ववि२००९: दवंडी

Submitted by ववि_संयोजक on 18 June, 2009 - 05:22

ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSSSSSSSSSSS
सर्व मायबोलीकरांसाठी एक महत्वाची सूचना आहे होSSSSSSSSSSSS
ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSSSSSSSSSSS
पावसाइतकीच आतुरतेने आपण ज्या वर्षाविहाराची वाट पहात असतो त्याच्या तयारीला सुरुवात झाली असून सांस्कृतिक समिती (सां. स.) ने विविध खेळांच्या नियोजनाचे काम सुरु केले आहे. (अजूनही पाऊस न आल्यामुळे संयोजक गोंधळात पडले आहेत हा भाग वेगळा)
ढुम ढुम ढुमाक ढुम ढुम ढुमाक होSSSSSSSSSSSS

``अय्या! वविची दवंडी ऐकलीस का गं?''
``हो तर, जोरदार तयारी सुरु झालीये असं ऐकलं.. ''

`` कधी आणि कुठे आहे ववि?''
``ते तर सांगितलच नाही दवंडीत ''

``काय काय खेळ आहेत रे वविमधे यावेळी?''
``हॅ.. खेळणार असतील लंगडी आणि शिवणापाणी..''
``लंगडी ... ओह नो.. असले खेळ खेळायला का ववि मधे जायचंय?''

``मी येणारे..राणीच्या देशातून उडत उडत वविला...''
``चित्रपटावर आधारित काही कार्यक्रम आहेत का?''
``हो, आहे ना पण मराठी चित्रपटांवर आहे .. तामिळ आणि भोजपुरी चित्रपटांवर नाहीये..''
``जॉली गुड, मी खेळणार..''

``मी नाही येणार..जिथे जनी नाही तिथे मी येऊन काय करणार?'' - इति जनीचा पंखा.
``तुम्ही तिथे येऊन जनीचं नाव घ्या..''

``अय्या! नाव घ्यायचंय..आमच्या यांचे..'' (लाजलेली बाहुली)
``लाजायला काय झालं? रोज या ना त्या बीबीवर नावंच तर ठेवत असतेस...''
``आणि हो नुसते नाव नाही घ्यायचे उखाण्यातून घ्यायचे आहे..
उखाण्यातून..?????''
``हो! उखाण्यातून आणि तेही स्वतःचे..''

``अरे! मला कुणी लिंक देईल का कसलीच टोटल लागत नाहीये. ''

मायबोलीकरांनो, तुम्हाला पण टोटल लागत नाहीये का???? मग इथे लक्ष ठेवा. लवकरच आम्ही येत आहोत सर्व गणितांची उत्तरे घेऊन..............

-------------------------------------------------------------

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि दवंडी कोणी लिहीलेय. मस्त लिहीलेय Happy

वाट बघतो पुढच्या पोस्टींची

काहितरी चुकतय.

ढुम ढुम ढुमाक नंतर "माझी टोपी घेतली" अस पायजे.
*************************************************
मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.

"माझी टोपी घेतली"..>>अमित, ते वविच्या ठिकाणी ... Happy

गुड रिटर्न.
*************************************************
मित्रांचा भार होत नाही म्हणून त्यांचे आभार मानायचे नसतात.

स्लार्ट्या, तुह्यासाठी पेशल आवताण धाडलया समतीनं.. Happy

तुह्यासाठी पेशल आवताण धाडलया समतीनं.. >>>
अगदी अगदी. Happy मला तर अगदी गडावर, पुपुवरचे पोष्ट वाटले. Wink

अरे वा दवंडी जोरात आहे खरी. Happy

दवंडी लईच जंक्शन!!

दवंडी एवडी जंक्शन!! तर ववि केवडा!! Happy

सांगा आता पट्दिशी कुडं कदी ववि हाय ते!

-------------------------------------------------------------
'ज्याला कलाकार नाही बनता येत तो टीकाकार बनतो'

अरे वा दवंडी जोरात आहे.. Happy

व वि २००९ ची डिटेल्स लवकरात लवकर आणि मोठ्या जल्लोषात पाठवा......

हिट है हिट...

सुपर हिट...
_______
चक दे सारे गम, तेरे संग है हम!!!

Proud

दवंडीने मस्त माहौल बनविला आहे !

लेट्स रॉक्क्क्क्क्क्क्क !

प्रकाश

कुठेही असलं तरी मी हे मिसणार आहे.. Sad
श्या!!
----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

मज्जा!!!

--------------
नंदिनी
--------------

>>कुठेही असलं तरी मी हे मिसणार आहे.>> का गं नी? ये की... Sad

``अय्या! नाव घ्यायचंय..आमच्या यांचे..'' (लाजलेली बाहुली)
``लाजायला काय झालं? रोज या ना त्या बीबीवर नावंच तर ठेवत असतेस...''>>>
हे माझ्यासाठी तर नाही? Uhoh

पावसाचा नाही पत्ता, 'वर्षा'विहाराची पिटलीये दवंडी
तारीख बदलतील संयोजक अशी आशा करतेय मंजुडी Wink

हे माझ्यासाठी तर नाही?>>> छे गं! Happy
-------------------------------------------
Prioritize. It hurts (others) but helps (you).

मला आवडलंच असतं यायला पण शूट तोंडावर असणारे तेव्हा.

----------------------
हलके घ्या, जड घ्या
दिवे घ्या, अंधार घ्या
घ्या, घेऊ नका
तुमचा प्रश्न आहे!

हे माझ्यासाठी तर नाही?>>> छे गं! >>> म्हणजे फक्त तुझ्यासाठी नाहीये असं म्हणायचंय का पूनम Wink
भाग्या दिवे घे गं

चला ववि ची दवंडी झाली रे !!!!!!!!
संयोजक लै खास
इदं न मम राष्ट्राय स्वाहा !!

या वेळेस देशात जाणे होणार नाही - त्यामुळे व. वि. बुडणार -
मजा करा लेको !
~~
स्तोत्रात इंद्रिये अवघी गुणगुणती दु:ख कुणाचे.
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

http://www.maayboli.com/node/9087
हे घ्या इकडे जाऊन घ्या उखाणे.. Happy जे वविला येणार नाहीत त्यांनी या बाफवर ओळख करुन द्या बरं पटापट..