति म च
वा
वा
खूप सुंदर !! मुग्धमानसी,
खूप सुंदर !!
मुग्धमानसी, तुझ्या कविता, आपण त्यातील भावनांच्या कमानीखालून गेलो असलो नसलो तरीही अनुभुती देतात.
खूप छान लिहिलीय कविता .
खूप छान लिहिलीय कविता .
खूप खूप धन्यवाद सर्वांना!
खूप खूप धन्यवाद सर्वांना!
किती आणि कसं अचाट लिहून जातेस
किती आणि कसं अचाट लिहून जातेस माहितीये का तुला? ते सांगण्यासाठीसुद्धा शब्द नाहीत माझ्याकडे.
धन्यवाद सई...
धन्यवाद सई...
फारच सुंदर ... खुप आवडली...
फारच सुंदर ... खुप आवडली...
1000000000000 लाइक्स आणि
1000000000000 लाइक्स आणि 1000000000000000000000 वेळा वाह वाह ! महामहिम काव्य ।
1000000000000 लाइक्स आणि
1000000000000 लाइक्स आणि 1000000000000000000000 वेळा वाह वाह ! महामहिम काव्य ।
धन्यवाद सत्यजित, संतोष....
धन्यवाद सत्यजित, संतोष....
किती आणि कसं अचाट लिहून जातेस
किती आणि कसं अचाट लिहून जातेस माहितीये का तुला? ते सांगण्यासाठीसुद्धा शब्द नाहीत माझ्याकडे. >>>+१११११
कशी सुटली माझ्या नजरेतुन ही! अशक्य छान आहे!
केवळ अप्रतीम आणि अशक्य
केवळ अप्रतीम आणि अशक्य टचिंग!
आई ग..एकदम काळजालाच हात..
आई ग..एकदम काळजालाच हात..
Pages