सुगंधी सुगंधी उदासीन फाया

Submitted by बेफ़िकीर on 6 November, 2013 - 13:42

सुगंधी सुगंधी उदासीन फाया
तुला सोसवेना स्वतःचीच काया

जगाला कुठे काय तोशीस देतो
स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया

तिथे काय असते बघायास जातो
मिळेना मला ज्या कुशीतून माया

कुठे चार ओळीत बसलीत नाती
तरी वास्तवाने सुचवल्या रुबाया

मला गाठलेकी शिखर गाठते ती
जिला सापडेना स्वतःचाच पाया

कुणीही मनावर पथारी पसरते
चला वेळ काढू करू कारवाया

जिचा मी तिला 'बेफिकिर' वाटतो मी
हिचा मी म्हणाया तिचा मी म्हणाया

-'बेफिकीर'!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठला एक कोट करू ?

एक एक शेर आर-पार जाणारा, जेवढा वजनदार तितकाच नाजुकही ! अंतरंग उलगडवून दाखवणारा आणि म्हणूनच प्रत्येकाला अगदी जवळचा वाटणारा.

'स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया' >>>>> निव्वळ अप्रतिम !

धन्यवाद !

-सुप्रिया.

जगाला कुठे काय तोशीस देतो
स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया

तोशीस मला अर्थ माहीत नाही. दुसरी ओळ फार आवडली.

तिथे काय असते बघायास जातो
मिळेना मला ज्या कुशीतून माया

व्वा.

सुगंधी सुगंधी उदासीन फाया
तुला सोसवेना स्वतःचीच काया ... वास काय सोसायची गोष्ट आहे काय?

जगाला कुठे काय तोशीस देतो
स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया .... जात-पात कसलं राजकारण करताय? आणि कुणाचि जात कधि वाया जाते का?

मला गाठलेकी शिखर गाठते ती ... कुटल्या लेकीची कसली गाठ?
जिला सापडेना स्वतःचाच पाया

जिचा मी तिला 'बेफिकिर' वाटतो मी ... स्वतःच्या नावाचे तरी स्पेलिंग ठीक लिहा
हिचा मी म्हणाया तिचा मी म्हणाया

एकंदर फालतू गझल आहे. वेळ वाया गेला.

जगाला कुठे काय तोशीस देतो
स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया

कुठे चार ओळीत बसलीत नाती
तरी वास्तवाने सुचवल्या रुबाया

हे दोन शेर सर्वात विशेष वाटले. त्यातही तोशीस वाला अधिक.
---------------------------------------------------------------------------------
माझ्या माहितीनुसार, तोशीस म्हणजे त्रासदायक किंवा क्षमतेबाहेरचे कष्ट

जगाला कुठे काय तोशीस देतो
स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया

व्वा व्वा

मला पण सगळे शेर आवडले. (माझ्या मानाने) आकलनाला थोडे वजनदार आहेत. पण पुन्हा वाचले की परत नव्याने अर्थ कळेल.

रूबायाचा सविस्तर अर्थ सांगाल का?

टीकात्मक आहे... पण छान आहे.

जगाला कुठे काय तोशीस देतो
स्वतःला मिळवतो स्वतः जात वाया

हा शेर जास्त आवडला.

सर.... मस्तच.

तिथे काय असते बघायास जातो
मिळेना मला ज्या कुशीतून माया

हा सर्वात जास्त आवडला...

वाह...

छान आहेत सगळे शेर . पण खरेतर प्रत्येक शेर चे रसग्रहण करून दाखवायला हवे जाणकारांनी म्हणजे अजून नीट गझल कळेल व अजून इंटरेस्ट येईल वाचायला .

तिथे काय असते बघायास जातो
मिळेना मला ज्या कुशीतून माया

मला गाठलेकी शिखर गाठते ती
जिला सापडेना स्वतःचाच पाया

व्वा !

कुणीसा हलकेच लावतो फाया
तुझ्या अत्तराचा बेफिकीर गंध

जणू काढली लेखणी तू पुन्हा अन
लिहू लागलास पुन्हा मुक्तछंद

- रमा

(तुमच्यासाठी)