वसा संस्कृतीचा

Submitted by santosh bongale on 24 October, 2013 - 11:15

वसा संस्कृतीचा

ऋण सावकारीच फेडण्या
कुणब्याला दुष्काळाचा शाप
रात्रंदिन कष्ट करायचा
नाही थांबला कधी बाप

उठून पहाटे रोज माय
सारवते दुःखाच्या भिंती
सोसत चटके दारिद्र्याचे
दिस रोज मावळती

राणी डुलणाऱ्या पिकामंधी
दिसू लागे साखर गोड
जल्म गेला मातीत अवघा
तळहाताला आले किती फोड

गाई गुरांच्या हंबरात
वाढे संसार शेणामातीचा
सुख नांदावे घरीदारी
वसा जपतो संस्कृतीचा

थकलेला चार घास खाऊन
जाई तृप्त होऊन वाटसरू
जिच्यावर जगतो आम्ही त्या
काळ्या आईला कसं विसरू

संतोष बोंगाळे
मु. पो. पिंपळखुंटे
ता . माढा जि . सोलापूर

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऋण सावकारीच फेडण्या
कुणब्याला दुष्काळाचा शाप
रात्रंदिन कष्ट करायचा
नाही थांबला कधी बाप

कठीण परिस्थिती मांडलीय आपण खरेतर.
अनेक शुभेच्छा.