रांजणा!

Submitted by चिखलु on 21 October, 2013 - 12:05

शालेतुन येताना रांजणाची झाइरात पाहिली. मला प्रश्न पडला की रांजणावर कोणी का म्हनुन पिक्चर काढेल.

दिप्या म्हन्तो, पानी अम्रुत आहे. म्हुन ते रांजणावर पिक्चर काढला असेल. पानी खुप म्हत्वाचं आहे, पन पाण्याचं आणि पाणचटपणाचं काय नातं असावं? तिथ अस का म्ह्नुन लिहलय की १८+? म्हन्जे १८ पेक्शा जास्त रुपये तिकीट आहे असे मला वाटते, पन माझ्याकडे १० रुपये आहेत, बाबांच्या खिशातुन अजुन ७ रुपये चोरायला हवेत. दिप्याला मी हे सांगितलं त्याने माझ्या १० रुपयांचे वडापाव घेतले, आमी ते शेअर केले. दिप्याला सगळं कळतं. दिप्या म्हन्तो १८ वर्शाचं झाल्यावर बुद्दी येते.

मला असं वाटतं बुद्दी डोक्यात अस्ते, मास्तर म्हणतात माझ्या डोक्यात कांदे आहेत, मी आईला हे सांगितलं तर आई म्हणते कांदे महाग आहेत, बुद्दी पन महाग असते, माझ्या डोक्यात दगड आहेत असं आईला वाटतं. पन माझं डोकं हलकं झालय असं बाबा म्हणतात. माझ्या डोक्यात काय आहे यावरुन आई-बाबांचे विचार पटत नाहीत, पन मला डोकं नाही यावर त्यांचं एकमत आहे. माझं डोकं माठासारखं आहे असं बबी म्हन्ते, ताई म्हन्ते मी माठ आहे, पण माझ्या डोक्यात पानी नाही. पानी पाण्पोईत अस्ते, तिथे मोठे मोठे रांजण आहेत, त्यात पानी आहे. पानी म्हन्जे अम्रुत, स्वर्गात अम्रुत अस्ते असं दिप्या म्हन्तो, स्वर्गात रोज पानी येत असावे, आमचा लाईनवाला पन्ध्रा दिवसातुन एक्दा पानी सोडतो. देवा आज तरी पानि येवु दे असं आज्जी म्हन्ते, लाइनवाला देवापेक्षा लै पॉवर्फुल आहे.

पिक्चर चा हिरो धानुश आहे, ते खरं तर धनुश्य आहे असं दिप्या म्हन्तो, पिक्चर वाल्यांचं शुद्द्लेखन घ्यायला पाहिजे, रांजणा चुकुन त्यानी रांझना असं लिहिलय. धानुश दुधवाल्यासारखा दिस्तो, म्हनुन त्याला दुधात पानी टाकायला रांजन पाहिजे असतील. तो हिरोईनच्या घरी दुध घालायला जात असेल, अनि मग दुधासोबत चिठ्ठी देउन तिला लव मध्ये पाडलं असेल. पान्पोइतले काका धानुशपेक्शा भारी दिस्तात.

धानुश चेन्नैचा आहे. तिथे सगळे लोक ईडल्या आनि भात खातात असं दिप्या म्हन्तो. रांजनाच्या झाइरातीत रांजनच नाहिये, असं का ते माहित नाही. दिप्या म्हन्तो आज्काल तशी फॅशन आहे. धानुश दुधवाला म्हनुन भारी दिसेल नक्की. मी पन मोठा होउन दुधवाला होनार, म्हन्जे मग मी दुध विकुन पैसे मिळतील. मग माझ्याकडे पिक्चर पहायला पैसे असतील. आता मी बाबांच्या खिशातुन पैसे काढुन येतो.

तळटीपः
हा लेख खुप जुना आहे, इथे पोस्टायचा राहिला होता. Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळालाय.. त्याच्या दिसण्यावरून त्याची किंमत करू नका..
वगैरे डोस अजून सुरु झाले नाहीयेत !! आश्चर्यच!

लै भारी लिवलंय.. दुधवाल्यासारखा दिसतो... पानपोईतले काका भारी दिसतात.. Lol

Rofl

मला असं वाटतं बुद्दी डोक्यात अस्ते, मास्तर म्हणतात माझ्या डोक्यात कांदे आहेत, मी आईला हे सांगितलं तर आई म्हणते कांदे महाग आहेत, बुद्दी पन महाग असते, माझ्या डोक्यात दगड आहेत असं आईला वाटतं. पन माझं डोकं हलकं झालय असं बाबा म्हणतात. माझ्या डोक्यात काय आहे यावरुन आई-बाबांचे विचार पटत नाहीत, पन मला डोकं नाही यावर त्यांचं एकमत आहे. >>>+++++ मस्त

कहर Rofl

माझी लेक सिनेमात सोनमचे नाव 'रंजना' असल्याने सिनेमाचे नाव 'रंजना' आहे असे पूर्ण आत्मविश्वासपूर्वक सांगायची. न्युमरॉलॉजीमुळे असे विचित्र स्पेलिंग केले आहे असे तिचे म्हणणे होते. Proud

Pages