मिनी कॉफी फ्रेम्स

Submitted by अंतरा on 9 November, 2013 - 12:30

मिनी साइझ कॉफी फ्रेम्स

ganpati1.jpgm1.JPGm2.JPGm3.JPGm5.JPG

साइझ : 8 x 10 in.

आधी केलेल्या फ्रेम्स च्या साइझ पेक्षा लहान आहेत म्हणुन मिनि साइझ फ्रेम्स असे शीर्षक दिले .

नेहमी प्रमाणे comments ची वाट बघते आहे.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप सुरेख. पक्षांच्या दोन्ही फ्रेम खूपच आवडल्या. साइझपण लिहा फोटोखाली. मिनी म्हणजे किती लहान ते लक्षात येत नाही इथे फोटो बघून.

सहेली फ्रेम्स वर इपॉक्सी चे कोटिंग असल्यामुळे त्या खराब नाही होत. धूळ बसली तर सॉफ्ट कपड्या ने पुसून घ्यायचे.

अप्रतिमच!

आकार नक्की किती आहे हे शेजारी नाणं ठेवल्यास व्यवस्थित कळेल. सिरॅमिक प्लेटसवर पेंटिंग्ज केली आहेत का? भिंतीवर लटकवायची की टेबलवर ठेवायची आहेत?

फ्रेम्स प्लायवूड च्या आहेत.फिनीशींग मुळे बर्याच लोकांना त्या सिरॅमिक प्लेट्सवर केल्या होत्या वाटल्या. त्या भिंतीवर लटकवायच्या आहेत.घरी उरलेल्या प्लायवूड चे काय करायचे असा प्रश्न होता. पण ते त्रासदायक होते त्यापेक्शा एमडीएफ बोर्ड बरा पडतो.

मी जसे केले तसे सांगते.

माझ्या कडील प्लाय वर प्रायमर नीट लागत नव्हते म्हणून प्लाय च्या पीस वर वॉल पुट्टी लावली.ती सुकल्यावर सँड पेपर ने थोडे घासले सॉफ्ट होण्या साठी. मग वॉल प्रायमर लावले. ते वाळल्या नंतर डिझाइन काढले.मग फेविकॉल + पाणी असे मिश्रण लावले (ऑप्शनल). मग कॉफी +पाणी आणि ते वाळले की कॉफी पावडर + पाणी ने रंगवा. फायनली इपॉक्सी चे कोटींग. एव्ह्डे सगळे केल्यावर त्राण नव्हते म्हणून ५/६ पीसेस नंतर फुल स्टॉप. सूवनांची वाट बघते आहे.