दागदागिने

Submitted by webmaster on 21 September, 2013 - 02:23

दाग दागिने, Jewelry यांच्या नवीन फॅशन, जुन्या फॅशन याबद्दलचे हितगुज.

Discussions related to Jewelry

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेमा, फॅशनचे नवनवीन ट्रेंड्स हा धागा गायबला आहे का? तसा बराच रिसेंट होता तो आणि ३००+ प्रतिसाद देखील होते तिथे!>> नाही, तो आहे अजुन. मलाही सकाळी तसेच वाटले होते. पण फॅशनचे ट्रेन्ड्स याग्रुपात सामिल झाल्यावर दिसतोय.

Accessories organise करण्यासाठी काय करू? खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.>>>>> पारिजाता तुम्हाला सर्व वेगवेगळे ठेवावे लागेल...या साठी आधी चर्चा झालिय...जसे लटकत्या कानातल्यांसाठी होल्डर, गळ्यातल्या साठी वेगळे होल्डर , बांगडयांसाठी वगैरे.....फॅशन चे नवनवीन ट्रेंड्स १ मधे दक्षिणा चा धागा आहे त्यात आहे मला वाटतंय.....

A few days ago came across a platinum pendant, it was shaped as oval shape & a small white diamond was studded into it at a very center out place, stringed in a platinum chain, never seen any thing so beautiful like this before, so simple but so beautiful !
cost was of course sky high ! I do have its photo some where, will paste it here as I find it.

दादरला विसावा रेस्तराँच्या समोर दोन मोतीवालेंची दुकाने आहेत. तिथून गेल्या आठवड्यात चंचपेटी आणि मॅचिंग कानातले घेतले.. अगदी मस्त पारंपारिक मराठमोळे दागिने आहेत त्यांच्याकडे..

Accessories organise करण्यासाठी काय करू? खूप आहेत पण वेळेवर सापडेल दिसेल अस होत नाही.
>>>>> अगदी अगदी.

लेकीच्या अ‍ॅक्सेसरीज ज्या वेगानं वाढत आहेत ते बघता मी आता एक ड्रेसिंग टेबल कम स्टोरेज बनवून घेत आहे. इथे जे डिझाईन दिसत आहे तसंच अगदी सेम टू सेम. (vintage design in girls dressing room) आल्यावर फोटो टाकेनच.

याच साईटवर इतरही बरेच ऑप्शन्स आणि टिप्स दिल्या आहेत. छान आहे साईट.

इथेही डोकवा :
http://www.overstock.com/Jewelry-Watches/Jewelry-Boxes/3430/cat.html

http://www.diy-enthusiasts.com/diy-fashion/jewelry/diy-jewelry-storage-i...

http://www.fashiondivadesign.com/34-ideas-how-to-storage-your-jewelry/

http://www.realsimple.com/home-organizing/organizing/storage-ideas-00100...

काल एक इटुकलीशी ३ ड्रॉवर असलेली अलमिरा घेतली ज्वेलरी बॉक्स म्हणून. साइझ ६" * ५.५" * ३". त्यावर रंगरंगोटी झाली की मग इथे फोटो टाकेन.

jewellery sorting baddal chalu aahe mhanunithech vicharate. decoupage boxes gheun te sajavun jewellery box mhanun gift dyayacha vichar aahe.. ase he readymade decoupage boxes kuthe milteel bharatat?
hobby ideas sodun..... ithe far limited shapes ani sizes aahet.

(donno whats wrong, pan marathi type hotch nahiye. sorry)

गोगो, भारतात कुठे हवेत तुम्हाला बॉक्सेस? मी काल जी अलमिरा घेतली ती लोक प्रामुख्याने डिकुपेजसाठी किंवा मिक्स मेडिया क्राफ्टसाठीच वापरतात.
मी हे सामान दिल्लीमधये घेतले आहे. पण डिकुपेजसाठी फेव्हिक्रिल हॉबी आयडीयाज चे सामान मिळतं ऑनलाइन स्टोअरमध्ये http://www.hobbyideas.net/. (हे तुलनेनी थोडं महाग आहे)
इट्सीबिटसि चे पण ऑनलाइन स्टोअर (http://www.itsybitsy.in/ ) आहे. यांचं बंगलोर आणि दिल्लीमध्ये दुकानही आहे.
तसेच इथे क्राफ्ट्सलेन नावाचं पण एक ऑनलाइन स्टोअर (http://craftslane.com/)आहे.

बहूतांशी ठिकाणी हल्ली क्राफ्ट सामानात डीकुपेज बॉक्सेस/सामान मिळतं.

शाहिर
सरप्राईज द्यायचा आहे<em>>>> .सर्वप्रथम अभिनंदन करते! इतकं सुंदर गिफ्ट
देत आहात म्हणून. लिंक ओपन नाही होत.माझ्या कलीग्स् नी नक्षत्रमधून रिंग्स घेतल्या आहेत.
पु.ना. गाडगीळांकडे पण मस्त अफोर्डेबल स्टॉक आहे.

शाहिर, ती लिंक उघडत नाहीये.
पण तुम्हाला ज्यांच्यासाठी रिंग घ्यायची आहे त्यांच्या बोटांची साईज माहित आहे का? एव्हढी मोठी खरेदी आहे म्हणुन आधीच व्यवस्थित घ्यावी असे वाटते.

शाहीर, अंगठीच्या मापाचा गोंधळ होवू शकतो. अंगठी घेताना अगदी घट्ट घ्यायची असते कारण नंतर ती थोडी सैल होवू शकते. अंगठीचाच आग्रह नसेल तर earings, pendant घ्या. पुण्यात असाल तर मराठे ज्वेलर्स कडे पण चांगले कलेक्शन आहे.

पु.ना. गाडगीळांकडे मस्त ऑफर असते.३ महिन्यांच्या आत अंगठी बदलू शकता.( मुंबईत वर्षाच्या आत)
फक्त वॅट जाईल.चौकशी करावी लागेल.

DSCN1541-001.JPGDSCN1542.JPG

ही वर लिहिलेली ज्वेलरी अलमिरा मी रंगवून सजवल्यानंतर. Happy

यावर असलेले मोर डीजे च्या मेंदी कँडल्स वरून इन्पायर होवून रंगवले आहेत. थँक्स डी़जे. Happy

Pages