मांजरसुंभा गड - एक अगदीच short but sweet भटकंती

Submitted by आनंदयात्री on 10 October, 2013 - 05:16

अहमदनगर जिल्ह्याच्या पश्चिम-उत्तर सीमा सोडल्या, तर बहुतांश जिल्हा सपाटच आहे. पण तरी जिल्ह्यात आडवाटेवर काही परिचित नसलेले डोंगर आहेत. त्यांची उंची इतकी छोटी आहे की, त्यांना डोंगर म्हणणेही धाडसाचेच ठरावे. अशाच एका अपरिचित डोंगर कम किल्ल्याला भेट द्यायचा योग नुकताच आला. सोबतीला होता - 'ट्रेकक्षितीज' संस्थेचा संस्थापक अमित बोरोले व त्याची चारचाकी.

पुण्यातून भल्या पहाटे सहाला निघालो आणि नगर हायवेवर एका ठिकाणी (हट्टाने) मिसळ मागवून तोंडाचा जाळ करून घेतला. कितीतरी महिन्यांनी ट्रेकला निघालो असल्यामुळे सवयी मोडल्याची खात्री पटत चालली होती. अखेर अहमदनगर सोडून औरंगाबादच्या दिशेने जायला लागल्यावर दहा-एक किमीवर वांबोरी फाट्यावरून गाडी डाव्या हाताला आत मारली. मांजरसुंबा गड विचारत विचारत जात होतो, तेवढ्यात गड दिसला.

खूप दिवसात हा प्रवास घडला नाहीये, हे जाणवलंच -

या कमानीपाशी येऊन पोचलो.

पायथ्यापासून गडाचा छोटेखानी आवाका सहज जाणवतो -

पंधरा मिनिटात चढून ऐसपैस अशा मुख्य दरवाजापाशी आलो -

निजामपूर्व काळातील हे बांधकाम असावे (इति अमित) इतकी विस्तृत बांधणी आहे -

गडावर फिरायला फारसे काहीच नाही. गडाचा इतिहास, महत्त्व यांचा शोध सुरू आहे. तो पूर्ण झाला की इथे भर घालेनच. या गडाला स्थानिक लोक दावलमलिक या नावानेही ओळखतात. (गडावर पीरस्थान आहे म्हणून हे नाव).

गडावरील काही अवशेष.

अतिविशाल टाके - (हे पाहून मुल्हेरगडावरील अशाच टाक्याची आठवण ताजी झाली)

गडाच्या एका टोकावरचा हा 'हवामहाल' (हा महालच असावा. कड्याच्या अगदीच टोकाला असल्याने हवामहाल वाटतोय)

गडाच्या पश्चिम दिशेकडे अजून एक दरवाजा आहे.

त्यातून खाली डोकावून पाहिले असता पडक्या पण ठीकठाक पायर्‍या दिसल्या. ट्रेक केल्याचे जराही समाधान वाटत नसल्याने, या पायर्‍यांनी खाली उतरून तेवढेच समाधान मिळवू असा विचार करून खाली उतरू लागलो. थोड्याच वेळात एक पायवाट गडाला चिकटून गेलेली दिसली. त्या वाटेने गेले असता, गडाच्या पोटात एका रांगेत लेणी-टाकी सापडली.

पाणी चवीला उत्तम होते.

सरते शेवटी ती वाट गडाला अर्धी प्रदक्षिणा पूर्ण करून जुन्या वाटेला येऊन मिळाली. जेमतेम दीड तासात सर्व भटकंती संपवून गाडी पुन्हा पुण्याच्या दिशेने निघालीही..
- नचिकेत जोशी
(ब्लॉगवर प्रकाशित - http://anandyatra.blogspot.in/2013/10/blog-post_9.html)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त!! हा गड आमच्या आवाक्यातला आहे असं वाटतय! Proud

अरे ते इतकं हिरवंगार पाणी प्यायलास तु??? Uhoh

लेख वाचला....

आणि परत एकदा जाणवले की माझे नशिबच फुटके...

एक तर अशा ठिकणी जायला मिळत नाही आणि असे सुंदर लिहायला पण जमत नाही...बाकी आमच्या फोटोग्राफी बद्दल न बोलणेच चांगले....

देवाने तुम्हाला असेच भरभरून देवू देत आणि असेच सुंदर लेख इथे तुमच्याकडून येवू देत...

हे असे सुंदर फोटो कसे काय काढता ते पण सांगा....

सर्वांचे मनापासून आभार! Happy

Discoverसह्याद्री, तुमची प्रतिक्रिया पाहून खूप बरं वाटलं... Happy

आर्यातै, त्या कॅप्शनखालच्या फोटोतलं प्यायलं... Proud
ओंकार भावा, बस का! Wink

नचिकेत ...अप्रतिम प्र.चि.. एक ना धड भाराभर चींध्या असे न करता मोजके फोटो टाकलेत... हे छान झाले..त्यामुळे सहज फेरफटका मारुन आल्यासारखे वाटले...

छान फोटो. आम्ही आता जुलैमध्ये इथे जाऊन आलो. त्याच रस्त्याने सरळ पुढे गेलं की अशाच एका डोंगरमाथ्यावर गोरक्षनाथांचं मंदीर/समाधी(?) आहे. खूप छान बांधकाम आहे त्या मंदिराचं.

खंडहर गवाही देते है, हवेली बुलंद थी.....
असे भग्न वाडे परत का नाही बांधत ? या एवढ्या अवशेषावर सहज शक्य आहे. आपल्याकडच्या गडांवर तर केवळ चौथरेच उरले आहेत आता.