खंत...

Submitted by मी मुक्ता.. on 11 October, 2013 - 14:56

वळणावळणावर चकवा देत चाललेल्या वाटेला,
भास होत रहातात..
तू सोबत असल्याचे..
आणि मला जाणिव, ते भासच असल्याची..
पण अपेक्षा नाही त्याचीही..

फुलून दरवळणार्‍या समजूतदारपणाच्या,
मुळाशी गाडलेले असतात...
न पुरवले गेलेले हट्ट..
अर्धवट सोडलेली स्वप्नं..
पण दु:ख नाही त्याचेही...

एका पारड्यात चूका
आणि एकात स्वप्न घेऊन
चालत रहाते..
आताशा बर्‍याच तटस्थपणे..

कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत..
आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच...
------------------------------------------------------------------
http://merakuchhsaman.blogspot.in/

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!

कवितेचा फ्लो अगदी छान.
शेवटचा खंड विशेष.

फक्त तिसर्‍या खंडात 'स्वप्नं' आणि 'तटस्थपणा' या विरोधाभासाची संगती (मला तरी) लागली नाही.

कुठल्याच दु:खाने आजकाल,
डोळे भरुन येत नाहीत.. >>same here

आणि विनाकारण वहायला लागले तर,
थांबायचं नाव घेत नाहीत..
जी काही खंत आहे, ती याचीच... .........खरंच !!

सर्वांचे खूप खूप आभार.. Happy

उल्हास भिडेजी,
स्वप्न म्हणजे आयुष्यांतली कर्तव्यं किंवा ध्येय या अर्थी..
तटस्थपणाचा संबंध पुढे आहे की इतकं तटस्थ होऊनही किंवा तटस्थ झाल्यासारखं वाटूनही कधीतरी खूप हळवं होणं, कारणाशिवाय..
did I answer the question correctly?
प्रतिसादासाठी धन्यवाद.. Happy