लॅपटॉप स्लीव आणि पिशवी (अपसायकलिंग)(बदलून)

Submitted by मानुषी on 3 October, 2013 - 01:01

माझे आधीचे अपसायकलिंग.

http://www.maayboli.com/node/44448

http://www.maayboli.com/node/43396
लेकीच्या मॅ़कबुकसाठी एक कव्हर शिवलं. उरलेल्या कापडातल्या पट्ट्या कापून त्या तिरक्या शिवल्या. आतून अर्थातच अस्तर आणि फोमही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही तरी व्यायामाचा प्रकार आहे अशा विचाराने बाफ उघडला>>>>>>>>>माधव...........रिसायलिंग आणि अपसायकलिंगमधे बराच फरक आहे.(तुम्हाला माहिती असणारच!)
सर्वांना धन्यवाद!

.

अश्विनी, मामी धन्यवाद!
फोम खूप जास्ती वेळा धुतल्यावर गोळा होतं. पण आमच्या नगरात अजून तरी खूप टिकाऊ फोम नाही सापडलेलं मला. पुण्यात मिळेल बहुतेक.
पॅडिंगचा एक यापेक्षा टिकाऊ प्रकार मी आणला होता इथूनच. पण त्यावर मशीनने शिवणं जरा कठीण जातं. त्या प्रकारचा फोम मशीनखालून पुढेच सरकत नाही. मग त्यावर कागद इ.इ. ठेऊन शिवावं लागतं.
मीही टिकाऊ फोम(स्पंज)च्या शोधात आहे.

हो मानूषी आता ऑर्डरी घ्याच. मला पण एक हवीय लॅपटॉप स्लीव्ह. (कॅनव्हसच्या कपड्याची हवीये मात्र मला. त्यावर रंगवायंचं आहे.) साईझ देवू का?

मस्तच मानुषी.
एक बद्ल सुचवावासा वाटतो. लॅपटॉप बॅगेला वरच्या बाजूला एक कप्पा(केबल्स्,चार्जेर साठी) करता येईल का?. (फोटोत असा कप्पा दिसला नाही म्हणून लिहिले.गैरसमज नसावा).

माशा.....गैरसमज नाही आजिबातच. >>>>>याला वरच्या बाजूला एक कप्पा(केबल्स्,चार्जेर साठी) >>>>>>> अगदी नक्कीच करता येईल. याला वर पट्ट्या जोडून जरा डिझाइन केलेलं असल्याने याला वर कप्पा केला नाही.
पण वर किंवा आत कप्पा नक्कीच होईल.
बाकी सर्वांना धन्यवाद!